शशक पूर्ण करा - थकवा - राखी

Submitted by राखी on 16 September, 2021 - 14:09

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो. कुणीतरी आत आल्याची चाहुल. कुठुनतरी दुरून दोन बायकांचा बोलण्याचा आवाज येतोय. त्यांचा साधारण सूर आनंदी, उत्साही वाटतोय. पण तो संवाद माझ्या मेंदुपर्यंत पोहोचतच नाहीये. डोळे उघडायचेदेखिल त्राण नाहीयेत. एवढं गलितगात्र कधीच वाटलं नव्हतं. सात दिवस सात रात्री ह्याच पलंगावर झोपुन काढल्या तरीही हा थकवा जाईल असं वाटत नाही. कोणीतरी एक उबदार गाठोडं माझ्या छातीशी आणुन ठेवलंय. माझ्या गालावर एक मऊ मुलायम स्पर्ष. कुठुन तरी ५ हत्तींचं बळ आलंय, डोळे उघडुन आयुष्यातली पहिलीच आंघोळ करून विसावलेल्या माझ्या बाळाकडे पहायला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!

धन्यवाद सर्वांना Happy आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी कथा सदृश लिहायचा प्रयत्न केला. हे बाईट साईझ बरं पडलं त्या दृष्टीने Happy