मेथी केळं शेव भाजी - बाय संजीव कपूर

Submitted by स्वप्ना_राज on 19 July, 2021 - 12:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ जुडी मेथी (चिरून, पण अगदी बारीक नाही), २ पिकलेली केळी (गोल चकत्या करून घ्या आणि फोर्कने थोडं मॅश करा), पाव कप शेव (मोरी शेव म्हणतात ते. भेळीत घालतात तसले बारीक नाहीत), २ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून हिंग, दीड टीस्पून मोहरी, १ टेबलस्पून जिरे, पाव टीस्पून मेथीदाणे, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून जिरेपूड, १ टीस्पून धणेपूड, १ टेबलस्पून आलं-हिरवी मिरची पेस्ट, मीठ स्वादानुसार

क्रमवार पाककृती: 

'रताळी मिळाली का कविताताई?'
'चांगली नव्हती ताई. म्हणून आणली नाहीत. हिरवी भाजी देऊ का? मेथी घ्या, चांगली आहे बघा' माझा खट्टू झालेला चेहेरा पाहून कविताताई म्हणाल्या.
'नको. नुसती केली तर कडूजार लागते आणि बेसन घालून केली तर ढवळून ढवळून हात दुखतो आणि तरी भांड्याला लागते' मी नाक मुरडलं.

पण २-३ दिवसच झाले आणि मी आपणहून मेथीची भाजी घेऊन गेले कविताताईकडून. कारण फूड फूड चॅनेल वरच्या 'हाऊ टू कुक' शो मध्ये संजीव कपूरने दाखवलेली मेथी केळं शेव भाजी करून पहायची होती. खरं तर मला फार काही आशा नव्हती पण गाजराची पुंगी....

मागच्या रविवारी केली. चांगली झाली होती. नेहमी त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन आपण वैतागतो. त्यात काहीतरी नवीन म्हणून रेसिपी देते आहे.

सगळ्यात आधी नेहेमीप्रमाणे पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात हिंग, मोहरी, जिरं, मेथीदाणे, हळद, धणेपूड, जिरेपूड घाला. थोडं पाणी घाला. मिक्स करा.
आलं-हिरवी मिरची पेस्ट घाला. मेथी घालून मिक्स करा. २-३ मिनिटं परता.
पाऊण कप पाणी घाला. मीठ, केळ्याचे काप घाला. मिक्स करा. २-३ मिनिटं शिजवा.
वरून थोडे शेव घाला. मिक्स करा.
जेवायच्या वेळी वाढताना उरलेले शेव घालून मिक्स करून सर्व्ह करा.

फोटू - काढेन काढेन म्हणताना राहून गेलं तेव्हा फोटू इल्ले.

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर, फूड फूड चॅनेल, हाऊ टू कुक शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉम्बिनेशन ऐकून जरा कानावर हात ठेवून नहीं किंचाळावं वाटलं.
कदाचित चांगली लागतही असेल.काय माहीत.परत भाजी करून फोटो टाक स्वप्ना.

कॉम्बिनेशन ऐकून जरा कानावर हात ठेवून नहीं किंचाळावं वाटलं. >>> +१११

खरच फोटो टाका, बघून आवडली तर करण्याचा प्रयत्न नक्की करणार Proud
मेथी खूप आवडते, सिझनला तर दर दुसऱ्या दिवशी असते घरी पण हे कॉम्बि वेगळेच वाटतेय.

मेथी केळी भजी नाही खाल्ली का पब्लिकने???????फेमस गुज्जू प्रकार आहे हा भजीचा, मस्तच लागते. ही रेसीपी पण चांगलीच असेल चवीला.

खबर छे अमने लंपनभाई।

मेथीचे गोटे ( गोल भजी) आणि केळ्याचे सालीसह मोठे तुकडे उंधियोत असतात. शिवाय रताळी, बटाटे, गराडुचेही असतात. मुख्य वांगी आणि वालपापडी आणि तेल.

तर यास थोडा ट्विस्ट मारला आहे संजीव कपूरने. हल्ली तो तेल कमी घालतो.

आता संजीव कपूर म्हणालीस म्हणून तर गप बसते... शेव तरी त्याने धड नावाची घालावी ना.
माझ्या वैनीबायने असलं केलं असतं तर 'नेक्स्ट काय? आता शिकरणीत वेलची ऐवजी मेथीपूड घालणार काय?? " विचारलं असतं Wink Happy

(रेसिपी लिहीली छान आहे!!)

पिकले केळे रेसिपी फार अंडर रेटेड प्रकार राहिला आहे

...... by BLACKCAT

ना~~~~~ही.
मध्यंतरी दोन वर्षांपूर्वी केरळात जाण ऱ्या ट्रेन्समध्ये pantry carमधून वडा समोसा, सँडविच चालू केल्यावरून बहिष्कार घातला तिकडच्या पब्लिकने. केळ्याची भजी ऊर्फ पषमपूरी आणि उडिदवडा, इडली पुन्हा चालू करायला लावले.

दुधिच्या वड्यांमध्ये मेथीपूड पेरणे हे ड्राईफ्रुट चुरा लावण्यापेक्षा अधिक चांगले लागते. थोडीशी कडवट चव गोडाची चव सुधरवते.

मी ही रेसिपे फुडफुडावर बघितली होती अन मला "कायच्या काय करतो हा बाब्या" असं वाटून मी फॉक्स लाईफ वर गेलो होतो ते आठवलं एकदम. परंतु इथली कृती अन प्रतिक्रिया वाचून केळ्+मेथी हा खरंच आवडीने खाण्यातला प्रकार वाटला. गुजराती प्रकार आहे म्हणजे गोड असणार हे ओघानं आलंच. तरिही कधी कुठे खायला मिळाली तर नक्की खाऊन बघेन. आमच्या घरी असा प्रकार करायचा मानस व्यक्त केला तरी चेहर्‍यावर काय प्रतिक्रिया येतील हे लक्षात येऊनच मी नाद सोडतो.

'नको. नुसती केली तर कडूजार लागते आणि बेसन घालून केली तर ढवळून ढवळून हात दुखतो आणि तरी भांड्याला लागते' मी नाक मुरडलं.>> असं कसं काय कडूजार लागते नुसती मेथी..? मी तर साधी लसूण फोडणीला घातलेली कढईभर सुकी मेथी भाजी नुसती खाऊ शकतो. तुम्ही नक्की कशा करता नुसती मेथी..? पाणी-बिणी तर टाकत नाही ना शिजताना..?? मेथी फोडणीला टाकल्यावर लगेच त्यावर भिजलेली मूगडाळ/मटकी डाळ्/मसूर डाळ किंवा ठेचलेले न-भाजलेले शेंगदाणे टाकून नीट पाणतुटी होईपर्यंत शिजवली तर कडू नाही लागणार. (मी तर मेथी भाजी करताना अंगच्या पाण्यात शिजता-शिजता पण वाटीभर काढून खातो तरी कडू नाही लागत..! Uhoh )

>>परत भाजी करून फोटो टाक स्वप्ना.

नक्की टाकेन.

>>असं कसं काय कडूजार लागते नुसती मेथी..? मी तर साधी लसूण फोडणीला घातलेली कढईभर सुकी मेथी भाजी नुसती खाऊ शकतो.

तुमची कडूची व्याख्या आणि माझी व्याख्या ह्यात फरक असणार हो. कोणाला मीठ जास्त लागतं तर कोणाला कमी त्यातलाच प्रकार.

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार. पण एकूणात इथला प्रतिसाद पहाता ह्यापुढे ह्या कार्यक्रमातल्या रेसिपी़ज टाकाव्यात की नाही असा विचार करतेय. Uhoh आपल्याला रेसिपी आवडली, केली, खाल्ली, मामला खतम.

तुमची कडूची व्याख्या आणि माझी व्याख्या ह्यात फरक असणार हो.>>>exactly, मला भाजी बिलकुल कडू लागत नाही पण तीच भाजी कडू लागते म्हणून नवरा आणि मुलगी खात नाही,शेवटी मी मेथी मलई मटार, मेथी पराठा,थालीपीठ आणि मेथी शेंगदाणे रस्सा भाजी असे प्रकार करते आता, सुकी भाजी माझ्या पुरती करून Sad

स्वप्ना-राज ,ही हटके पाकृ आहे, करून बघितल्या शिवाय अंदाज येणार नाही,फक्त केळ बऱ्याचदा नेहमीच्या भाजीचा भाग नसतं म्हणून प्रतिसाद तसे आले असतील

छान रेसिपी..नवीन आहे.
मी गुगलुन फोटो पाहून आले या रेसिपी बाय संजीव कपूरचा.टेस्ट करायला आवडेल एकदा.

कॉपीराईट इ प्रकार भंग होत नसेल तर प्लीज रेसिपीज टाकत राहा. तुझं लेखन आवडते. ते संजीव कपूरने मेथी-केळं काँबिनेशन केलं तर त्यात तू कशाला मनाला लावून घेते.

मला शीर्षक वाचून वाटलं कच्ची केळी घेतली असावीत, किंवा केळी नाहीच कशी गंमत केली लिहिले असेल, किंवा केळं नावाची दुसरी भाजी किंवा मासे असतील.

पण शेवटी खरंच पिकलेली केळी घातलीत!
करून बघतो एवढ्या रेसपीत लिहिलंय, कोणत्या त्या आठवतही नाही, पण ही करून बघावीशी वाटतेय, हे कॉम्बिनेशन कसं लागतं ते बघायला.

डीजे प्लस वन. मी मेथी परतून लसूण घालून, पातळ भाजी नाहीतर पराठे करते. मेथी पावडर ग्रीन स्मूथी मध्ये घालून पण पितो. पण कडवट चा फार त्रास नाही झाला. एक स्पेक्ट्रम असावा कडू चवीचा. एक परी शेव चालेल पण केळं ते ही पिकलेलं कुच्छ जम्या नही.

तुम्ही छान लिहीली आहे रेसीपी. प्रतिसाद भाजी बद्दल आहे. लिहीत जा.

संजीव कपूर जरा हाइप्ड आहे आणि त्याची स्टाइल जुनी झाली. रणवीर ब्रार किंवा कुणाल कपूर नाहीतर आपले मास्टर रेसीपीवाले विष्णू भाउ पण बर्‍या रेसीपी असतात. पण मेथीच्या लसूण घालून परत्लेल्या भाजीला तोड नाही.

सध्या गुजराती काही पण म्हणजे चार हात दूर अशीच मानसिकता होत चालली आहे.

सध्या गुजराती काही पण म्हणजे चार हात दूर अशीच मानसिकता होत चालली आहे.>> Biggrin गुजरात म्हणजे भारतातील चीन अशी मानसिकता तयार होऊ लागली आहे... गुजराती व्हेंटिलेटर, गुजराती हिरे, गुजराती साड्या, गुजरात मेड बसेस, गुजरात मेड तुर, शेंगदाणे ई. ई.

प्लीज रेसिपीज टाकत राहा. तुझं लेखन आवडते. ते संजीव कपूरने मेथी-केळं काँबिनेशन केलं तर त्यात तू कशाला मनाला लावून घेते.>>>>>>> हो नायतर काय.बरोबर म्हंती आमची रखमा. लिही गं तू .आवडतं वाचायला.
तसं जरा दचकवणारं कॉंबिनेशन आहे. माझ्या मैत्रीणीच्या घरी केळं टोमॅटो कोशिबीर करतात नेहमी.

कधीकधी अशी कोम्बो चांगली लागतही असतील.
मला तर मेथी मटर मलई पहिल्यांदा ऐकल्यावर पण दचकायला झालं होतं.

स्वप्ना, हटके पाकृ टाकत रहा गं! तू त्या स्वतः करून बघतेस आणि मग लिहीतेस त्यामुळे बाकीच्यांना जरा जास्त confidence येत असणार करून बघण्यासाठी. शेवटी टिव्हीवर पाहीलेली आणि कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने करून पाहिलेली असा फरक पडतोच ना!

Pages