टीप : मनातलं कंसात लिहीत आहे. ते वाचू नये.
तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले,?
खूप अवघड आहे. बदल म्हणाल तर आयडींची नाव बदललीत असं जाणवलं. दुसरं म्हणजे काही आयडींची धास्ती वाटू लागली तर काही आयडींना माझी धास्ती वाटत असावी हा एक बदल जाणवला.
इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
ड्युआयडीची.
कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती
विरोधकांचे ड्युआयडी उडवण्याची.
गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं ?
२५ च्या मधे तिरकी रेष हवीय का ? अशा प्रश्नांनी मन:स्ताप दिला असावा.
तुम्ही मायबोलीला काय दिलं
या प्रश्नामुळे भावूक झालो. एव्हढं दिलं तरी जाणीव नाही या भावनेने डोळे पाणावले.
तुमचं कुठलं लेखन गाजलं,
(असं नेमक सांगणं शक्य नाही. माझं लिखाण जागतिक दर्जांचंच असतं. माबो नामक डबक्यातील पामर आयड्यांना ते काय समजणार ? त्यांना डबक्यातलेच लिखाण आवडते) उघड - स्वत:च स्वतःबद्दल काय सांङावे. ते तर इतरांनी बोलायला हवे ना ? सध्या तरी या कॅटेगरीत स्वतःचा समावेश करत नाही. ( विनय दिसला ना ?)
कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
( दर्जेदार लिखाणाची सवय नसल्याने कदाचित गांजले असावे. खरे म्हणजे आपसातच पाठ खाजवण्याच्या प्रकाराने मीच गांजलो आहे. उघड या प्रश्नाला वेगळेच उत्तर द्यायला हवे). तसे माझे सगळेच लिखाण माबोकरांना गांजण्यासाठीच होते आणि आहे. पण तरीही मी लिहीत असतो आणि मायबोलीकर मला सहन करतात यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे.
तुम्ही मायबोलीला काय दिलं
तुम्ही मायबोलीला काय दिलं
या प्रश्नामुळे भावूक झालो. एव्हढं दिलं तरी जाणीव नाही या भावनेने डोळे पाणावले.>>
(No subject)
(No subject)
(No subject)
हटके लिहीले आहे. आवडले.
हटके लिहीले आहे. आवडले.
(No subject)
धन्य!!
धन्य!!
मस्त हटके लिहीलेय.
मस्त हटके लिहीलेय.
या प्रश्नामुळे भावूक झालो. एव्हढं दिलं तरी जाणीव नाही या भावनेने डोळे पाणावले.>>>>>
हे कंसात टाकायला विसरलात. कृपया दुरूस्ती करा..।
अगागागा...
अगागागा...
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
एक राहूनच गेलं. सिरीयसली.
कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती >>> आपल्या बद्दल कुठे काय लिहीले आहे, कुणाला विपू केली आहे हे पाहण्याची सोय. अजूनही माहीत नाही.
(No subject)