मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !
१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.
प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)
उदा: श्री गणेशाय नमः
ह
(रात्र काळी घागर काळी या चालीवर )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !
य
कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल.
हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
>>>>कोण ना लसवंत,
>>>>कोण ना लसवंत,
कोण लसवंत येथे आहे
कोणा ना उसंत म्हणायचे आहे का? कळले नाही.
--------------------
कळलं कळलं. देवीस सर्व ठाउक आहे असा अर्थ. कोणी लस घेतली कोणी नाही ते.
ह्याचो बुडताय ताजा लेख
ह्याचो बुडताय ताजा लेख
साळकाय माळकायका साकडा घालताय
प्रतिसाद देवाकच्या इनवन्या करताय
काय… नवीन प्रतिसाद नाय दिसता
ह्याचो बुडताय ताजा लेख
(माजो लवताय डावा डोळा)
गटणे मोड ऑनः
प्रेरणा : सामो यांचे ‘माजे राणी माजे मोगा’वर आधारीत मागच्या पानावरचे काव्य.
गटणे मोड ऑफ
सामो, हपा, स्वाती, कविन
सामो, हपा, स्वाती, कविन
देवीस सर्व ठाउक आहे असा अर्थ.
देवीस सर्व ठाउक आहे असा अर्थ. कोणी लस घेतली कोणी नाही ते.>>
बरोबर सामो. ते उसगावच्या / इथल्या काही जनतेच्या संदर्भाने लिहिले आहे. लस तर घ्यायची नाही आणि घेतली म्हणून बोगस कार्ड दाखवायचे.
प्रेरणा : सामो यांचे ‘माजे
प्रेरणा : सामो यांचे ‘माजे राणी माजे मोगा’वर आधारीत मागच्या पानावरचे काव्य.>>
गजानन
खेळ मांडीयेला गणेशाच्या पायी
खेळ मांडीयेला गणेशाच्या पायी
प्रसविली जाती यमके हो
वृत्त यतीभंग विसरले बंध

काव्य हहगोलांटणी होती
वाचके देती इथे प्रोत्साहने
पाषाणा पाझर सुटती रे!
सगळेच मस्त लिहितायेत !
सगळेच मस्त लिहितायेत !
रंगुनी बाफांत सार्या, बाफ
रंगुनी बाफांत सार्या, बाफ माझा वेगळा

गुंतुनी वादांत सार्या पाय माझा मोकळा
दूषणे येती कपाळी ती सुखाने सोसते
कॉम्प्लिमेन्ट्सच वाटती कॉमेन्ट्स ज्या ज्या ऐकल्या
या दुषणांनो परत फिरा रे
या दुषणांनो परत फिरा रे लेखांवरी तुम्ही या.. संपला
गणेशो त्सव संपला.
दहा दिसांचा सरला इथला सौजन्याचा पूर
अशा प्रसंगी असू नका रे टोची पासून दूर
कुजबुज करिती लोक उगा का
चिंता मिटवुनी या
गणेशोत्सव संपला
(No subject)
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का
गणेशोत्सव संपल्यावर कोणी रुसेल का ||धृ||
कोणीतरी सर्वांचा अंत पाहील का
सौजन्यावरती सार्या पाणी फिरवील का
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
नन्नाचा पाढा कोणी मोजेल का रे तीनदा
भोलानाथ मजा फारच आली या वरषी
तरी तक्रारखोरांचीच होइल का रे सरशी
(No subject)
>>>>>>या दुषणांनो परत फिरा रे
>>>>>>या दुषणांनो परत फिरा रे लेखांवरी तुम्ही या.. संपला
भन्ना-ह-ट जमलय हे विडंबन.
गणेशो त्सव संपला.
>>>>>>>>>>दहा दिसांचा सरला इथला सौजन्याचा पूर
हाहाहा
>>>>>>कुजबुज करिती लोक उगा का
चिंता मिटवुनी या
गणेशोत्सव संपला Proud
लोल
:Lol: :Lol: :Lol: अमितव !!
अमितव !! मस्त!!
या दुषणांनो परत फिरा रे
या दुषणांनो परत फिरा रे लेखांवरी तुम्ही या.. संपला
गणेशो त्सव संपला.
दहा दिसांचा सरला इथला सौजन्याचा पूर>>
भारी आहे हे, अमितव
& विजेते आहेत अमित
& विजेते आहेत अमित
चाल : माझ्या सारंगा राजा
चाल : माझ्या सारंगा राजा सारंगा
शिणलो पुरा, नीज डोळा मावेना आता रे मांजरा (शब्दसौजन्य :मी_अनु)
सायबा मांजरा, सायबा मांजरा चल जाऊ दे घरा
मध्यरात्र टळली, बग परी ना फिक्सला
तू मागवलेला पिझा कधीचा पोटी कोपऱ्यात बैसला
पाहीन उद्याला दुष्ट त्या बगाकडे
बगाची शपथ मम वचन तू हे मान खरे
मांजरा आता रे, चल जाऊ दे घरा ..
राजसा जवळी नको बसा
राजसा जवळी नको बसा
खोकला हा कसा .. लशिविण बाई
कोणती घेऊ vaccine सांगा तरी बाई
त्या दिवशी नंबर होता माझा
चुकून लागला तुझा..गोंधळ भलताच
भलताच माजला काहूर.....नेट कोमात
चालः तुझ्या माझ्या संसाराला -
चालः तुझ्या माझ्या संसाराला -
तुज्या माज्या आरोग्याला आनि काय हवं?
तुज्या माज्या दंडावर व्हॅकशीण नवं
नवं व्हॅकशीण घेऊनि काय होईल?
बाकी काई न्हाई आक्षी दंड त्यो दुखेल
नर्स येईल, सुई मारील, पट्टी लावील, घरी धाडील
हरपा ... लै भारी !
हरपा ... लै भारी !
(No subject)
(No subject)
लागे..दंडावरी डाग ठणका हा
लागे..दंडावरी डाग ठणका हा शमेना
लागे...
गोरी काया लाल रक्तिमा लस ही मायाजाल
नव्या लाटेवरी तुटली वल्ही करत बसा पीसीआर
दूsरी ठेवुनी ... जवळीक साधू कशी. लाईन मारू कशी
लागे दंडावरी डाग
(No subject)
(No subject)
अखेरचे येतील माझ्या ..
अखेरचे येतील माझ्या ..
शेवटचे Sputnik माझ्या आले दंडा वरती
लाख attempt केले तेव्हा ..
नर्स माझ्या भोवती
तव चरणा वंदून करतो सुरुवात
तव चरणा वंदून करतो सुरुवात गणराया रे
नको कुणाचे मन दुखू दे लागतो तुझ्या पाया रे
शीघ्रकवितेत माझ्या होईलही टिंगलटवाळी
Admin चे थोडे दुर्लक्ष असू दे नको पुन्हा आयडू जाया रे
हा धागा आत्ता वाचला मी ,
हा धागा आत्ता वाचला मी , जबरदस्त आहेत सगळे कवी आणि कविता ही
काय धम्माल चालुय इथे! एकसे
काय धम्माल चालुय इथे!
एकसे एक आहेत सगळे कवी!
रामराया चरणी सदा लीन व्हावे
रामराया चरणी सदा लीन व्हावे
सदा राम भक्तीत वाहून घ्यावे
सदा सत्यवचना तू आचरावे
मुखी रामनामा सदा घेत जावे
Pages