तांदुळ 2 वाट्या
सोललेले वाल 1 वाटी
वाटणा साठी
धणे 5 चमचे
जिरे 3 चमचे
सुक्के खोबरे अर्धी वाटी
हिरव्या मिरच्या 4
कोथिम्बीर पाव वाटी
आले 2 इन्च
तेल, हिंग, मोहरी, जिरे, 1 कांदा बारीक चिरुन फोडणीला
मिठ
गुळ 1 मध्यम खडा
तिखट पुड ,हळद
खिसलेले ओले खोबरे वरुन घालण्यासाठी
1) धणे ,जीरे तेल न घालता कोरडे च भाजुन घ्यावे.
2) सुक्के खोबरे gas च्या फ्लेम वर थोडे काळे होई पर्यंत भाजावे.
3) आले, कोथिम्बीर, मिरची चे वाटण करुन घ्यावे.
4) त्यानंतर धणे,जीरे,सुक्के खोबरे चे वाटण करावे. व दोन्ही
वाटणे मिक्स करावीत.
5) एका जाड बुडाच्या पातेल्यात पाव वाटी पेक्षा थोडे कमी तेल घालावे .
तेल तापले की जिरे , हिंग,मोहरी ची फोडणी करावी.
म कांदा घालुन परतवून घ्यावा सोनेरी होई पर्यंत .
6) नंतर त्यात धुतलेले तांदुळ टाकुन परतवून घ्यावे.
7) परतलेल्या तांदळा वर वरील मसाल्याचे वाटण घालुन 3 4 मिनट
परतणे.
8) मग हळद,तिखट,मिठ ,गुळ घालुन परतणे.
9) आता त्यात वाल घालुन 2 3 मिनट परतणे .
10) नंतर त्यात उकळत असलेले गरम पाणी 6 वाटी ओतणे. व ढवळणे.
11) त्यावर झाकणी झाकुन ठेवणे gas ची फ्लेम मंद ठेवणे.
12) साधारण अर्धा तास मध्ये हा भात शिजून तयार होतो. मधून मधून चेक करणे. गरज असल्यास ढवळून घेणे.
13) भात तयार झल्यावर त्याच्यावर किसलेले खोबरे आणी कोथिम्बीर घालणे.
दुकानात कडधान्य सारखे वाल मिळतात ते आणुन घरी सकाळी भिजत घालायचे आणी रात्री उपसायचे. आणी सकाळी सोलायचे.
नाहीतर विकत ही मोड आलेले सोललेले वाल मिळतात.
छान. करून बघेन
छान. करून बघेन
पायरी क्र. १ मधले खोबरे
पायरी क्र. १ मधले खोबरे म्हणजे ओले खोबरे ना? कारण सुके खोबरे गॅसच्या ज्वाळेवर भाजावे असे पा. क्रमांक २ मध्ये लिहिले आहे.
वरून घालायचे ओले खोबरे हे वेगळे राखून ठेवायचे ना?
सॉरी हिरा लिहायचे चुकले होते
सॉरी हिरा लिहायचे चुकले होते . दुरुस्त केले.
पायरी 1 मध्ये सुक्के खोबरे नाही आहे.
ओले खोबरे फक्त वरुन घालायचे भात तयार झाल्यावर.
प्रत्येका ला वाढताना वरुन खोबरे आणी कोथिम्बीर घालुन द्यायचे.
तुप ही घालू शकतो वरुन छान लागते.
वाल म्हणजे पावटे हे मला माहित
वाल म्हणजे पावटे हे मला माहित नव्हते. (विदर्भात पावटे नाही म्हणत.)
ताज्या वालाच्या शेंगांची भाजी खातो आम्ही, पण कडधान्या सारखे सुकले वाल आणले नाही कधी.
करून पहायला हवा हा भात.
डाळिंब्या वेगळ्या आणि पावटे
डाळिंब्या वेगळ्या आणि पावटे वेगळे ना? पावटे म्हणजे ओले/ कोवळे वालाचे दाणे. डाळिंब्या म्हणजे सुक्या वालाच्या दाण्यांना मोड आणून सोललेल्या. जरी वनस्पती एकच असली तरी पावटे आणि डाळिंब्यांच्या चवी वेगवेगळ्या असतात.
सुक्के वाल मोड आलेले वाल
वावे मला इतके नाही माहिती .पावटे काढून टाकते मी.
![20210829_203657.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u65276/20210829_203657.jpg)
तसे आम्ही याला वाल ,वरणे ही म्हणतो.
फोटो टाकते.
सुक्के वाल
मोड आलेले वाल
![20210829_203628.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u65276/20210829_203628.jpg)
वाल आणि पावटे वायले.
वाल आणि पावटे वायले. वरच्या फोटो मध्ये आहेत ते पावटे आहेत.
धन्यवाद मनीम्याऊ पाककृती
धन्यवाद मनीम्याऊ पाककृती आवडल्या बद्द्ल.
मानव ,हिरा नक्की करुन बघा भात छान लागतो.
भारी आहे वालाचा भात. आम्ही
भारी आहे वालाचा भात. आम्ही पावटे भात असाच करतो. हिरवे पावटे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले की पावटे भात करतोच करतो.
अमुपरी,ते गोड वाल आहेत.कडवे
अमुपरी,ते गोड वाल आहेत.कडवे वाल तपकिरी किंवा लालसर असतात.ते जास्त टेस्टी असतात हेमावैम.
देवकी ,मी कडवे वाल खाले
देवकी ,मी कडवे वाल खाले आहेत का कधी ते मला काही आठवत नाही आहे.
पण आमच्या कडे नेहमी हेच वाल आणतात.
मला वाल फक्त भातामध्ये च आवडतात. वालाची उसळ,बिरड अजिबात आवडत नाही.
डाळिंब्या भात माझा फेवरेट,
डाळिंब्या भात माझा फेवरेट, गोडा मसाला घालून करतात आमच्याकडे. उसळ, आमटी, परतून भाजी सर्व आवडते मला. सोलायचा कंटाळा येतो.
DJ हा वालाचा भात पण करुन बघा
DJ हा वालाचा भात पण करुन बघा एकदा.
अंजू आमच्या घरात पण डाळींबी ,वाल यांचे सगळे प्रकार आवडतात सगळ्याना मी सोडून. मला वाल सोलायला खुप मजा येते .
हो. नक्किच. माझ्या मित्राची
हो. नक्किच. माझ्या मित्राची आई कल्याणची आहे. त्या अधून मधून माहेरी जाऊन आल्या की आठवणीने कडवे वाल देतात. पण त्यावेळी आम्ही त्याचं बिरडं करून खातो. पुढच्या वेळी नक्कीच भात करणार.![Bw](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/bw.gif)
मला वाल सोलायला खुप मजा येते .>> मला पण
. माझ्या घरी आधी हे किचकट पद्धतीने सोलले जायचे कारण वाल, वालाचे बिरडं आमच्यासाठी नवीनच प्रकार होता. मग एकेक वाल नखाने सोलात बसल्यावर तासाभराने कसेबसे वाल सोलून निघायचे अन् त्यासोबत नखं पण
. हे मित्राच्या आईला कळल्यावर त्यांनी मला वाल सोलयाची सोपी पद्धत सांगितली. भिजलेले वाल उपसून कडक पाण्यात ४-५ मिनिट ठेवले की त्याची सालं फुगतात. मग दोन्ही हातांच्या अंगठ्याने अन् त्याशेजराच्या बोटाने एकेक वाल घेऊन दाबला की पुचुक पूचुक करत १० मिनिटात सगळे वाल सोलून निघतात.
अमुपरी,ते गोड वाल आहेत.कडवे
अमुपरी,ते गोड वाल आहेत.कडवे वाल तपकिरी किंवा लालसर असतात.ते जास्त टेस्टी असतात हेमावैम.>>>> +११ माझं पण हेच मत आहे. डाळींब्यांची ऊसळ करताना हळूच थोडे वाल वगळले तरच मला डाळींबी भात करता येईल. मी हल्ली मोड आलेले सोललेले वालच आणते विकत ( ते कडवे वाल नसतात पण बहुतेक) .
वाल भिजत घालून करायचे म्हणजे दोन तिन दिवस जातात. मला पण आवडतात सोलायला. गरम पाण्यात घातलेले वाल सोलण्याचा सोहळा असायचा घरात.
तुझी रेसिपी छान आहे हे लिहायला विसरले.
DJ आम्ही असेच वाल सोलतो पटकन
DJ आम्ही असेच वाल सोलतो पटकन होतात.
धन्यवाद धनुडी. मी पण आता कडवे वाल आणुन बघते म्हणजे आधी ही खाले असतिल पण चव आठवत नाहीये.
माझ्या माहेरी कोकणात मी लहान
माझ्या माहेरी कोकणात मी लहान असताना पावटे लावायचे (गावच्या भाषेत त्याला लावणेच्या ऐवजी ठोकणे म्हणतात), त्यामुळे घरचे यायचे. मस्त चव होती. आई नेहेमी जास्त पावटे भिजत घालायची उसळीसाठी आणि थोडे वगळायची, नंतर दुसऱ्या दिवशी डाळिंब्या, त्याची आमटी किंवा भात किंवा परतून भाजी. पडवळ घालून पण superb होते. त्यामुळे कडवे वाल फार कमी खायची सवय आम्हाला, विकत आणतानाही पावटे आणले जातात. कडवे वाल जरा जास्त उग्र असतात, त्याच्याही डाळिंब्या मला आवडतात.
मला वाल सोलायला खुप मजा येते . >>> ग्रेट.
आज वाल भात केला
आज वाल भात केला![Screenshot_20211227-210259_Gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u65276/Screenshot_20211227-210259_Gallery.jpg)