लघुकथा म्हणून मायबोलीवर लवकरच प्रसिद्ध झालेल्या शतशब्द कथा या मायबोलीकरांच्या वाचनाच्या प्राधान्यक्रमामध्ये असतात. अनपेक्षित असा शेवट जो कधी बुद्धीला गुंग करून सोडतो , कधी सुखांत असतो तर कधी मनाला चटका लावून जातो. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत. शशक पूर्ण करा हा उपक्रम. यात संयोजक तुम्हाला शशकची सुरुवात करून देतील. ती पुढे खुलवून आणि शेवट करून तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि कथेला साजेसे असे शीर्षक द्यायचे आहे. एक आयडी कितीही प्रकारे कथा पूर्ण करू शकतो.
धाग्याचे शीर्षक शशक पूर्ण करा - कथेचे शीर्षक - मायबोली आयडीचे नाव असे असावे. हा उपक्रम आहे , स्पर्धा नाही. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी.
तर मग आपल्या कल्पनेची क्षितिजे ओलांडा आणि कथा पूर्ण करायला घ्या.
कथेची सुरुवात.
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
(यापुढे हि शशक तुम्हाला पूर्ण करायची आहे)
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
अजून एक मस्त उपक्रम.
अजून एक मस्त उपक्रम.
शशक परतुन आल्याबद्द्ल धन्यवाद
शशक परतुन आल्याबद्द्ल धन्यवाद! मजा येते शशक लिहायला आणि वाचायला.
मजा येते शशक लिहायला आणि
मजा येते शशक लिहायला आणि वाचायला.
+७८६.
आणि थोडक्यात लिहून होते. वेळ वाचतो. जास्त लोकं भाग घेऊ शकतात.
बाकी याचीही स्पर्धा करायची होती. मग लोकं आणखी छान लिहितात. अजून मजा आली असती.
दरवेळी अनुभवकथन आणि कथालेखन अश्या दोन स्पर्धा हव्या लेखनाच्या. उपक्रम म्हणूनही चालेल म्हणा. उत्सुकता आहे एकच सुरुवात पकडून लोकं आता किती फाटे फोडतात
ओह्ह... मला स्पिन द यार्न
ओह्ह... मला स्पिन द यार्न वाटून तो रिप्लाय लिहिलेला!
पण शशकपण ठीक आहे.
माझी झालीही लिहून
माझी झालीही लिहून
शंभर शब्द वगैरे मोजायची वेळ पकडून १५-१६ मिनिटात झाली .. आता प्रकाशित कधी करू. लिहिलेले पोस्ट न करता राखून ठेवणे मला बिलकुल जमत नाही.. ईथेच कॉपीपेस्ट करू का
करा ना प्रकाशित.
करा ना प्रकाशित. स्पर्धा सुरु झालीच की.
छान उपक्रम
छान उपक्रम
केलि
केलि
ह्या सुरुवातीतला रस संपत आला
ह्या सुरुवातीतला रस संपत आला असेल तर दुसरी सुरुवात द्या संयोजक. आम्हाला मजा येतेय.
>>>>ह्या सुरुवातीतला रस संपत
>>>>ह्या सुरुवातीतला रस संपत आला असेल तर दुसरी सुरुवात द्या संयोजक. आम्हाला मजा येतेय.
+१००१
सुरुवातीतला रस संपत आला असेल
सुरुवातीतला रस संपत आला असेल तर दुसरी सुरुवात द्या संयोजक. आम्हाला मजा येतेय. Happy>>>> ++१११
ह्या स्पर्धेतल्या सगळ्या
ह्या स्पर्धेतल्या सगळ्या प्रवेशिका एकत्र कशा/कुठे दिसतील ?
संयोजक, शशक-२ ची सुरुवात कुठे
संयोजक, शशक-२ ची सुरुवात कुठे दिली आहे?
पुढे अशीच आणखी सुरुवात दिलीत तर ती कुठे पाहायची?