- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय
मायबोलीला २५ वर्षे झाली पण, पंचविशीतल्या मायबोलीचं मनापासून अभिनंदन !
मायबोलीवर मला आता सोळा वर्ष होऊन गेली. तेव्हा पुणे सोडून अमेरिकेच्या बे एरियामध्ये आल्यावर, मायबोली अगदी अचानक सापडली आणि तेव्हाच्या नव्या देशातल्या नवेपणात मायबोलीने सुरवातीला रुळायला खूप मदत केली. अगदी कुठे काय चांगल मिळतं, खाद्य प्रकार, भटकंतीची ठिकाणं, ऑनलाईन सण उत्सव कार्यक्रम ते मायबोलीवरील येणारे मराठी साहित्य, चर्चा, वेगवेगळे मतप्रवाह, माहिती, वाचन, गप्पा, मराठी बोलण्याची हक्काची जागा, गप्पा मारायला हक्काची मित्रमंडळी पण!
माझ्या पहिल्या वहिल्या (न घडलेल्या) जीटीजीचा किस्सा मात्र खास आहे!
मायबोलीवर अगदीच नवीन असताना , कुणाशी माझी काही ओळख नसताना बेकरीवरची मंडळी भेटायचा बेत ठरवत होती. तेव्हा त्यांना जाऊन भेटून बघू, पण हे खरचं भेटत असतील का अशीच मजा सुरु असेल असं वाटल्याने नवर्यासकट भेटीच्या ठिकाणी पोचले. तर तिथे कुणाचाच पत्ता नाही. मग वाट बघून मी आणि नवरा आम्ही दोघच ठरलेल्या ठिकाणी खाऊन पिऊन घरी आलो. टोमणा मारणार नाही तर नवरा कसला, तुमचं माबो GTG " म्हणजे "गेला तो गंडला" असेल असं ऐकाव लागल. मग नंतर समजलं की साधारण एकाच नावाची दोन रेस्टॉरंट जवळ पास होती, आणि माबोकर दुसर्या ठिकाणी असं झालं होतं.
मग नंतर पुढे जरा बेकरी धाग्यावर, ईतरत्र थोडफार प्रतिसाद लिहून ओळखी झाल्या, जीटीजी मध्ये प्रत्यक्ष सगळ्यांना भेटून जीटीजी खरचं असतात अशी खात्री पटली. तेव्हा पासून ते अजूनही बेकरी गेटटुगेदर म्हणजे भरपूर खादाडी, मनसोक्त गप्पा तर कधी अचाट सिनेमे एकत्र बघत हसणे खिदळणे. हि धमाल ईतकी वर्षे अव्याहत सुरु आहे. हे भेटणे सुरवातीला एका लंच किंवा डिनर पुरते काही तास असायचे पण तो वेळ गप्पांना नंतर काही पुरेनासा झाला मग आता सकाळपासून जमून मध्यरात्र उलटून गेली तरी मंडळी हलायचं नाव घेत नाहीत
बेकरी ग्रूप बरोबर सहकुटुंब सहपरीवार राहत्या ट्रिपा पण झाल्या.
मागे दोन वर्षे ईथल्या बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या गणपती उत्सवामध्ये मायबोली बेकरी ग्रूपने खाद्य पदार्थ तयार करुन त्याचा स्टॉल लावला होता, ज्यात जमा झालेली सर्व रक्कम एका समाजसेवी संस्थेला दिली होती. आता पँडेमिकच्या ब्रेकमधल्या व्हर्च्युअल जीटीजी नंतर प्रत्यक्ष भेटीचे वेध लागले आहेत. यांत सगळ्या माबोकरांचे कुटुंबीयही जीटीजीची वाट बघत असतात.
सुरवातीच्या 'गेला तो गंडला' या अनुभवापासून ते आताच्या 'गेला तो (गप्पात) गुंगला' हा आता ईतक्या वर्षात झालेला बदल
- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
तेव्हा अमेरिकेच्या दिवसा टिपापा, बेकरी धावत असायचे. मजा यायची. आता मूळचे बेकर्स गायब आहेत मायबोलीवरुन.
बाकी बदल म्हणजे पूर्वीचे व्ह्युज आणि कॉमेंटस वरच्या चर्चा, वाद त्याचे विषय पण भारी असायचे. अगदी भिकार्याला भीक द्यावी की नाही यावरुन पण आयडींमध्ये तुंबळ युद्ध होऊन काही आयडी धारातिर्थी पडले होते/ किंवा सोडून गेले होते.
बाकी बर्याच गोष्टी अजीबातच बदलल्या नाहीत जसे कि कितीतरी विषय ईतक्या वेळा चर्चा होऊन, परत परत अजूनही तितक्याच जोमाने चर्चीले जातात !
ईतक्या वर्षात मायबोलीवर स्वत:च्या लिहीण्यातला बदल असा विचार केला तर सुरवातील लिहिलेल्या स्वतःच्या पोस्टी आता फार निरागस /येडच्याप वाटतात, काहीही काय लिहायचो, विचारायचो असं वाटतं आता.
मायबोली वर चर्चेत, गप्पांतून वेगवेगळे मतप्रवाह देखील समजायला मदत झाली.
या व्यतिरिक्त दुसरा विचारप्रवाह समजला, दुसरी बाजू समजून घेऊन स्वतःची मते तपासून बघता आली. तर कधी मुद्दा बरोबर असून सुद्धा योग्य शब्दात मांडण्याचे महत्व समजले. तर कधी कधी अगदी महत्वाचा विषय/मुद्दा पण कुठेही बादरायण संबंध नसताना जिथे तिथे सतत रेटला गेला तर मूळ योग्य मूद्द्याबद्दल जाग्रुती होण्याऐवजी एकप्रकारची अढी/ दुर्लक्ष निर्माण होऊ शकते असही जाणवलं.
- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली
सुरवतीला मराठी टाईपण्याची, फोटो देण्याची सोय एकदा जमल्यावर मला फार आवडली. निवडक १०, ग्रुपवरील नवीन हे पण उपयोगी आहे.
- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती
जुन्या मायबोलीवर रंगीबेरंगी नावाचे सभासदाचे पान असायचे, ते मला वाटायचे ईथल्या जुन्या सभासदांना सिनीयॉरिटी म्हणून मिळाले असावे. खूप दिवस खरच हे माहितीच नव्हते!
- तुम्ही मायबोलीला काय दिलं
शक्यतोवर वादविवादापासून लांब राहायचा प्रयत्न केला आणि वेमांचा वेळ वाचवला हाहा!
बाकी खूप काही करता आलं नाही, पण मायबोलीवर भरपूर वाचन केलं, मराठी नातेवाईक, मित्रमंडळींच्या गोतावळ्यात मायबोली वरचे आवडलेले बरेच लेख, पाककृती शेअर केल्या व त्यांना पण मायबोलीचं व्यसन लावलं.
बी एम एम - लॉस एंजेलीसच्या माध्यम प्रायोजक असलेल्या मायबोली संयोजनात सहभाग घेतला. तो खूप छान अनुभव होता! मायबोलीवर दिवाळी, गणेशोत्सव, मराठीदिन कितीतरी कार्यक्रम होत असतात, आणि विविध सकस साहित्य विनासायास एका टिचकीवर वाचायला मिळते. ते आपल्या पुढे येताना त्या मागे किती जणांचे हात, भरपूर मेहेनत असते हे तेव्हा अगदी जवळून समजले.
संयुक्ता असताना अगदी काही काळाकरीता व्यवस्थापनात भाग घेतला, मजा आली!
- तुमचं कुठलं लेखन गाजलं
मायबोलीवर वाहत्या धाग्यावर टाईमपास, थोड्या पाकक्रुती लिहिल्या, बाकी फार लिखाण काही केलं नाही. मायबोलीसाठी मला ललित प्रभाकरची मुलाखत घेता आली, मजा आली होती त्याच्याशी गप्पा मारायला
माझ्या वडिलांनी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्या चे फोटो दिले होते, त्या पण ईथे खूप जणांना आवडल्या होत्या
- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
हाहा, लिहील फार नाहीच पण काही पोष्टींनी, विषयांनी गांजलं असेल नक्कीच.
तर आपल्या या रौप्यमहोत्सवी मायबोलीची समृद्ध वाटचाल सुवर्णोत्सवाकडे अशीच बहारदार होउ देत!
शुद्ध मराठीत लॉग लिव्ह मायबोली, मायबोली चिरायु होवो!
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
मस्त मीपु.
मस्त मीपु.
पॅसेज टू इंडिया रेस्टॉरंट/ बेकरी हा चिरायू जोक झालाय बेकरीत. तुझ्या नंतर कित्येक वर्षानी येऊनही मी अनेकदा ऐकला आहे. आणि फा चे पाणीपुरीच्या पुऱ्या फोडायचे डिफिकल्ट टू अकवायर असलेले/ नसलेले स्किल. सशल कुठे गायब आहे? ये म्हणावं, कोणी काही बोलणार नाही.
मीपु, मस्त मस्त!/:)
मीपु, मस्त मस्त!/:)
खरंच आता परत भेटलं पाहिजे. कायोटी हिल आणि नंतर राडेश्वर मध्ये ब्रेकफास्टचं जमवूच लवकरच
मस्त!! "गेला तो गंडला"
मस्त!! "गेला तो गंडला" मूगलेट आहे की तुझं मस्त!!! मी करते अधून मधून... आवडतं.
सशल कुठे गायब आहे? ये म्हणावं, कोणी काही बोलणार नाही. >> तिचं नाव तर मी रिचर्ड पार्कर ठेवलं आहे... ही लेफ्ट सो अनसेरेमोनिय्सली इ इ...
भिकार्याला भीक द्यावी की
भिकार्याला भीक द्यावी की नाही यावरुन पण आयडींमध्ये तुंबळ युद्ध होऊन काही आयडी धारातिर्थी पडले होते >>> हा कसा विसरले मी!!
"गेला तो गंडला" वर हा तुझ्या ह्यांचा कॉपीराइट आहे होय. हे आताच कळलं! नंतर तो बेकरी गटग चा फुल फॉर्म चांगलाच फेमस झाला होता
मस्त मनोगत गेला तो गंडला
मस्त मनोगत
गेला तो गंडला
भिकार्याला भीक द्यावी की
भिकार्याला भीक द्यावी की नाही >>> हे वाचल्यानंतर कालपासून इतक्यांदा एकटीच हसलेय मी
मस्त लिहीलय
मस्त लिहीलय
शक्यतोवर वादविवादापासून लांब राहायचा प्रयत्न केला आणि वेमांचा वेळ वाचवला Proud >> हे भारी
भिकार्याला भीक द्यावी की
भिकार्याला भीक द्यावी की नाही >> हे कुठे आहे??!!
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/12475
आता मला कळलं जुनी मायबोली
आता मला कळलं जुनी मायबोली म्हणून का सगळे हळहळतात.... असे धागे आता होणे नाही!!
मस्तच मीपु.
मस्तच मीपु.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
@अमित, हो मग पुढे पॅसेज टू ईडियावर काट बसली मध्ये बरेच वर्ष जीटीजी साठी
नंतर एकदा मेधा ( शोनू) आली होती तेव्हा त्या रेस्टॉरंट मध्ये भेटलो होतो. आणि एकदा समीर सुप्रिया आले असताना त्या बेकरी बफे मध्ये जीटीजी झालं होतं. अशा रितीने दोन्ही ठिकाणी जीटीजी खरोखरीचं घडलं
@राखी, अरे तुझ्या हातच्या स्पेशल (राडेश्वर) टेस्टी ईडली सांबार साठी कायोटी हिल ट्रेल परत परत चढायला लागला तरी चालेल!
खरचं भेटूयात लवकर
@मै, हो मला पण ते नाव वाचून फार हसायला येतं. म्हणजे कुणाला ते सांगतानाही मजेशीर वाटतं
@सिम्स, जुनी माबो आणि त्यावरचे धागे महान होतेच. अगदी जुनं हितगुज पण बघ, टोटल मनोरंजन
मस्त लिहीलंय.
मस्त लिहीलंय.
'गेला तो गंडला' इतक्या वेळा ऐकलंय पण त्यामागची स्टोरी आज कळली
छान लिहिले आहे. GTG चे अर्थ
छान लिहिले आहे. GTG चे धम्माल अर्थ.
नवर्यासकट भेटीच्या ठिकाणी
नवर्यासकट भेटीच्या ठिकाणी पोचले. तर तिथे कुणाचाच पत्ता नाही >>>
अर्र या धकाधकी ई. जीवनात तुम्हाला दोघांना डेट वर जाता यावे म्हणून बेकरांनी केलेला प्लान होता तो
पण सिरीयसली, तेव्हापासून पॅसेज टू इंडिया म्हंटले की लोक जरा बिचकूनच असतात. वास्तविक त्यानंतर तेथे २-३ यशस्वी गटग झाली.
छान लिहीले आहेस मीपु. बरेचसे आठवले. तो बहुधा २०१४ सालचा स्टॉल व त्या दिवसभराचे तेथील गटग हे पुन्हा कधीतरी जमवायलाच हवे (मिनोतीला आणा इथे कोणीतरी त्याकरता). फार मस्त अनुभव होता तो. आधी बेकरांबरोबर दिवसभर गप्पा मारता येणे हेच धमाल आहे. त्यातून सोशल कॉज वगैरे होत असेल तर आणखी बोनस. जबरी मजा आली होती त्या दिवशी. बहुधा त्या आधीही एक का दोन वर्षे असाच लावला होता स्टॉल. तेव्हाही मजा आली होती पण १४ सालची जास्त लक्षात राहिली. २०१५ सालची योसेमिटी ट्रिपही धमाल.
माबोवरही बेकरी धावायची तेव्हा सतत कुतूहल असे कोणी काय नवीन लिहीले आहे. बहुधा दोन फेजेस होत्या - २००८-०९ च्या आसपास बरेच नवीन लोक लिहू लागले तेव्हा, आणि नंतर २०१३-१४ च्या सुमारास "९८" मोड मधे बेकरी गेली तेव्हा. "९८ चा साप" ही एक बेकरीतील भन्नाट कन्सेप्ट होती, सापशिडीतील सापाच्या संदर्भाने
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
भिकार्याला भीक द्यावी की नाही >>> धागा फिरून आले.
छान लेख.
छान लेख.
छान
छान
मस्त लिहिलं आहे !
मस्त लिहिलं आहे !
छान लिहिलयस मीपु.
छान लिहिलयस मीपु.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
@मंदार, काय सांगतोस? तुला माहिती नव्हतं हे?
@फा,
अर्र या धकाधकी ई. जीवनात तुम्हाला दोघांना डेट वर जाता यावे म्हणून बेकरांनी केलेला प्लान होता तो Wink > तर तर, बेकर फार विचार करतात ब्वा
हो, २०१४ चा स्टॉल टोटल धमाल होता. तुझं पाणिपुरी फोडायचं टेक्निक बाकी १२ तासाच्या वर नॉनस्टॉप गप्पा, खरच परत जमवायला हवं हे.
आधी बेकरांबरोबर दिवसभर गप्पा मारता येणे हेच धमाल आहे. त्यातून सोशल कॉज वगैरे होत असेल तर आणखी बोनस. >> याला अगदी मम!
योसेमिटी ट्रिपला रात्री उशीरापर्यंत सगळी मंडळी गप्पाटप्पा करुन झोपल्यावर, सगळ्यांच्या आधी भल्या पहाटे उठून तू केलेला पिंपभर चहा आठवतोय
मस्त लिहिलंस
मस्त लिहिलंस
गेला तो गंडला>>> भारीच .
तुझ्या पाककृती आणि झाडांचे धागे छान असतात. आवर्जून वाचते
मीपु, किती मस्त आठवणी
मीपु, किती मस्त आठवणी काढल्यास! योसेमिटीला फा ने केलेला चहा आठवला मलापण केवढी वर्षं झाली तुम्हा सर्वांना भेटून. कधीतरी बेकरी ट्रीप काढायला हवी आहे.