माझ्या आठवणीतली मायबोली- अश्विनी११

Submitted by अश्विनी११ on 16 September, 2021 - 07:35

२५ वर्षे !!!! खरंच खूप मोठा काळ आहे. २५ वर्षात काय बदलत नाही ? पण या सगळ्या बदलाबरोबर स्वतःला तांत्रिक दृष्ट्या अद्ययावत ठेवत , एक मराठी संकेतस्थळ असूनही सभासदांशी ‘ युजरफ्रेंडली ‘ नाते तयार करणे कौतुकास्पद आहे . त्याबद्दल सर्वप्रथम वेमा यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!!

माझी मायबोलीशी ओळख झाली २००७ / २००८ मध्ये. इतके वर्ष वाचनमात्र होते .२०१६ साली झालेल्या गणेशोत्सवातील स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणून सभासदत्व घेतले ...आणि आज ५ वर्षानंतर गणेशोत्सवात पहिल्यांदाच लिहित आहे .

मायबोली ची गोडी लागली बेफिकीर यांच्या कथा/कथामाला वाचून .जोडीला धुंद रवी आणि कौतुक शिरोडकर यांचे विनोदी लेखन होतेच . जिप्सी , रोहित ...एक मावळा यांचे गिर्यारोहणावरचे लेख वाचून दुर्गभ्रमंतीतील अनेक नवीन गोष्टी कळल्या . जिप्सी यांची फोटोग्राफी विशेष आवडायची.

दिनेशदा यांचे पाककृतीवरचे लेख छान असायचेच पण त्यांनी केलेले ‘ प्लेटिंग ‘ हि खास असायचे . जागू यांच्या निसर्गाच्या गप्पा मुळे मायबोलीवरचा वावर वाढला . अनेक नवनवीन झाडे /फुले बद्दल माहिती मिळाली. साधना , निरू यांच्या लेखांमुळे निसर्गावरचे प्रेम अजूनच वाढले .

मी-अनु , स्वप्ना-राज यांचे हलकेफुलके लेख आवडीने वाचले जातात . अजूनही पारायणे होतात . मनीमोहर यांचे लेख जुन्या काळात फिरवून आणतात. डॉ .सुरेश शिंदे आणि कुमार सरांचे आरोग्यावरचे लेख जरूर वाचले जातात . कुमार सरांच्या शब्दखेळ धाग्यामुळे मी प्रतिसाद लिहायला सुरुवात केली .

मायबोली चे अनेक उपक्रम आवडले .जसे कि वर्षाविहार, मराठी चित्रपटाचे माध्यम प्रायोजकत्व . वर्षाविहार / गटग ला कधी उपस्थिती लावली नाही कारण अनोळखी लोकांबरोबर संवाद साधण्याची भीती वाटते. मात्र त्यांच्या सचित्र वृतांतानी मायबोलीकरांची ओळख करून दिली.
इथल्या विचारपूस किंवा संपर्क सोयीमुळे इतर सभासदांशी संपर्क साधता येतो हे आवडले . फोटो अपलोड करायची प्रक्रिया मात्र थोडी किचकट वाटते.

पहिल्यांदाच लेख लिहिला आहे त्यामुळे थोडा विस्कळीत वाटण्याचा संभव आहे .पण या विषयामुळे आपण मायबोलीवर लिहावे असे प्रकर्षाने वाटले . वाचनमात्र मधून बाहेर येऊन लिहिते व्हावे असे मनापासून वाटल्याने हे धाडस केले आहे . संयोजकांनी हि संधी दिल्याबद्दल त्यांचेही आभार !!!!

पुढील यशस्वी वाटचालीसाठी मायबोलीला खूप खूप शुभेच्छा !!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिलाच लेख असला तरी प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद !!!

छान!