आमची माणसे, आमचा गौरव

Submitted by कुमार१ on 21 September, 2021 - 01:16

गणेशोत्सव संपताना एक कल्पना मनात आली म्हणून हा संकलन धागा उघडत आहे.

मराठी माणसे अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अशी काही माणसे आपापल्या क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळवतात. हे यश सर्वांसमोर यावे या उद्देशाने सामाजिक पातळीवर त्यापैकी काहींचे गौरव होतात, तर काहींना पुरस्कारही मिळतात. अशाप्रकारे गौरव झालेल्या सर्व मराठी माणसांच्या बातम्यांचे संकलन येथे व्हावे अशी कल्पना आहे.

संबंधित व्यक्ती ही मराठी भाषिक असावी. समजा, मराठी मातृभाषिक नसेल तर महाराष्ट्रात रुळलेली व मराठी बोलणारी सुद्धा चालेल. तिचे कार्य कुठल्याही क्षेत्रातले असेल - उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, इत्यादी. जर एखाद्या मराठी माणसाने बिगर मराठी भाषेत किंवा प्रांतात जरी कार्य केले असले तरी चालेल. अशा कर्तृत्ववान व्यक्ती सर्वांना माहीत व्हाव्यात या उद्देशाने हा प्रपंच.

धाग्याची सुरुवात खालील २ वाचलेल्या बातम्यांनी करतो :
१.
‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या विशेष कार्यक्रमात वाहिनीवर कार्यरत असलेल्या २५ लेखकांना गणेशमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. (https://www.loksatta.com/manoranjan-news/star-pravah-parivar-ganeshotsav...)
साधारणपणे टीव्ही असो वा अन्य मनोरंजन, पडद्यावरील कलाकारांच्या वाट्याला खूप प्रसिद्धी, गौरव वा पुरस्कार येतात. परंतु बरेचदा या कलांच्या मुळाशी असलेले पडद्यामागचे कलाकार मात्र तितके प्रकाशात येत नाहीत. या उपक्रमातून लेखकांचा झालेला गौरव हा मला कौतुकास्पद आणि दखलपात्र वाटतो.
................................................
२.
सोनाली नवांगुळ, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार.
(https://www.loksatta.com/pune-news/sonali-nawangul-dr-manjusha-ku-lakarn...)

तर येऊद्यात अशाच तुमच्या माहितीतील मराठी माणसांसंबंधीच्या गौरव बातम्या.
समजा, तुमच्या परिसरात देखील कोणी चांगले कार्य केले असेल, परंतु त्याला माध्यमातून प्रसिद्धी मिळाली नसेल तर अशा व्यक्तींसंबंधीही जरूर लिहा.
…………………………………………………………………………………….

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीमती शीला डावरे - भारतामधील प्रथम रिक्षा चालक.
https://www.youtube.com/watch?v=oiya8eToNwA&list=PLo4u5b2-l-fDF45J_cc9DY...
हा व्हिडिओ मी अनंत वेळा पहाते.
काय सुंदर बोललेल्या आहेत वा,

सामो, धन्यवाद.
पाहिला तो व्हिडिओ.

खरच कौतुकास्पद !
शीला यांचे अभिनंदन.

छान धागा. ..
सामो खूप आभार शीला डावरेंच्या व्हिडिओ साठी...प्रेरक

हा सुद्धा पहा - सुमन मोरे
https://www.youtube.com/watch?v=YXMpZ-d0mPM&list=PLo4u5b2-l-fDF45J_cc9DY...

कचरा वेचक या ताई, जिनीव्हाला लेबर मिटींगमध्ये गेल्या.
अक्षरक्षः वेचक आणि वेधक. नतमस्तक व्हावे अशी सत्यकथा.

मी खूपदा ऐकते.

सामो, .दसा
तुम्ही दोघांनी दिलेले दुवे उत्तम आहेत.
त्यापैकी कमलताई यांचा कार्यक्रम मी पूर्वी पाहिला होता.

केंद्रीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या ‘माती पंख आणि आकाश’ या पुस्तकाला गुजरात साहित्य अकादमीचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.

(संदर्भ : छापील सकाळ, 22 सप्टेंबर 2021)

कोविड १९ च्या भारतातील संशोधनात मिळालेला एक महत्त्वाचा पुरस्कार :
श्री. शैलेंद्र कवाडे
अध्यक्ष व कार्यकारी संचालक,
मायलॅब diagnostics यांना

ET Startup Award मिळाले होते.

https://economictimes.indiatimes.com/tech/startups/et-startup-awards-202...

मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सम्मान पुरस्कार . त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला.

https://maharashtratimes.com/dr-sharankumar-limbale-declears-saraswati-s...

Analytics इंडिया या नियतकालिकाच्या वतीने दरवर्षी AI क्षेत्रातल्या 50 नामवंतांची यादी जाहीर होते. यंदा या यादीत दीनानाथ खोलकर, उपाध्यक्ष, टीसीएस यांचा समावेश झालेला आहे.

https://analyticsindiamag.com/50-most-influential-ai-leaders-in-india-2021/

>>>अंबिका मसाले
कमलताई परदेशी
https://youtu.be/U9KDLFMcYXo

आत्ता ऐकते आहे. काय जिद्द आहे कमलताईंची. किती स्मार्टनेस, व्यवहारज्ञान, बोलण्यामधील कौश ल्य. खरच कर्तूत्ववान आहेत.
दसा, या दुव्याबद्दल लाख लाख धन्यवाद.

झोपडं नव्हतं, दिवसाचे ८ रुपये कमावत. पण त्यांनी ११ महीलांनी मिळून बचत गट काढला काय. कुठच्या कुठे भरारी घेतली.

>>. काय जिद्द आहे कमलताईंची. >> +१००
सलाम !
सर, इथे फक्त नव्या पुरस्कारानं बद्दल लिहायचे की जुने पन चालेल ? किती पर्यंत जुने चालेल ?

साद
तसं काही नाही
आपण सगळे मिळून ठरवू तसे.
मला वाटतं की साधारण 2019 पासून घ्यायला हरकत नाही

दु प्र

कमलताईंची मुलाखत ऐकायला घेतली आणि पूर्ण ऐकल्याखेरीज फोन खाली ठेववेना.
उपजत हुषारी आणि अनुभवाने आलेले शहाणपण, वात्सल्य, धैर्य....किती किती म्हणून सांगावे त्यांच्या बद्दल.
धन्यवाद दसा ही लिंक इथे दिल्याबद्दल.

आता देशाच्या संरक्षणाची धुरा मराठी खांद्यावर असणार आहे. कारण संरक्षण दलाच्या तीन प्रमुख दलांपैकी दोन दलांचे प्रमुख एकाच वेळी मराठी व्यक्ती असणार आहेत.

एअर चीफ मार्शल विजय चौधरी यांनी देशाचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
त्यानंतर हा अनोखा योग जुळून आला आहे. सध्या लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे हे काम पाहत आहेत.

पुण्याच्या 'एन आय ओ' संस्थेचे नेत्रतज्ञ डॉ. आदित्य केळकर यांना अमेरिकी नेत्र ( रेटिना) तज्ञांच्या संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा र्‍हेट बकलर पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाला आहे.

हार्दिक अभिनंदन !!

ज्येष्ठ जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेश गोखले यांची केंद्रीय जैव तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती संशोधकांसाठी प्रेरणादायी आहे. या विभागाच्या स्थापनेनंतर गेल्या ३५ वर्षांत प्रथमच एका मराठी संशोधकाची त्याच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
अभिनंदन !

https://maharashtratimes.com/editorial/manasa/inspirational-vijnaneshwar...

नुकताच आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील पाच लष्करी अधिकारी व जवानांचा विविध पदके देऊन गौरव करण्यात आला.
त्यातील काही नावे :

• एअर मार्शल प्रदीप बापट
• व्हाइस एडमिरल किरण देशमुख

• एअर व्हाईस मार्शल निखिल चिटणीस
• एअर कमोडोर मकरंद रानडे

अभिनंदन !

छाया-प्रकाश फाऊंडेशनचे पुरस्कार :

१. सोलापूरच्या जिव्हाळा अपंगमती विकास संस्थेला एक लाख रूपये आणि मानपत्र असलेला ऊर्जा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

२.तसेच पंढरपूरच्या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी’ प्रकल्पाला ७५ हजार रूपये आणि मानपत्र अशा स्वरूपाचा दुसरा ऊर्जा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे.

अभिनंदन !

Pages