Submitted by ललिता-प्रीति on 17 September, 2021 - 10:58
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
त्याचवेळी वरचा दिवा लागतो. दारावरची ‘सुकेत गोहिल’ पाटी; आम्ही ‘सुकट’ गोहिल म्हणतो. आंघोळीला जायच्या तयारीत दिसतोय... खांद्यावर टॉवेल, गीझरचं पिरपिर पाणी बादलीत पडतंय...
“अं-कल, टू-वन-झिरो-सेव्हन-ची-चा-वी...?”
उद्याच्या विचारानं पोटात खड्डा पडतोय. असंच होतं का सगळ्यांना? मूव्हीजमध्ये तर किती कॅज्युअली दाखवतात!
सुकट कसला बघतो... त्याला डाऊट आलाय? येऊ दे... पहिलं हर्डल तर पार झालं. थंडगार की-चेन, माझ्या हाताला फुल्ल घाम!
लोक्याचा प्लॅन कमाल आहे. एक्झिक्यूट करताना माझीच बोंब आहे. It takes TWO to... येईल ना ती उद्या? What the hell!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
सुकटला लोक्याच्या घरातून टँगोच्या स्टेप्स आणि मुझिक ऐकू आले नाही म्हणजे झाले.
मस्त..
मस्त..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आवाज नाही येणार. बहुतेक एकदम चिडीचूप असणार आहे.
वाचन कमी पडतय. कोण लोक्या?
वाचन कमी पडतय. कोण लोक्या? कळले नाही. असो.
मलाही नाही कळली
मलाही नाही कळली
हॉटेलमध्ये प्रियकर - प्रेयसी
हॉटेलमध्ये प्रियकर - प्रेयसी भेटणार आहेत, किंवा याला तिचा संपवायचं आहे किंवा आणि काही तरी प्लॅन नुसार करायचं आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
यातील कॅरेक्टर्सना काही पार्श्वभूमी असेल तर मात्र माहित नाही. शीर्षक चावी आहे, सो की वर्ड हा की आणि ही की आहे