काजू मैसूर

Submitted by इवाना on 18 September, 2021 - 05:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. साखर एक कप.

२. काजू पावडर एक कप. ( मिक्सरमधून हलकेच करायची).

३. तूप दीड कप.

४. वेलची पूड एक छोटा चमचा.

५. पिस्ता कत्रण सजावटीसाठी.
फोटो १
पदार्थ . काजू पावडर, तूप, साखर.

क्रमवार पाककृती: 

१. साखर भिजेल एवढे पाणी घालून मंद गॅसवर गरम करा. पाक करायचा नाही, साखर विरघवळवून शिजू लागेल एवढेच.

२. कढईत तूप गरम करायला सुरू करणे.

३. साखरेच्या पाकात काजू पावडर घालून शिजवणे.पाच मिनिटे. वेलची पूड टाका.

४. गरम कडकडीत तूप पाकातल्या काजूवर थोडे थोडे सोडत जलद एकाच दिशेने ढवळत राहाणे. याप्रमाणे सर्व तूप टाकायचे आहे.

फोटो २
कढत तूप घातल्यावर जाळी पडू लागते

५. मिश्रण शिजत असताना ते हलके वाटू लागले की तयार झाले. ते एका ट्रेमध्ये ओतायचं.

६. यावर पिस्ता कत्रण वरून टाकायची. पूर्ण गार व्हायला वीस मिनिटे लागतात. त्या अगोदर थोडे मऊ असतानाच सुरीने वड्यांसाठी कापायचं.

७. झाले काजू मैसूर तयार.

फोटो ३
काजू मैसूर

वाढणी/प्रमाण: 
आठ मोठ्या मैसूरवड्या होतात. जाळी पडल्याने काजू पावडर पसरते.
अधिक टिपा: 

१. पाक फार चिकट करायचा नाही.
२. पाकात तूप जिरून शिजायला वेळ लागतो तेव्हा जलद ढवळणे.
३. वड्या योग्य वेळी न कापल्यास भूगा होतो.
फोटो ४
ट्रेमध्ये कापून.

माहितीचा स्रोत: 
कलर्स गुजराती चानेल - रसोई शो कार्यक्रम.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आहाहा!
पण आम्हाला खाणे शक्य नाही. फोटो पाहूनच ३७ ग्रॅम वजन वाढले. Sad