मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !
१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.
प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)
उदा: श्री गणेशाय नमः
ह
(रात्र काळी घागर काळी या चालीवर )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !
य
कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल.
हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
काढु द्या हो धागे
काढु द्या हो धागे
काहुन थांबवता.. बोअरच्या नावाने..
-काहे को बुलाया मुझे बालमा...
लोल काय हे
लोल काय हे
तू का म्हणे केले तुका झाले
तू का म्हणे केले तुका झाले माका रे ना?
केले तुका झाले माका म्हणे माकारेना
ए माकारेना ए माका रे ना।
(स्वाती यांच्या पोस्टच्या शेवटच्या त अक्षरावरून.)
(No subject)
@ मानव वारले!!! चालीत म्हणता
@ मानव वारले!!! चालीत म्हणता येतय लोल

(No subject)
वाचवाचुनी अति मी दमले
नाहि कशी म्हणू तुला देते प्रतिसाद
परि चार दीस नविन घालु नको वाद!
नेऊ नको आयडीला
नेऊ नको आयडीला
अॅडमिना...
नेऊ नको आयडीला
क्रूर अॅडमिना नकोस नेऊस
माझिया आयडीला... नेऊ नको आयडीला
lol कन्टिन्यू गजाभाऊ.
lol कन्टिन्यू गजाभाऊ.
नाहि कशी म्हणू तुला देते
नाहि कशी म्हणू तुला देते प्रतिसाद
परि चार दीस नविन घालु नको वाद!
<<< स्वाती,
माझे गाणे बाद धरायचे ना?
माझे बाद - तुम्ही आधी लिहिलंय
माझं बाद - तुम्ही आधी लिहिलंय.
ओके.
ओके.
मग 'ल' वरून कोणीतरी पुढचे येऊ द्या.
@गजानन वाह!!! अक्रूरा नकोस
@गजानन वाह!!! अक्रूरा नकोस नेऊ ...... आवडते गाणे आहे. तुलनाही मस्त जमलीये.
लेऊ लेनं गरीबीचं शेल्फी घिऊ
लेऊ लेनं गरीबीचं शेल्फी घिऊ रं लगीच
पोष्ट करू वॉलवर, लाइक्स घेऊ जालावर
कुनी काई म्हनू दे!!
फ्येसबुकच्या द्येवा तुला रोज रोज पाहुदे
क्लाउडमधून माया तुजी…
लबाड संयोजकं ढ्वांग करतय
लबाड संयोजकं ढ्वांग करतय
स्पर्धा करायचं स्वांग करतय.
अवं सार्यांना कामाला जुंपलय बघा
अन साधुन चुप्पी स्वतः बघतय मजा
लबाड संयोजकं ढ्वांग करतय
स्पर्धा करायचं स्वांग करतय.
हाहा सामो, पुन्हा एकदम पडल्या
हाहा सामो, पुन्हा एकदम पडल्या का!
चालवा कुठलंही अक्षर.
सगळेच
येस
याड लागलं गं याड लागलं गं
याड लागलं गं याड लागलं गं
दंगलं माबोवर याड लागलं गं
प्रतिसाद ह्यो धाग्यावर येई आयड्यांचा
रंगलं खेळात याड लागलं गं
(चालवून घ्या कायपण
)
>>>>>मला कै जमेच ना बै
>>>>>मला कै जमेच ना बै मराठीतून
मॄ जमलय तुला. आणि हिंदी चालल की, विंग्रजी बी पळल.
सामो
सामो
गोमु संगतीनं माझ्या तू
गोमु संगतीनं माझ्या तू लिहिशील काय?
माझ्या लेखावर लाईक्स तू देशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी लिहिणार नाय !
तुझ्या लेखांवर लाईक्स मी देणार नाय !
ग तुझ्या लाईक्सच मोलं, जनु सोन्याचा मालं
माझ्या दिलात झोलं, त्याचा सुटलाया तोलं
माझ्या लेखाला, लाईक्स आले बारा बारा बारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या बकवास या लेखाला, अशी मी भुलणार नाय
आरं संगतीनं तुझ्या मी लिहिणार नाय !
तुझ्या लेखांवर लाईक्स मी देणार नाय !
मस्त
मस्त
(No subject)
ये ग सना ये गं सना ( सना
ये ग सना ये गं सना ( सना-शेजारीण
)
खाऊ घाल तुझ्या मना
वडी माझी अळुवाली
सना बघे गट्टम करू
नको नको म्हणताना
नको नको म्हणताना
गंध गेला शेजार्यांना
ये गं सना ये गं सना
कविन, बारा बारा बारा... चालीत
कविन, बारा बारा बारा... चालीत म्हणून बघितले.
सामो, धन्यवाद.
मगाशी 'ग' आलेला आता पुनरपि
मगाशी 'ग' आलेला आता पुनरपि कधी येईल माहीत नाही.
पण त्या वेळी लिहीलेली कविता देते आहे. याचा शेवटचा शब्द धरु नका. कारण ही फाऊल कविता आहे.
-----------------------------
रेशमाच्या धाग्यांनी ..... ची चाल.
गणेशाच्या कृपेनी, गौराईच्या पायानी
माबो वाढदिवस पार पड SSS ला,
दॄष्ट नका लावु माझ्या माबोला.
दॄष्ट नका लावु माझ्या माबोला.
जुनी जाणती मंडळी 'नेट'की
नवीनही भर त्यात टाकीती .......... हो टाकीती
खेळ असे भारी भारी
आहेत की जोडीला
सोडा प्रतिभेचा वारु
मोकळाSSS सोडा प्रतिभेचा वारु मोकळा
दॄष्ट नका लावु माझ्या माबोला.
दॄष्ट नका लावु माझ्या माबोला.
--------------------------------------------------------
'न' आलेला आहे कारण मॄ ची
'न' आलेला आहे कारण मॄ ची कविता.
ने मजसी ने परत मायबोलीला
ने मजसी ने परत मायबोलीला
घाबरा प्राण तळमळला
नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा
मज मायबोलिचा तारा
संकेतस्थळे एक एक जरि भारी
परकीच वाटती सारी
हिजवीण नको प्रतिसादांच्या राशी
इथलीच धुमाळी खाशी
सर्फिणे व्यर्थ हे आता रे, बहु जिवलग गमते चित्ता रे तुज सरित्पते जी सरिता रे
तद्विरहाची शपथ घालतो तुजला
नेटवरच्या रेझ्युमी वरुनी फिरो
Pages