मशरुम ब्रोकोली स्टर फ्राय विथ चिकन

Submitted by अश्विनीमामी on 8 August, 2021 - 21:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्यः मशरूम देठ कापून वरील अर्ध गोल चार तुकडे करून एक वाटी, ब्रॉकोलीचे बारके तुकडे पण फार बारीक नाही देठ असले पाहिजेत असे एक वाटी, बारीक कापलेल्या बोन ले स चिकन ब्रेस्ट तुकड्या पातळ अश्या एक वाटी.
भाजलेले शेंगदाणे सोलून पाव वाटी, दोन चमचे तीळ तव्यावर भाजून बाजूला ठेवलेले.

आंबे मोहोर तांदुळाचा भात मी दोन बाया माण्सांना एक वाटीचा लावला होता.

सॉस साठी: चिली फ्लेक्स ( घरी सुकी लाल मिरची वाटून बनवले) एक मोठा चमचा. दोन चमचे व्हिनेगार दोन चमचे डा र्क सोया सॉस, एक बारका चमचा साखर, स्वादा नुसार मीठ व दोन लसूण पाकळ्या अर्धवट ठेचून, आले थोडेसे

क्रमवार पाककृती: 

कृती: तव्यावर / पॅन मध्ये आधी तीळ भाजून सुकेच बाजूला ठेवा. एका वाटीत सॉस बनवून घ्या. साखर विरघळवून घ्या. मूळ रेसीपीत मीठ नाही. पण थो डे से चालेल. असे आम्हाला नं तर चव घेउन वाटले. मला चालतेय कारण सोया सॉस मध्ये सोडि यम असते व मी जनरली बिन मिठाचेच खात असते काहीपण.

दोन चमचे तेलावर - साधे कुकींग ऑइल - सफोला किंवा सन ड्रॉप - लसूण परतून त्यात ब्रॉकोली, मशरूम्स व चि कन घालून परता व पाव कप पाणी घाला. थोडे उकळीला आले की सॉस घाला. आता सात ते दहा मिनिटे मंद गॅस वर उकळू द्या. सर्व पदार्थ लवकरच शि जणारे आहेत. ब्रॉकोली क्रंची पण शिजलेली राहते. मिरची फ्लेक्स घाला. भाजलेले शेंगदाणे घाला

आता सर्व्ह करताना प्लेटीत गरम भाताच्या दोन तीन मुदी पाडून घ्या. व वरून हे स्ट र फ्राय घाला. सॉस काही घट्ट नाही. कॉर्न फ्लोअर लावलेले नाही. म्हणून फार पाण थळ करू नका चव खराब होईल. गरमा गरम असतानाच वरून ते तीळ शिवरा व खायला घ्या.

टिप्सः भात नसल्यास उकडलेल्या नूड ल्स बरोबरही छान लागेल. व बरोबर एखादा तळलेला व्हिएटनामी टाइपचा राइस रोल असल्यास बहार येइल. बाय इटसेल्फ एक प्लेट पोट भरीची होते. चिकन घालाय्चे नसल्यास व्हेज रेसीपी होईल. ती ही छानच लागते.

नंतर खायला माचा / ग्रीन टी आइसक्रीम मस्त लागेल असे मला वाटले. जपानी धर्तीची रेसीपी आहे.

सोर्सः युट्युब.

वाढणी/प्रमाण: 
दोन व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

भात नसल्यास उकडलेल्या नूड ल्स बरोबरही छान लागेल. व बरोबर एखादा तळलेला व्हिएटनामी टाइपचा राइस रोल असल्यास बहार येइल. बाय इटसेल्फ एक प्लेट पोट भरीची होते. चिकन घालाय्चे नसल्यास व्हेज रेसीपी होईल. ती ही छानच लागते.

नंतर खायला माचा / ग्रीन टी आइसक्रीम मस्त लागेल असे मला वाटले. जपानी धर्तीची रेसीपी आहे.

माहितीचा स्रोत: 
यु ट्युब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

हो ना जापानीज आहे असे लिहिता येत नाही आहे. सर्च मध्ये तो ऑप्शनच नाही आहे. म्हणून फ्युजन लिहिले.

मी दुसर्‍यांदा केली तेव्हा थोडे चिमुट भर कॉर्न फ्लोअर घातले होते सॉस मध्ये मिळून यायला. पण मूळ जपानी रेसीपीत नाही.

जास्मिन राइस वगैरे वापरतात पण इथे तो फार महाग मिळतो सहाशे रु. ला अर्धा किलो वगैरे म्हणून मी अश्या रेसीपी त आंबे मोहोरच वापरते.
आपला लोकल रैस.

तुम्ही डाएट वर असाल तर भात पूर्ण स्किप करा.

तुम्ही डाएट वर असाल तर भात पूर्ण स्किप करा.>>>>>> नाय, मी तर चिकनच स्किप करेन. Proud कृती झकास आहे. फक्त सोया सॉस नाही घरी. स्टर फ्राय न्युडल्स बर्‍याच वेळा खाल्लेत. पण भाजलेल्या शेंगदाण्यांची वेगळीच टेस्ट असेल.

मी तर चिकनच स्किप करेन.>> हो नं... श्रावण सुरु झाला.

वैनी, बर्‍याच दिवसांनी आलात हो तुम्ही. अगदी पूर्ण आषाढ महिना गायब होता की हो.