साहित्य :
१.ताजी कोवळी निवडून धुतलेली व बारीक चिरलेली मेथीची पाने,
२.बारीक चिरलेले मध्यम आकाराचे दोन कांदे,
३.लाल तिखट चवीनुसार,
४.मीठ चवीनुसार,
५.दाण्याचा कूट 3-4 टे स्पून (म्हणजे आपला फराळाचा चमचा )
६.फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे
७. तळलेला किंवा भाजलेला पापड
काल संध्याकाळी गावाहून साबु आमच्या शेतातली मेथी घेऊन आले. घरची किंवा ताजी कोवळी मेथी असली की हमखास घोळाना केल्या जातोच. चटपटीत आणि चटकन होणारा पदार्थ आहे.
कृती :
१.एका मोठ्या टोपात मेथी, कांदा, तिखट, मीठ, दाण्याचा कूट, पापड हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्या.
२.हे सर्व मिश्रण हलक्या हाताने मिसळून घ्या.
३.फोडणी साठी 1-2टे स्पून तेल गरम करा. तेल तापले की मोहरी घाला. ती तडतडली की जिरं घाला. जिरं छान लालसर झालं की फोडणीचा गॅस बंद करून ती टोपातल्या मेथीच्या मिश्रणावर ओता.
४.सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या. मेथीच्या पानांना सगळा मसाला एकसारखा लागला पाहिजे.
५.गरम गरम कडक भाकरी/पोळी सोबत सर्व्ह करा.
प्रकाशचित्रे :
फोडणी घालण्यापूर्वी
फोडणी घालून झाल्यावरचे final मिक्स
>
सोबत एखादी रस्साभाजी किंवा फोडणीचं वरण/आमटी असावी. मजा येते खायला.
दाकू घालण्यात कंजुसपणा करू नये, सढळ हाताने घालावा.
फोडणी घालण्यापूर्वी
.
आज पापड घालायचा राहिलाय.
साहित्यात add करते.
छानच! साहित्यात पापड लिहायचा
छानच! साहित्यात पापड लिहायचा राहिलाय का?
भारी आहे हे.... नक्कीच करून
भारी आहे हे.... नक्कीच करून बघेन. परड्यात लावलेली मेथी बर्यापैकी मोठी होऊन खुडायला आली आहे.
वावे, मी पण पापडासाठी साहित्य दोन वेळा डोळ्याखालून घातलं.. कदाचित घोळाना करण्याआधीच बच्चेकंपनीकडून तो गट्ट्म झालेला दिसतोय
छान आहे हे.
छान आहे हे.फोटो तोंपासु. मेथी आवडीची.
घोळणा कधी खाल्ला नाही. कुंडीतली मेथी वाढली कि बनवून खाईन.
मेथीचे घोलाणं पहिल्यांदाच
मेथीचे घोलाणं पहिल्यांदाच बघतेय, मस्त लागेल. आम्ही कांद्याच्या पातीचं करतो. कृती : कांद्याची कोवळीपात धूवून चिरून त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला आणि वरून फोडणी.
पापड घालायची आयडिया आवडली. करून बघायलाच पाहिजे.
छान पाककृती !! नक्की करून
छान पाककृती !! नक्की करून बघेन . मी असा कांद्याच्या पातीचा करते .
वा वाचतानाच मेथी कांदा पापड
वा वाचतानाच मेथी कांदा पापड असा स्वाद जाणवला. मस्त वेगळाच प्रकार.
जर कोवळा आणि ताजा पालक मिळाला
जर कोवळा आणि ताजा पालक मिळाला तर हे आमच्याकडे बनते. मायनस पापड.
मेथीच्या विशिष्ट चवीमुळे हे जास्त छान लागणार.
भारी, शेतातली मेथी, लकी.
भारी, शेतातली मेथी, लकी.
हे मी करते tv वर दोन प्रकारच्या रेसिपीज बघून, एक अदिती सारंगधर आणि एक above ४० सारेगमप पहिली आली ती गायिका, चितळे आडनाव यांची बघून. मेथीचा खुडा म्हणाल्या दोघी.
अदितीने यात मेतकुट टाकायला सांगितलं आहे आणि गोडा मसाला. मी मेतकुट टाकते. पापड नव्हता सांगितला.
चितळे बाईंनी सेम तुमच्यासारखी रेसिपी दाखवली वजा पापड, कुट आणि फोडणी, नुसते कच्चे तेल सांगितलं.
आता मी सेम ही रेसिपी करून बघेन.
छान
छान
मी नेहमी करते घोळाना , खूप
मी नेहमी करते घोळाना , खूप आवडीचा. असाच घोळाना कांदयाची पात बारीक चिरूनही करते. फोडणी असली तर ठीक नाही तर कच्च तेल घालते. पापड कधी घालत नाही. मस्तच.
धन्यवाद वावे, मृणाली, dj,
धन्यवाद वावे, मृणाली, dj, अश्विनी, धनुडी, मीरा.., जागू ताई, अंजु, blackcat, अस्मिता
कांदा पात आणि पालक चा घोळाना करून पाहते , माहित नव्हतं.
ह्या पदार्थामध्ये वेळखाऊ काम एकच, भाजी निवडणे! बाकी process झटपट आहे.
मला दुनियादारीतला आशु आठवला.
मला दुनियादारीतला आशु आठवला. त्याने फक्त पालक वापरला होता यात.
किल्ले, मला मेथीने खूप पित्त होते पण कोवळी मेथी नक्कीच मिळेल, तेव्हा करतेच. कॉलनीजवळच ताजी भाजी मिळते. थोडी खाईन, पण खाईनच.
मेथीने उलट पित्त कमी होते ना
मेथीने उलट पित्त कमी होते ना ?
अरे शिजवायची नाही होय! करुन
अरे शिजवायची नाही होय! करुन बघितलं पाहिजे.
मेथी नेहेमी मिळते पण कोवळी नसते. त्याचं चांगलं लागेल का?
कोवळी मेथी मिळाली तर करून
कोवळी मेथी मिळाली तर करून बघेन नक्कीच. चविष्ट वाटतेय प्रकरण
कच्चे सॅलड आहे
कच्चे सॅलड आहे
हो.
हो.
फोडणीचं ड्रेसिंग. वरुन जरा लिंबू पिळलं की आणखी चव येईल का?
आमच्या खानदेशात याला खुडा
आमच्या खानदेशात याला खुडा म्हणतात.
कच्ची कोवळी मेथीची पाने चिरून फक्त तिखट मीठ तेल घालून. फार कडू लागत असेल तर कोथिंबीर. कांदा अगदीच ऑप्शनल. हे सगळे कच्चेच पोळीसोबत खाता येते.
किंवा मुळ्याची पाने, त्यातच बारीक चिरलेला कच्चाच मुळा. वर तेल तिखट मीठ.
लिंबू असलाच तरी उत्तम नसेल तरी उत्तम. मेथी अगदी कोवळीच हवी किंवा समुद्रमेथी हवी वगैरे चोचले नाही करायचे. जशी असेल तशी मेथी घ्या. स्वच्छ्च्छ धुवा. निबर वाटली तर दांड्या घेऊ नका. आरड-बोरड चिरा.
हे दोन्ही प्रकार बाकी पापड, दाकू, फोडणी वगैरे काहीही न घालताही छान लागतात.
हे असं प्रकरण बिना गॅसचं करून खाता येतं हेच खूप लोकांना ठाऊक नसतं हे समजलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं.
गरीबा-गुरीबी पालेभाजी करायचा
गरीबा-गुरीबी पालेभाजी करायचा खानदेशी प्रकार म्हणजे जहाल मिरची-लसूण-हिंग-मोहोरी-हळदीची फोडणी. त्यात फक्त खुडलेली मेथी. चिरायचीच नाही. अर्धा मिनिट परतून त्यात भ-र-पू-र पाणी. पावशेर पालेभाजी ४ लोकांना पुरायला हवी ना!
भाकरी कुस्करायची. त्यावर ही भाजी. सोबत एक कांदा बुक्की मारून फोडायचा. काम फिनिश.
कच्ची मेथी खाता येईल हे
कच्ची मेथी खाता येईल हे लक्षात आलं नाहीच कधी. वाईट कशाला लागेल म्हणा!
आम्ही असं सॅलड लेटसच्या पानांचं करतो.
अमित! आपल्याकडची मेथी ताजी
अमित! आपल्याकडची मेथी ताजी /कोवळी नसते मग ती ओबड धोबड चिरुन( अगदी बारिक नाहि चिरायची ) २ पाण्यात घालुन स्वच्छ धुवुन मग सॅलड स्पिनर मधे फिरवुन पाणी काढुन टाकायच , त्याने कडसर पणा थोडा कमी होतो.
देशात मिळणार्या कोवळ्या मेथिला मुळचिच छान चव असते त्यमुळे फार काही अॅड कराव लागत.
मी यात दाण्याच्या कुटाएवजी दाण्याची लसूण घातलेली चटणी टाकते, फोडणी वैगरे नाही घालत पण नेहमिच तेल, पापड घालते.
पापड लास्ट मिनिट घालायचा.
वोक्के. ताजी मिळाली की नक्की
वोक्के. ताजी मिळाली की नक्की करतो.
मेथी कशीही आवडते आणि हमखास मिळते.
माझं पण सायो सारखंच झालं! कच्चा पालक, अरुगुला, लेट्युस, मुळा, बीट च्या पानांचं नुसतं मीठ आणि लिंबू पिळून सॅलड आवडतं, पण अशी मेथी खाता येईल हे डोक्यात नाही आलं.
याला बहुतेक आमच्या घरी पचडी
याला बहुतेक आमच्या घरी पचडी म्हणतात.पण पापड घालून नाही पाहिला कधी.ट्राय करते.
हो , पचडी म्हणतात
हो , पचडी म्हणतात
पचडी, मी कोबीच्या
पचडी, मी कोबीच्या कोशिंबिरीलाच म्हणते. कोबीची पचडी, मग त्यात दाकु, लिंबाचा रस वगैरे वगैरे.
मस्त प्रकार आहे, करणार नक्की.
मस्त प्रकार आहे, करणार नक्की...
मेथीचं कच्चं सॅलड. करून बघणार
मेथीचं कच्चं सॅलड. करून बघणार.
पापड कच्चा की भाजलेला तळलेला घालायचा?
७.तळलेला किंवा भाजलेला पापड
७.तळलेला किंवा भाजलेला पापड
ओके आधी नव्हतं ना
ओके आधी नव्हतं ना
Pages