मोठा गट - आकारा येई बाप्पा- स्वाती आंबोळे - आदित्य

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 September, 2021 - 13:23

आदित्यने पूर्वी कधीतरी मायबोलीचं सदस्यत्व घेतलं होतं असं मला वाटतंय, पण नक्की आठवत नाही.
त्यामुळे मोठ्या गटात असला तरी शीर्षकात त्याचं नावच दिलं आहे.

दुसर्‍या फोटोतली मूर्ती मॉडेलिंग क्ले वापरून आदित्यने घडवली होती आणि उंदीरमामा गौरीने. रंगकाम दोघांनी मिळून केलं होतं.

IMG_1244.JPGIMG_2050.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आहे मूर्ती! रंगसंगतीही मस्त.

मागच्या चक्रावरची आतली-बाहेरची बॉर्डर आणि मधली नागमोडी नक्षीही फार सुरेख आली आहे. ती कशी बनवली आहे?

ओह ते चक्र त्याने नाही बनवलेलं, एका सेटमधलं वापरलं बॅकग्राउंडसाठी. पण तो बहुधा दोरा चिकटवला आहे रंगाखाली.

फार सुंदर.
बाप्पा चे डोळे बोलके आहेत एकदम.

फार सुंदर.
बाप्पा चे डोळे बोलके आहेत एकदम.
>>> मी ही असेच म्हणतो.

फार सुंदर.
बाप्पा चे डोळे बोलके आहेत एकदम.>>+१

होय फार बोलके झालेत डोळे. डोळ्यांतून हासतोय. इतक्या जिवंत मूर्तीचे विसर्जन नको वाटेल Sad
वेगळच करुण टर्न देण्याबद्दल माफ करा.

छान

यंदा आकारा येई बाप्पा या उपक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व मायबोलीकरांच्या बालगोपाळांसाठी विशेष पुरस्कार देण्यात येतोय.

******* अभिनंदन आदित्य *******

हस्तकला उपक्रम - आकारा येई बाप्पा - मोठा गट - विशेष- आदित्य.jpg

Pages