लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..

1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅ हॅ, विषयच असा की आठवणी इकडे तिकडे उतू जातात.
माझा या धाग्यावरचा बोअर करण्याचा कोटा आवरता घेते Happy विषयानुसार पोस्ट येउद्यात.
(आता त्या जुन्या प्रतिक्रिया एडिट करायचा बाण पण धनुष्यातून सुटलेला आहे.)

जवळील नात्यातले लोक काय हवं विचारून आहेर करतात.
बाकी बहुतेक आपल्या मनाने घेऊन येतात. मग नको त्या / त्याच त्या वस्तु जमा होतात, त्या मग माळ्यावर अर्धी जागा व्यापून टाकतात. ते टाळायचं असेल तर लग्न झाल्या झाल्या त्यांची विल्हेवाट लावायला वाघ/वाघिणीचं काळीज लागतं.

कापड आहेराच काय करायचं हे अजून मोठ्या लोकांचं discuss झालेलं नाही पण लग्नात येणारं फर्निचर इथून तिकडे न्यायला त्रासदायक असल्यामुळे आम्ही सगळ्यांकडून पैसे घेऊन नंतर त्यातून उपयोगी हव्या त्या वस्तू घेण्याचं ठरवलं आहे. कापड आहेर बंद करावा अशी आमच्या दोघांची इच्छा आहे पण मोठी माणसे काय म्हणतात हे पाहावं लागेल..

लवकरच दोन्हीकडील मंडळींची एक मीटिंग ठेवणार आहे ज्यात सगळे रीती रीवाज आणि कुठल्या पद्धती (जसे की आहेर वगैरे) ठेवायच्या कुठल्या नाही यावर चर्चासत्र होणार आहे..
लग्नाचं ठिकाण फायनल करताना बऱ्याच अडचणी येत आहेत Sad

माझा शालू सासरी कोणाला फारसा आवडला नाही, पण मला जामच आवडला होता. >>> सेम विथ मी Happy माझा कॉपर शेड मधला रेशमी गुल्बट ईंग्लिश पिंक रंग आहे (कांद्याच्या सालीचा रंग) आणि मी तोच घेतला आणि मिरवला. लोक म्हणत राहिले की नवरीच्या शालुचा रंग डार्क हवा, लाल्/मरून /राणी असा घे...
अमृता तुझे अभिनंदन आणि मेक अप बाबतित इथ्ल्या प्रतिकियांशी सहमत..न्युड आणि नॅचरल शेड्स चाच मेक अप असण्याचा आग्रह धर.
मी_अनू, तुझी पोस्ट वाचून जाम हसले...प्लीज यावर लेख येउंद्यात :डोळ्यात बदाम वाली बाहुली: Happy

जवळील नात्यातले लोक काय हवं विचारून आहेर करतात. >>>> आमच्याकडे अतिजवळच्यांना सऱळ पैसे देण्याची पद्धत आहे. तुला हवे ते घे म्हणण्यापेक्षा लग्नातला खर्चाचा वाटा ऊचलतात. त्यानंतरचे जवळचे एखादी वस्तू सांगून अमुकतमुक तू तुझ्या पसंतीने घे. बिल आम्ही भरतो असे म्हणतात. काही हौशी लोकं हनीमूनही स्पॉन्सर करतात. बाहेरच्या लोकांनी मात्र पैसेच द्यावेत. भांडीकुंडी द्यायचा जमाना तर आता गेलाच आहे. पण ते एकवेळ परवडले. पुष्पगुच्छ मात्र माझ्या डोक्यातच जातात. मला स्वतःलाही जेव्हा जेव्हा मिळाला तेव्हा समोरच्याच्या डोक्यातच मारावासा वाटत होता.

हनिमून आणि इन जनरल 'जोडवी,लग्नातलं मंगळसूत्र, चुडा हे काढू नये, अशुभ सूचक असतं.' असं ज्येना आणि नातेवाईक अगदी निक्षून, डोळे वटारून, घोळात घेऊन घेऊन सांगतील.त्यांना गोड हसून हो म्हणून हे विचार बाहेर निघताना दाराच्या मागे ठेवून देऊन व्यवस्थित चोरीमारी, धोका होणार नाही >>>

अगदि बरोब्बर! मला या मुर्ख प्रथांमुळे पायल, जोडवी या मुळे बुटात जखमा झाल्या होत्या Sad काच बांगडी फुटल्याने हाता लागले होते.. ते आठवले.

दुसरे म्हणजे आहेर देणे आणि घेणे , ही भानगड पूर्णपणे टाळताच आली तर बघा.>>> हे काही शक्य नाही, मानापमान, देणी घेणी ज्यांनी आहेर दिलाय त्यांच्याकडुन तो तेंव्हा स्विकारला गेलाय, सो मग आता त्यांच्या वसुलीचा काळ आहे सो टोमणे Wink ह्याच्या तून आयुष्यभर सुटका होणार नाही..

मुलीं नो अनवट रंगाच्या शालूचे फोटो टाकावे लागतील शास्त्र अस्तंय तसं आम्ही नेहमी जेव्हा जेव्हा व्हिवीआना मध्ये जातो सेकंड फ्लोअर ला हस्तकला आहे तिथल्या साड्या बघून ही का ती करत असतो. खाली पहिल्या मजल्यावर नल्लीज पण आहे. तिथे ही बरा स्टॉक आहे
पन लग्नी खरेदी साठी एक गुजरात्याचे वेगळेच दुकान आहे तिथून खरेदी केलेली.

सर्व नणंदा जावा दीर पोरे टोरे जावई ह्यांना मस्त गिफ्ट घेउन गेले साड्या घड्याळे बारकीला शरारा सूट.
पब्लिक खू ष हो गया. मीच नात्याने मोठी मग पोरांचे लाड केले. एकदम भारी पैकी साड्या

गिफ्ट देण्याच्या / घेण्याच्या मी विरुद्ध नाही पण लग्नातील अहेर पद्धत आता कालबाह्य झाली आहे किंवा व्हावी अस मला वाटत. एकतर हल्ली अर्थिक मदत हा मुद्दा गौण झाला आहे. वस्तूच कोणाला अप्रूप राहिलेलं नाही आणि लग्ना सारख्या मोठ्या समारंभात त्याचं फारच बाजारीकरण होतं असं मला वाटत.

ही अहेराची चेन ब्रेक व्हावी म्हणून मी आमच्या मुलांच्या लग्नात कोणा ही कडून अहेर घेणार नाही आणि देणार ही नाही हे सगळ्यांना सांगितलं होतं. मी एका ही माणसाला अहेर दिला नाही ( अपवाद फक्त माझ्या मुलांना लहानपणी सांभाळणाऱ्या काकूंचा. )

पण अहेर न घेणं ही बाब काही जणांच्या बाबतीत माझ्या साठी अशक्य ठरली. तिथे हातात कोंबणारे, खुर्चीवर ठेवणारे, घरी येऊन ठेवून जाणारे आपलं नातं किती जवळच आहे म्हणून इमोशनल प्रेशर टाकणारे अश्यांच्या बाबतीत मी काही करू शकले नाही. पहिल्यांदा मी माझी भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने मनस्ताप वाढला. माझा कार्याचा आनन्द कमी व्हायला नको म्हणून मग घेतला अहेर. अर्थात फार जणांनी नव्हता आणला अहेर. अहेर घेणं आणि रिटर्न मध्ये काही न देणं हे खूप कठीण आहे पण ही प्रथा मोडण्यासाठी मी ते ओझं वहाते आहे.

चांगल्या गोष्टी झिरपत जातात, त्याचा परिणाम होतो. मला त्रास झाला पण ह्या नंतरची अमच्याकडची कार्य बिन अहेरची ( अर्थात नका आणू अस लिहिलं असेल तरच ) झाली आहेत.

IMG-20191007-WA0041~2.jpg

माझा शालू..इथे नसेल द्यायचे प्रचि, तर काढुन टाकेल Happy

function at() { [native code] } अगदी सुरेख आहे शालू. व अहों चा कुडता पण माझे फेवरिट कलर्स ( रंगकामाचे धागे बघा) त्या डार्क बॅक ग्राउंड वर हे लाइट पिंक सुरेख दिसत आहे.

माझा शालू..इथे नसेल द्यायचे प्रचि, तर काढुन टाकेल Happy >> फोटो दिले तर अजून चांगली आयडिया येईल की कुठले रंग कसे दिसतात Happy

Submitted by aashu29>> खूप सुंदर रंग आहे शालूचा..अगदी unique आणि महत्वाचे म्हणजे हा नंतर पण आरामात वापरू शकतो पडून पाहून खराब होण्यापेक्षा असे चांगले रंग निवडून नंतर कधीतरी घालता आले तर भारी वाटतं..मी पण साड्या घेताना लाईट शेड्स घेण्याचा प्रयत्न करेल अगदी सगळ्या लाल हिरव्या पिवळ्या नको

चांगल्या गोष्टी झिरपत जातात, त्याचा परिणाम होतो. मला त्रास झाला पण ह्या नंतरची अमच्याकडची कार्य बिन अहेरची ( अर्थात नका आणू अस लिहिलं असेल तरच ) झाली आहेत.

Submitted by मनीमोहोर >> मला सुद्धा आहेर पद्धत नाही आवडत ताईच्या लग्नावेळी यावरून खूपच गोंधळ झाला होता माझ्या लग्नात आहेर बंद म्हणूनच सांगणार आहे मी पण दोन्हीकडील मंडळी किती ऐकतात ते माहिती नाही आता

हो शालु, साड्या स्वतःच्या पसंतीच्या निवडा.

माझ्या एका मैत्रिणीची खरेदी आम्ही मुलींनी इथे मुंबईत केली. कारण माहेर-सासरची सर्व मंडळी कर्नाटकात होती. मस्त मोरपंखी कलरचा तिला सुंदर दिसणारा आणि तिच्या बजेटमधे बसणारा शालु घेतला. लग्न कर्नाटकात होते. लग्नाच्या दिवशी शालु बाहेर काढल्यावर आजूबाजूच्या बायांनी हा कुठला कलर? लाल, गुलाबी, मरून नाही का मिळाला वगैरे वचवच केली, जी आम्हाला समजली नाही. नवरीला समजली. तिने अती झाल्यावर 'मला आवडलाय, मी नेसणार आहे' म्हणून सगळ्यांना गप्प केले. आणि खरोखर ती फार सुंदर दिसत होती त्या दिवशी. फोटोही उत्तम आले.

दुसर्या एका बिहारी मैत्रिणीने अनिअन पिंक शरारा निवडला होता. तिलाही घरीदारी खूप कटकट ऐकावी लागली. आम्ही लग्नात नव्हतो पण फोटोमध्ये गोड दिसत होती ती.

ओनीयन पिंक,फिका ग्रे, टिल ब्लु मधला अगदी फिका रंग हे अनपेक्षित रंग दिसतात पण चांगले आणि आजूबाजूला लाल जांभळ्या निळ्या फ्युशिया गर्दीत उठुनही दिसेल.
रंग बघताना नवऱ्या चे कपडे, मागच्या डेकोरेशन चा रंग हे(माहीत असेल तर) बघून नीट कोऑरडीनेट करून घेतले तर फोटो अजून उठावदार येतील.
चमकदार टिकल्या लावण्याबद्दल मिक्स मतं आहेत.कॅमेरा चा फ्लॅश पडून फोटो चुकीचा येतो असं काही मैत्रिणी म्हणाल्या.
आता बरंच नक्षीकाम पूर्ण साडीभर असलेली डिझायनर साडी आणि त्यावर सोनेरी नक्षीकाम सुंदर मोर वगैरे एम्ब्रॉयडरी वाली डिझायनर ब्लाउजेस घालतायत. हे दोन्ही, आणि दागिने नक्षी मिळून मन बरंच गोंधळात पडतं नक्की कश्याकडे पाहू याबद्दल.यापैकी काहीतरी एक बरंच प्लेन ,एक मुख्य रंग निश्चित करणारं असेल तर उत्तम.
फोटोशूट असेल तर फोटोग्राफर्स हे सर्व सुचवतातच.

shalu edit 2.JPGshalu edit.JPG

हा माझा चिंतामणी रंगाचा शालू. खरं तर माझ्या ताईचा तिच्या लग्नात मरून शालू होता, मलाही तो रंग आवडला होता. दुसर्‍या ताईने तिच्या लग्नात काश्मिरी पॅटर्नची पूर्ण नाजूक भरतकामाची अप्रतिम साडी घेतली होती शालूच्या ऐवजी.

मलाच हौस होती मरून शालूची. मग पेशवाईमधे गेलो तेव्हा खाली डिस्प्ले मधे नेसवलेला शालू ताईने बघून ठेवला होता आणि तो तिला खूप आवडला होता. बाकीच्या ४ साड्या घेऊन झाल्यावर मग शालूसाठी ताईने तिथल्या सेल्समन दादांना डिस्प्लेचा शालू आणायला सांगितला. माझ्या नजरेत तो भरलाच एकदम. मरून रंग विसरलेच मी. पण हा काही टिपिकल शालूचा रंग नाही असं वाटत होतं. सासरचेही असंच म्हणत होते. पण नेसून ट्रायल तर बघ असा दोघी तायांनी आग्रह केला. नेसल्यावर तर मी खूषच झाले. मग मात्र कोणी ताणून धरलं नाही.

रात्री नवर्‍याला व्हिडिओ कॉलवर साड्यांचे फोटो दाखवले. (साड्या फॉल वगैरेसाठी लगेच दिल्या होत्या.) "तुला आवडलाय ना, मग झालं!" असं तो म्हणाला. मग मात्र लग्नानंतरही मी खूप वेळा आवर्जून नेसले. आणि दुकानात तो जितका छान नाही वाटला तितका तो साबा-साबूंना नंतर प्रत्येक वेळी आवडला, आणि मुख्य म्हणजे लग्नातली एकही साडी न नेसता तशीच पडून राहिली असं झालं नाही म्हणून सगळेच खूष झाले. मला हौस आहे, शिवाय मी ठरवून इतर साड्या खूप महाग नाही घेतल्या. शालू आणि पैठणी माझ्या त्यावेळच्या हिशोबाने हाय रेंज (१०००० वगैरे प्रत्येकी) , बाकी सगळ्या नवरीच्या बजेटच्या मानाने लो रेंज(३ साड्या मिळून ४०००-५०००). अर्थात मी नोकरी करत होते म्हणून; नाहीतर मी एवढाही खर्च होऊ दिला नसता.
माझ्या ५-६ साड्यांची खरेदी ३ तासांत संपली, नवर्‍याच्या एका सूटने दिवस खाल्ला आमचा. आणि शेरवानी वगैरे दुसर्‍या दिवशी. माझ्यात चिकित्सा करायचे पेशन्स मुळातच कमी आहेत. तेव्हाही नव्हतेच. शिवाय आम्चं एकमत झालंच, तर इतरांना निवड पटत नसे. शेवटी लोकांनी नाद सोडला Proud आणि आम्ही हवी तशी खरेदी केली.

मी मनात दोन लूक decide केलेत..ते exactly तसेच जमणार की नाही माहिती नाही पण प्रयत्न करेन..
इथे फोटो देते
हा एक राजपुताना..all time fav

IMG_20211004_153057.jpg

आणि हा आपला सगळ्यात वेगळा आणि उठून दिसणारा महाराष्ट्रीयन

IMG_20211004_153206.jpg

Submitted by प्रज्ञा९ >> तुमच्या शालुचा colour खूप सुंदर आहे पहिले फोटो पाहून कमेंटच केली आता पोस्ट वाचते Happy

मात्र लग्नानंतरही मी खूप वेळा आवर्जून नेसले. आणि दुकानात तो जितका छान नाही वाटला तितका तो साबा-साबूंना नंतर प्रत्येक वेळी आवडला, आणि मुख्य म्हणजे लग्नातली एकही साडी न नेसता तशीच पडून राहिली असं झालं नाही म्हणून सगळेच खूष झाले. मला हौस आहे, शिवाय मी ठरवून इतर साड्या खूप महाग नाही घेतल्या. शालू आणि पैठणी माझ्या त्यावेळच्या हिशोबाने हाय रेंज (१०००० वगैरे प्रत्येकी) , बाकी सगळ्या नवरीच्या बजेटच्या मानाने लो रेंज(३ साड्या मिळून ४०००-५०००). अर्थात मी नोकरी करत होते म्हणून; नाहीतर मी एवढाही खर्च होऊ दिला नसता.
माझ्या ५-६ साड्यांची खरेदी ३ तासांत संपली---
Hi सगळी माझी वाक्ये आहेत प्रज्ञा, sammmmme hereeee. बदल एवढाच की माझी ६ साड्यांची खरेदी पाऊण तासात झाली होती व पंधरा मिनिटे बिलिंग.
सगळ्या साड्या नंतरही खूप वापरल्या.
फिकी साडी घेतली असे टोमणे मला साखरपुड्याच्या साडीवरून ऐकावे लागले आहेत.
माझा शालू अबोली रंगाचा आहे पण फोटो मध्ये गुलाबी दिसतोय

माझ्या ५-६ साड्यांची खरेदी ३ तासांत संपली, नवर्‍याच्या एका सूटने दिवस खाल्ला आमचा. आणि शेरवानी वगैरे दुसर्‍या दिवशी. माझ्यात चिकित्सा करायचे पेशन्स मुळातच कमी आहेत. तेव्हाही नव्हतेच. शिवाय आम्चं एकमत झालंच, तर इतरांना निवड पटत नसे. शेवटी लोकांनी नाद सोडला Proud आणि आम्ही हवी तशी खरेदी केली.

Submitted by प्रज्ञा९ >> आमचं मात्र उलट होणार वाटतं Lol इथले जुने सालस गोड लग्नाचे फोटो पाहून एकदम मस्त वाटतंय आजकाल नवरी मुलगी खूपच जास्त मेकअप आणि ज्वेलरी मधे स्वतचं original रूप विसरून जाते..लग्नाच्या दिवशी कुणीतरी वेगळीच दिसते मी मात्र जमेल तेवढा कमी मेकअप ठेवणार आहे.. माझ्या आईचा शालू सुद्धा मला खूप आवडतो..फोटो भेटला की टाकेन इथे..

माझ्या लग्नाच्या साडी खरेदीला आई आली नव्हती, काहीतरी काम होते हे एक कारण आणि मुख्य म्हणजे जास्त डोकी लागली तर confuaion वाढते एक मुख्य कारण.
आम्हाला माझ्या साबा ह्यांच्या choice वर विश्वास होता.
मग नवरा साबा आणि मी तिघेच बसलो होतो माझ्या साड्या घ्यायला. तेव्हा मला साड्यामधलं फारसं कळत नव्हतं.
घरून आईला विचारलं होतं, शालू चा रंग कुठला घेऊ. आई म्हणाली अबोली घे. आश्चर्य म्हणजे तिकडे दुकानात त्यांनी दाखवलेली तिसरी साडी अबोली होती तिलाच पसंत केली. नवरा आणि साबा ह्यांना आवडली. Range सुद्धा ठरवून गेलो होतो त्यामुळे सोपं गेलं.
( माझ्या आईच्या लग्नातला शालू सुद्धा अबोली चॉकलेटी होता, माझा अबोली जांभळा, बहिणीने अबोली हिरवा घेतला. )

Pages