पावसाळी रानभाजी :: कुटणी :: पानांच्या वड्या

Submitted by MSL on 8 July, 2021 - 04:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

10 ते 12 स्वच्छ धुतलेली कुटणी ची पाने,
2 वाट्या भाजणी,
अर्धी वाटी चिंच गुळ कोळ,
1 चमचा तिखट ( चवी नुसार)
मीठ, हिंग, हळद, चवी पुरते...
..वड्या तळण्यासाठी तेल ..

क्रमवार पाककृती: 

1. प्रथम कुटनी ची पाने स्वच्छ धुवून घ्यावी..पाणी निथलत चाळणीत ठेवून द्यावी..
2. सारणासाठी::
भाजणी , चिंच गूळ कोळ, तिखट,मीठ, हिंग, हळद सर्व मिक्स करून घ्यावे...त्यात थोडे थोडे पाणी घालून मिश्रण तयार करावे...जाडसर च असावे... म्हणजे पानावर लावता येईल...पसरून जाणार नाही, असे....
3. प्रत्येक पना घ्यावे, त्याच्या मागच्या बाजूला हे वरचे मिश्रण लावून घ्यावे..आणि, पहिल्यांदा कडेने उभे फोल्ड आणि मग गोलाकार वळून घ्यावे...( अळुवडी चे उंडे असतात तसे)
4. असे सर्व उंडे झाले की कूकर मध्ये वाफवून घ्यावे..
5.थंड झाले की गोलाकार पातळ काप काढून तळून खावे...
6. फक्त पावसाच्या सुरुवातीला ही भाजी मिळते... वेल उगवतो ..लाल हिरवट पाने , साधारण heart shape असतात...

वाढणी/प्रमाण: 
4 ते 5
अधिक टिपा: 

..करून बघा...नक्की आवडेल...

माहितीचा स्रोत: 
सासर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वड्या छान कुरकुरीत दिसत आहेत.
मसाल्याची पाने आहेत का ही. माझ्या मैत्रिणीची आई मसाल्याच्या पानांची वडी बनवायची. अळूवडीपेक्षा जास्त खमंग लागतात त्या कारण मसाल्याचा स्वाद असतो पानाला. पण इथे ती पाने मिळतच नाहीत.