खास लोकाग्रहास्तव गणेशोत्सवातल्या सगळ्या स्पर्धा आणि उपक्रमांची तारीख रविवार २६ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे.

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 20:32

खास लोकाग्रहास्तव गणेशोत्सवातल्या सगळ्या स्पर्धा आणि उपक्रमांची तारीख रविवार २६ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे.
सगळ्या स्पर्धांची यादी इथे पाहता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol सी.

म्हणजे आता कमलाच्याही पालेभाजी, उपवासाच्या रेशिप्या येणार तर!

धन्यवाद हो.
भाग घ्यायची इच्छा आहे.(घरात नेहमीप्रमाणे इन्व्हेंटरी चा उजेड आहे Happy )

मस्तच..धन्यवाद !!
मजा येतेय उपक्रम, खेळ यात सहभागी व्हायला.

सी Lol भारीच

बरे केलेत. एक पालेभाजी डोक्यात शिजतेय, ती टोपात आणि तिथुन मायबोलीवर यायला आजचा दिवस पुरला नसता म्हणुन काळजी वाटत होती. आता घाई करुन पालेभाजी टोपात घ्यायला हवीच.

मी_अनु, इकडे ये मग. पाककृती स्पर्धेत भाग घ्यायला असेल तर इथे घराबाहेर पाऊल टाक्ले की ढिगाने कच्चा माल पसरलेला आहे. Happy

अरे वा, छानच!

रच्याकने: हा लोकाग्रहास्तव कुठे व कसा झाला?

म्हणजे पुढच्या वेळी त्यात सहभागी व्हायला विचारतोय.

अहो, लोकांनी केले असतील व्हॉट्स्अप कॉल्स आणि मेसेजेस अ‍ॅडमिन आणि सण्योजकाना.... तुम्ही मिळालेल्या सन्धीचा फायदा घ्या कसा तो....

अरे वा!!

संयोजक, खूप छान उपक्रम राबवले यंदा!

>>>>>उपक्रम छानच. पण आता कंटाळा आला. कुठे वाढवताय मुदत ? >>>> +१०००

मर्यादेत गोडी असते.

मला यावेळचे उपास वाले चॅलेंज आवडले आहे.अगदी स्वतःला एन्ट्री टाकायला नाहै जमले तरी छान छान पदार्थ मिळतील, पुढची महाशिवरात्र वगैरे साजरी करायला.
साधना, इथेही आहे कच्चा माल भरपूर, फक्त घराबाहेर पडण्याचे बोरत्व आड येतेय Happy

मी उत्सव संपला की टाकायला रंगकाम तयार ठेवले होते आता तो ही बाफ पुढे गेला. त्यात अजून रंगवता येइल.

मतदान सर्वांचे सुरू झालेय का?
मला एकच सापडली लेखन स्पर्धेची. ती देखील अपघातानेच.
कुठेतरी वर एका नवीन धाग्यात टाकता येईल का या मतदान लिंका?

मी देखिल हेच लिहायला आले. सर्व मतदानाच्या धाग्यांच्या लिंक्स एका धाग्यात देऊन तो वर सतत दिसेल असा ठेवावा. खरंतर प्रत्येक स्पर्धेच्या मतदानाच्या धाग्यावर त्या त्या स्पर्धेकरता आलेल्या सर्व प्रवेशिकांच्या लिंक्सही द्यायला हव्या. जेणेकरून मत देण्याआधी कोणाला सर्व प्रवेशिका बघायच्या असतील, काही प्रवेशिका बघायच्याच राहिल्या असतील तर चटकन उपलब्ध असतील.

वाहत्या धाग्यांवर मतदानाच्या धाग्यांच्या लिंक्स देऊन मायबोलीकरांना मतदान करण्यास सांगावे.

सामो धन्यवाद.

मुदत वाढवली, ते मला आवडलं, माफक का होईना फोटो पोस्ट करता आले, धन्यवाद.