मायबोली गणेशोत्सव २०२१ साठी स्वयंसेवक हवे आहेत

Submitted by webmaster on 10 August, 2021 - 11:02

यंदा गणेशोत्सव १० सप्टेंबरला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २२ वे वर्ष.

या गणेशोत्सवात मायबोलीला २५ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २५ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.

मायबोली गणेशोत्सव २०२१ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Wow, गणेशोत्सवाची घोषणा झाली..
खूप खूप शुभेच्छा Happy
यंदा संयोजक होण्याची इच्छा असून देखील जमणार नाही.
दणक्यात होऊ देत उत्सव!!!
गणपती बाप्पा मोरया!!!

वाव्ह मस्तच घोषणा. स्वयंसेवकासाठी माझा विचार व्हावा हीच आयोजक आणि गणपती चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.

मस्त...
हजारोंच्या संख्येने संयोजक बना
आम्ही लाखोंच्या संख्येने उपक्रमात भाग घेतो Happy

भावी संयोजकांना खुप खुप शुभेच्छा!!
खुप सुंदर अनुभव असतो हा..... आवर्जून सहभागी व्हा!

मायबोली गणेशोत्सव हा मायबोलीच्या आदर्श परंपरेला साजेसा होउद्या ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना!!

ऋ, तू हो की मग संयोजक.
उत्सवाला आणि भावी संयोजकांना शुभेच्छा!
बोकलत, तुम्हाला कस्काय माहित?

मागच्या वर्षी छान होते उपक्रम. फक्त बाल रोप संवर्धन वाला कमी प्रतिसादाने गंडला.
या वर्षीच्या टीम ला शुभेच्छा. जे उपक्रम ठेवाल ते एन्जॉय करूच. Happy

सस्मित, संयोजक होण्यासाठी जे स्किल आणि आवड लागते त्याचा माझ्याकडे अभाव आहे. ज्यांना हे छान जमते आणि करायला आवडते त्यांना करू द्यावे. उपक्रमांना छान प्रतिसाद मिळणेही गरजेचे असते. त्यात मात्र मी माझा खारीचा वाटा नेहमी आनंदाने ऊचलतो.

स्वयंसेवक बनने सद्ध्या जमणे शक्य नाही. पण वाचक आहेच.

सी, तुझा प्रतिसाद (सुरवात) वाचुन हाबने तो लिहीला असे वाटले. मिसींग हाब.... कुणी रागावुन मायबोली हे घर सोडुन जाऊ नका, आपल्या घरी आपण परततो ना नंतर तसे परत या ना... गेलेल्यांची खुप आठवण येते.

मागच्या वर्षी मस्त ऊपक्रम होते.

सी, तुझा प्रतिसाद (सुरवात) वाचुन हाबने तो लिहीला असे वाटले. >> मी हाब यांची ड्यू आयडी नाही हा 'बडा खुलासा' इथेच करू इच्छिते Happy

बाकी डेडलाईन्स वाढवून द्याव्या लागतात ह्या तयारीनेच जरा अलिकडच्या द्या. रेसिपी कधी नाही दिली तरी डेडलाईन वाढली वाचूनच काय आनंद होतो सांगू... harris.jpeg

अरे व्वा! यंदाच्या गणेशोत्सवासाठी संयोजकांना आगाऊ शुभेच्छा!

शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.
यंदाच्या गणेशोत्सवात ज्या मायबोलीकरांना संयोजक मंडळात सहभागी व्हायचंय त्यानी कृपया पुढील २/३ दिवसात इथे लिहा. म्हण्जे संयोजनाचा ग्रूप तयार करता येईल.

या वेळी संयोजक मंडळात सहभागी होण्याची माझी इच्छा आहे. संयोजन करण्याचा काही अनुभव नाही. तसेच घरच्या आणि ऑफिसच्या कामामध्ये महाप्रचंड व्यस्त असतो तरीही संयोजनासाठी नक्की वेळ काढेन. माझ्या नावाचा विचार व्हावा ही आयोजकांना विनंती.

मायबोली गणेशोत्सव २०२१ आणि संयोजक मंडळाला शुभेच्छा! संयोजन शक्य नाही पण सोयी - सवडीने उपक्रमात भाग घेण्यात येईल Happy

Pages