तुम्ही कोणते युट्यूब चॅनल्स सबस्क्राइब केले आहेत?

Submitted by वर्षा on 12 April, 2020 - 10:22

यूट्यूब हे म्हटलं तर वेळ वाया घालवणारं नाहीतर योग्य हेतूसाठी वापरलं तर फार उपयुक्त साधन आहे. Happy कित्येकदा मी गूगल करण्याऐवजी सरळ यूट्यूबवरच शोध घेते.
करमणूक म्हणा किंवा नवीन स्कील्स शिकणं म्हणा, यूट्यूब या सगळ्यांचं भांडार आहे.
यूट्यूबवर बरेच छान कॉन्ट्रीब्यूटर्स आहेत. माझे आवडते असे आहेतः

स्कील्स लर्निंग (शिक्षण्/नोकरी/करीयर् इ.)
Traversy Media (टेक्निकल स्कील्स)
Bridging the Gap (बिझनेस अ‍ॅनलिसिस)
Nihongo no mori (जपानी भाषा)

आरोग्य
Rujutadiwekarofficial
Damle Uvach

करमणूक्/पर्यटन इ.
MostlySane
Bharatiya Touring Party
Dhanya Te Foreign
Rang Pandhari

तुम्ही कोणते चॅनल्स सबस्क्राइब केलेत जे तुम्हाला उपयुक्त वाटले आहेत किंवा करमणूकीसाठी आवडतात ते लिहा. शक्यतो लिंकही द्या. तुमचे आवडते यूट्यूबर्स कोण आहेत?
यातून माहित नसलेले अनेक उपयुक्त चॅनल्स कळतील असं वाटतंय. तर सांगा तर मग!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वैपाक करण्यापेक्षा रेसिप्या बघायला मजा येते.
एक लिडिया बासतिनिष (किंवा जो काय उच्चार असेल तो) नावाची इटालियन आजी आहे. तिच्या काही नो नॉनसेन्स ऑथेंटिक पास्ता रेसिपी मला आवडल्यात. मला नॉर्मली पदार्थ करायचा असेल रेसिपी व्हिडीओ बघून जमत नाही. काहीही सालापाला ना लावलेलं टेक्स्ट लागतं. या बाईंचा व्हिडीओ याला अपवाद आहे.नेमकं सांगतात. तीच गोष्ट साऊथ इंडियन फूडसाठी हेब्बार्स किचनची आहे.
आणि बाकी इंडलजन्स म्हणून रणवीर ब्रार..
अनेक देशीविदेशी पाककलावाले व्हिडीओज फार गूळ पाडतात. मुख्य मुद्द्याला येत नाहीत पटकन. त्यात त्यांचा प्रेझेंस रणवीर ब्रारसारखाही नसतो. Wink

बाकी 5 मिन क्राफ्ट वगैरे टाईप बकवास नसलेले आर्ट मेकिंग, आर्ट जर्नलिंग व्हिडीओज कुणी बघत असेल तर प्लीज रेको द्या.

>>>>>>>सध्या मी वरील youtube चॅनलवर मुंशी प्रेमचंद, शरतचंद्र चटोपाध्याय (मूळ कथा बंगाली असाव्यात) यांच्या हिंदी कथा ऐकते आहे.
या दुव्याबद्दल धन्यवाद. मला टॅगोर व तत्सम बंगाली लेखकांच्या कथा आवडतत.

सामो, you are welcome! मला पण बंगाली कथा, कादंबऱ्यांचा मराठी/हिंदी अनुवाद ऐकायला आवडेल!

गेले काही महिने फार ऑनलाइन/screentime वगैरे झाल्याने डोळ्यांना त्रास होत होता. त्यामुळे वाचन कमी झालं म्हणजे ऑनलाईन /स्क्रीनवर. तेव्हा माझ्या मनात विचार आला की मायबोली पण अशी ऑडीबल झाली तर काय मजा येईल! Lol विशेषतः चर्चा/प्रतिसाद ऐकायला मजा येईल Lol admin/वेबमास्टर, शक्य आहे का अस काही करणं? अजून काही वर्षात इथली जनता वयस्कर होईल. मग वाचन कमी होईल किंवा शक्य होणार नाही. पण मायबोलीच व्यसन लागलेलं असल्याने ते तर पूर्ण करावंच लागणार! Lol

नी, आर्ट संबंधित म्हणशील तर मी मधून मधून रांगोळ्या बघत असते. फार satisfying असतात ते videos! मधून मधून काढण्याचा प्रयत्न करते पण माझ्याकडे असलेली रांगोळी फार जाडसर असल्याने मजा येत नाही.

https://youtu.be/NIoNZhqB_2U

सध्या मी वरील youtube चॅनलवर मुंशी प्रेमचंद, शरतचंद्र चटोपाध्याय (मूळ कथा बंगाली असाव्यात) यांच्या हिंदी कथा ऐकते आहे >>
अरे छानच. प्रवासात ऐकायला चांगले झाले हे.
तसे आता प्रवास कमी झालेत कोव्हीड काळात, पण सुरू होताहेत पुढच्या महिन्यापासून.

Greendreams - हिरवी स्वप्ने हा माझा नविन यू ट्युब चॅनेल आहे. नक्की बघा व subscribe करा. नंतर विस्तारीत माहिती देईन चॅनेल लची वेगळा धागा टाकून.
निसर्गाची किमया - रंग बदलणारी फुले
https://youtu.be/NBLjOmydM2w

मायबोलीवर जरे एखाद्या धाग्यावर लिंक दिलेली असेल तर थोड्या वेळाने मला यूट्यूब ती लिंक आणि संबंधित गोष्टी दाखवते. त्यापैकी एकावर क्लिक केले की मग त्याच गोष्टी यायला लागतात. त्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मग युट्यूब डिलीट करून पुन्हा अपलोड करतो.

सध्या मी वरील youtube चॅनलवर मुंशी प्रेमचंद, शरतचंद्र चटोपाध्याय (मूळ कथा बंगाली असाव्यात) यांच्या हिंदी कथा ऐकते आहे.>>>
थँक्स वत्सला. मला अशा कथा फार आवडतात.. नेफ्ली वर टागोर कथांचा फडशा पाडला Happy

मी बॉलीवूड मुव्हीजचे मजेदार वाले रीव्ह्यूज बघते. योगी बाबा, ओन्ली देसी, प्रीटेन्शीयस मुव्ही रेव्ह्यु असे काही..
कॅप्टन निक, मोस्टली सेन आणि इतर.. पण आता युट्युब बघणे फार टोर्चरस वाटायला लगलेय.. ५ मिन चा विडीओ आणि १ मिन मधे २ अ‍ॅड्स ते पण स्कीप न करू शकणार्या.. बहुधा प्रीमिउम घ्यावे म्हणुन असे पकवतात Sad

मराठी शॉर्ट फिल्म्स नाहीतर वेब सिरीज ची यू ट्युब चॅनल्स सुचवणार का?>>> मुव्हींग ऑन म्हणुन एक आहे, जरा बोल्ड आहे पण एक प्रयत्न म्हणुन नॉट बॅड.

माझ्या पत्नीचे हस्तकला, ओरीगामी यावर चॅनल आहे. सध्यातरी मी हेच पहात आहे. कोणाला जर त्यात रुची असेल तर जरूर भेट द्या आणि subscribe करा.

Crafty Pulse

मराठी शॉर्ट फिल्म्स नाहीतर वेब सिरीज ची यू ट्युब चॅनल्स सुचवणार का?>>> मुव्हींग ऑन म्हणुन एक आहे, जरा बोल्ड आहे पण एक प्रयत्न म्हणुन नॉट बॅड.- -बघितली पण सांगितल्याबद्दल थंकस

याशिवाय गेले वर्षभर मी निलेश मिसरा यांचे चॅनल पण subscribe केलं आहे. तिथल्या कथा पण अलीकडच्या काळातील हिंदी भाषेत आहेत. पण bollywood हिंदी नव्हे. त्याही फार मस्त वाटतात ऐकायला. निलेश मिसरा हे उत्तम कथाकथन करतात. अगदी कमी प्रमाणात संगीत वापरून कथाकथन केलं आहे.

>>>

नीलेश मिसरा बद्दल अनुमोदन. मीही गेले कित्येक दिवस वॉकला जाताना त्याच्या कथा ऐकते. साध्याच गोष्टी पण नीलेश मिश्रांचा आवाज खूप परिणामकारक आहे.

वत्सला.. प्रेमचंदच्या चॅनेल बद्दल धन्यवाद. मी ऐकायला सुरवात केली

अरे वा, बऱ्याच जणांना मुंशी प्रेमचंद आणि इतर हिंदी चॅनल आवडत आहेत हे ऐकून बर वाटल!

मी पण नीलेश मिसरांचे कथाकथन walk ला गेले की ऐकते कधी कधी.

नेटफलिक्स वर टागोरांच्या कथा असलेल्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?

निलेश मिसरा अगोदर कुठल्यातरी (नक्कि आठवत नाही ) एफ एम चॅनेल वर आरजे होते . रात्री ८ -९ वाजता शो असायचा .रात्रीची शांतता, त्यांचा आवाज आणि अर्थपूर्ण कविता - भन्नाट कॉम्बिनेशन .

Submitted by स्वस्ति >>>
९२.७ fm
यादो का इडियट बॉक्स अस काहीतरी नाव होत.

बिग एफ एम वर होते. मी पण प्रथम तिथेच ऐकले त्यांना.

त्यांच्या चॅनेल वर पण आहेत त्यातल्या गोष्टी.

मिलिंद शिंत्रे ह्यांनी संचालित केलेली शब्दशः शब्दशहा नावाची मराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा युट्युबवर बघतो आहे. बरेचसे लोक पुणेरी असले, तरी स्पर्धा मजेदार आहे एकदम.

निव्वळ निव्वळ अवलिया, विनोदवीर आहे रे बाबा हा मुलगा - https://www.youtube.com/channel/UCKKsaW4uKAV7yhywGaoj6eg
लोक्स प्लीजच त्याला सब्स्क्राईबच कराच. आपला म्हराटी मानूस आहे. अ‍ॅक्टिंग ला-ज-वा-ब!!! उदंड व भरभरुन प्रतिसाद द्या.

- मला व्यसन लागले आहे या चॅनलचे.

@योगी,
मस्त आहे चॅनेल. धन्यवाद शेअर केल्याबद्दल. सबस्क्राइब केले.

युट्युबवर दूरदर्शनचा चॅनेल आहे तिथे विश्राम बेडेकर लिखित टिळक आणि आगरकर हे गाजलेलं नाटक अपलोड केलेलं आहे.
https://youtu.be/q0On2IPQDNw

आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा हा गाजलेला वाद आणि त्यासंबंधी चर्चा नाटकात आहे. दोन जिवलग मित्र पुढे कसे दुरावतात, एकमेकांच्या विरोधात जातात हे दाखवलं आहे. जुनं नाटक असल्यामुळे पल्लेदार वाक्ये, ओव्हर द टॉप नाटकी अभिनय हे जाणवत होतं तेव्हाच संमतीवयाचा वाद सुरू झाला आणि त्यात टिळकांच्या तोंडी असलेली वाक्यच परवा नवीन कायद्याच्या वेळी भाजपविरोधक (स्वघोषित पुरोगामी) बोलत होते हे जाणवून गंमत वाटली. बेडेकरांनी १९६७ साली लिहिलेलं नाटक आजच्या काळात आजचं आणि relevant वाटतं. हेच त्यांचं नाटककार म्हणून यश म्हणावं लागेल. नाटकात टिळक आगरकर हेच मुख्य असले तरी गोपाळराव जोशी (आनंदी गोपाळ मधले) हे विक्षिप्त तिरसट
गृहस्थ धमाल आणतात. बाकी त्या काळातील न्यायमूर्ती रानडे, ज्योतिबा फुले या सुधारकांचेही उल्लेख येत राहतात.
कलाकारांमध्ये फक्त दया डोंगरे हाच एक ओळखीचा चेहरा दिसला. बाकी नवीन कलाकार आहेत.
मजा आहे नाटकात.
समाजातील परिस्थिती पाहून संतापणारे ,धुमसणारे, दुबळ्या शरीराने पण खंबीर मनाने एकटेच लढत राहणारे आगरकर नाटकाचे हिरो वाटतात. टिळक त्यावेळी त्यांच्या जागी बरोबर असतील पण तरीही....

मस्त माहिती आहे ह्या धाग्या वर !!
WHITEHAT - धन्यवाद !! खूपच चांगले नाटक , दोघांची बाजू तितक्याच समर्थपणे मांडणे हे लेखाचे यश !
दया डोंगरे दिसल्या नाहीत कदाचित नयना आपटे ("चूक भूल द्यावी घ्यावी" सिरीयल मधल्या ) म्हणायचे असावे ..

बुद्धिबळ :
agadmator's Chess Channel

मेडिटेशन , general guidance:
BnD TV

सह्याद्री चानेलने यूट्यूबवर कार्यक्रम टाकायला सुरुवात केल्याने सोय झाली. कधीही पाहता येतात. आता डीडी इंडिया आणि भारती कधी यूट्यूबवर येतात पाहू.

चक्रातून बाहेर पडण्यासाठी मग युट्यूब डिलीट करून पुन्हा अपलोड करतो. >>++१
मस्त आयडिया Srd !!
youtube सतत तेच तेच hammer करत राहतो असं वाटते .. चांगली कल्पना आहे ही

मराठी कवितेतील छंद, वृत्त, मात्रा, अक्षरगण ह्यात स्वारस्य असल्यास हे चॅनेल अवश्य पहा>> धन्यवाद shendenaxatra, खरच छान चॅनेल आहे हे

मराठी कवितेतील छंद, वृत्त, मात्रा, अक्षरगण ह्यात स्वारस्य असल्यास हे चॅनेल अवश्य पहा>>>
माझ्या आठवणी नुसार अर्निका मायबोलीकर आहे. तिचे इथे लेखपण आहेत काही.

सध्या युट्युब फीड लतामय झालेले आहे. त्यात हा एक gem सापडला. एका पाकिस्तानी पत्रकाराने घेतलेला लताबाईंचा अतिशय हृद्य इंटरव्ह्यू आहे.सरहद्दीपलीकडचे लोक लताबाईंकडे कसं बघतात हेही कळतं. त्यात त्याने एकेक गाणं निवडून त्याबद्दल लताबाईना बोलतं केलं आहे ते सर्व खूप इंटरेस्टिंग आहे. Must watch!

https://youtu.be/DZslgutm3NI

Whitehat, धन्यवाद मुलाखतीच्या लिंक साठी! उर्दूतून कौतुक ऐकताना मजा आली!
माझेही युट्यूब फीड सध्या लतादीदींच्या व्हिडिओज ने भरून गेले आहे!

MostlySane चानेलचे subscription 66lakh पाहून आश्चर्य वाटलं.

सध्या
पर्यटनाचे -
१ Not in office
२ Dr bro
३ Konkanhearted girl

Moto blog vlog -

1. Story on wheels

रिपेरिंगचे
१ Zero lab

मोबाईल रिव्यू
1 Geekyranjit
पाहतो.

स्टीव्ह ट्रेमिनो कॉमेडिअनचे व्हिडिओज. जबरी आहे एकदम. अक्षरशः त्यातले DIY, cellphone , My mother ,शॉपिंग videos अशक्य हहपुवा आहेत.
जे लोक टेक्सास मध्ये रहातात त्यांना तर अ‍ॅक्सेंट मुळ आणखीणच आवडेल. Happy

मराठी किडा कोणी पहातं का?
मस्त भंकसगिरी असते. आवडते मला. तो अँकर महाविनोदी एक्स्प्रेशन्स देतो.

एक अवांतर पण युट्यूब शी संबंधीत प्रश्न आहे >>>युट्यूब चॅनेल्सवर ज्या जाहिराती येतात त्या वैयक्तिक चॅनेल्सकर्त्यांनी (उदा. निवेदिता सराफ रेसिपीज) पोस्ट केलेल्या असतात कि आपल्याला आपोआप सजेशन नुसार येतात? कारण मी मोबाईल मधून झोमॅटो अनइन्स्टॉल केल्यापासून मला सारख्या त्याच जाहिराती दिसतात, अगदी मी एक धार्मिक चॅनेल बघतो त्यावरही झोमॅटोचीच जाहिरात येते. रच्याकने मी एकही युट्यूब चॅनेल सबस्क्राइब केलेले नाही, केवळ जी आवडतात तीच एखाद्या वेळेस बघतो.

जाहिराती आपोआप येतात. चॅनेलकर्त्यांनी त्यात काही केलेलं नसतं. (मला माझ्याच चॅनेलवर माझाच व्हिडीओ बघतानाही जाहिराती येतात! Lol )

जाहिराती आपोआप येतात. चॅनेलकर्त्यांनी त्यात काही केलेलं नसतं. (मला माझ्याच चॅनेलवर माझाच व्हिडीओ बघतानाही जाहिराती येतात! Lol ) >>> वावे, असे आहे तर!

पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या युटयूब चॅनेल्सला विशिष्ट संख्येत (मला पक्का आकडा माहित नाही) व्यू व सबस्क्राइबर्स असतात त्या चॅनेल्सना विविध कंपन्या त्यांच्या उत्पादकांच्या प्रचार व जाहिरातींसाठी संपर्क करतात (अर्थातच त्यात बहुतेक आर्थिक व्यवहार असतात). काही महिन्यांपूर्वी एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट खूप व्हायरल झाली होती. तिच्यावर म्हणे एका हिंदी मालिकेच्या सेटवर सहअभिनेत्रीची सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या एका प्रसिध्द आंतरराष्ट्रीय कंपनीची लीपस्टिक चोरल्याचा खोटा आरोप लागून मालिकेतून हकालपट्टी केली होती. पुढे त्याच मराठी अभिनेत्रीचे युट्यूब चॅनेल खूप नावारूपाला आल्यानंतर कंपनीने त्यांच्या लीपस्टिकची जाहिरात तिच्या युटयूब चॅनेलवर दाखवण्यासाठी संपर्क केला होता (अर्थातच सौंदर्यप्रसाधने बनवणर्या कंपनीला ही घटना माहीत नव्हती, त्यांनी अभिनेत्रीशी प्रचारासाठी संपर्क साधणे हा केवळ योगायोग होता).

अभिनेत्रीचं माहिती नाही.
यूट्यूब व्हिडिओमधून (हे प्रॉडक्ट मी वापरते, चांगलं आहे वगैरे) प्रॉडक्टची जाहिरात करायची असेल तर असा संपर्क करत असतील. पण अधेमधे ज्या जाहिराती लागतात त्या परस्पर लागतात. यूट्यूबवर हल्ली जाहिरातींचं प्रमाण खूप वाढलं आहे.

जर चॅनल monitize असेल तरच जाहिराती येतात, त्यांचा AdSense सुद्धा generate होतो, त्यामुळे प्रत्येक चॅनल वर जाहिराती येत नाहीत
जर एखाद्या चॅनलच १००० subs आणि ४००० तास watchtime भरला आणि content YT च्या नियमाला धरून असेल तर चॅनल monitize होतो.

यूट्यूब व्हिडिओमधून (हे प्रॉडक्ट मी वापरते, चांगलं आहे वगैरे) प्रॉडक्टची जाहिरात करायची असेल तर असा संपर्क करत असतील. पण अधेमधे ज्या जाहिराती लागतात त्या परस्पर लागतात. यूट्यूबवर हल्ली जाहिरातींचं प्रमाण खूप वाढलं आहे >>>> वावे, तुमचा मुद्दा आता लक्षात आला. उत्पादक कंपन्या सेल्फ पेड प्रमोशनसाठी संपर्क करत असाव्यात तथापि युट्यूबवर झळकणार्या जाहिराती ह्या सजेशन, सर्च हिस्टरी व प्रिफरेंसनुसार येत असाव्यात.

Pages