Submitted by अश्विनीमामी on 7 July, 2021 - 05:34
आज भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतो आहे. २०१९ मध्ये कार्य भार संभाळ ल्यावर आज प्रथमच मंत्री मंडळात महत्वाचे बदल होत आहेत. काही मंत्री राजीनामा देउन पाय उतार झाले आहेत . काही नवे चेह रे आले आहेत. शपथ विधी आज सात तारखेला संध्याकाळी आहे.
लेबर मंत्री आरोग्य मंत्री ह्यांनी राजिनामे दिले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/cabinet-reshuffle-santosh-gangwar-labour...
आपले सिंदिया राणे, देवेंद्र पण चर्चेत आहेत. गडकरी ह्याम्चे खाते राहणार का बदलणार?
त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष चर्चा करण्या साठी धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणातेही फेरबदल केले तरी
मंत्रीमंडळात कोणतेही फेरबदल केले तरी सरकार दोघेच जण चालवतात - एक शेखचिल्ली अन दुसरा मुंगेरीलाल
आता २०२४ निव ड्णुकांपर्यंत
आता २०२४ निव ड्णुकांपर्यंत पर्फॉरमन्स दाखवावा लागेल असे मत ऐकले. त्या अनुषंगाने बदल केले असतील.
गेल्या ७ वर्षांचा पर्फॉर्मन्स
गेल्या ७ वर्षांचा पर्फॉर्मन्स काय आहे ते सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना असे फेर्बदल करून काय साध्य होणार..!
विदा सकट लिहा . बदल का
विदा सकट लिहा . बदल का पाहिजे ते लिहा. मिनिस्ट्री वाइज लिहिता येइल.
देवेंद्रांची चर्चा कुठे ऐकली?
देवेंद्रांची चर्चा कुठे ऐकली? ते केंद्रात गेले तर इकडे कोण लढणार?
राणेंना वजन देवून शिवसेनेला कोकणात शह देण्याचा मानस असावा
गडकरींचे प्रस्थ कमी झाले असले तरी त्यांना धक्का लावायची गरज नाही.... काम चांगले आहे त्यांचे!
देवेंद्रांची चर्चा कुठे ऐकली?
देवेंद्रांची चर्चा कुठे ऐकली? ते केंद्रात गेले तर इकडे कोण लढणार?>> हो ना . अनील थत्ते बोललेले.
चर्चेतील नावांची यादी वाचली
चर्चेतील नावांची यादी वाचली की लक्षात येते ते पक्ष आणि पक्षांतील लोकांचे होणारे भविष्यातील फायदे पाहिले असणार. हा एवढाच निकष आहे. सात वर्षांत सामान्य माणसासाठी काही चांगले झाले नाही आणि पुढेही काही चांगले होणार नाही. भाबडी किंवा खोटी आशा ठेवावी अथवा करावी एवढी एनर्जी कुणाकडे असेल असे देखील वाटत नाही.
पेट्रोल गॅस व डिझेल चे दर
पेट्रोल गॅस व डिझेल चे दर वाढलेले आहेत.
मुलांच्या शिक्ष णाचा बोजवारा उडलेला आहे.
कोविड सेकंड वेव्ह. भयानक अंडर पर्फॉरमन्स
बेकारी वाढलेली आहे.
राणे मुळे भारतीय जनता पक्षाचा
राणे मुळे भारतीय जनता पक्षाचा काही फायदा होणार नाही उलट नुकसान होईल.
राणे आणि त्यांचे पुत्र ह्यांची भाषा बघितली तर ह्यांच्या मध्ये कोणतीच नैतिकता नाही.
सामान्य लोक त्यांच्या पाठी कधीच जाणार नाहीत.
ही जुनाट खोड पक्षात घेण्या पेक्षा त्यांना मंत्री करण्या पेक्षा नवीन उभरत्या नेत्यांना मंत्री पद दिले असते तर पक्षाचा नक्कीच फायदा झाला असता
तो लडाखचा एक खासदार/
तो लडाखचा एक खासदार/ आमदार घेणार आहेत.
राणे-पिता-पुत्रांना शाखेत
राणे-पिता-पुत्रांना शाखेत जॉईन करऊन घ्यावे.. रा.स्व. संघाचे भले होईल
महाराष्ट्रातून नारायण राणे ,
महाराष्ट्रातून नारायण राणे , कपिल पाटील, डॉ भागवत कराड आणि डॉ भारती पवार ही नावं आहेत.
नव्याने मंत्री होणाऱ्या शोभा करंडलजे यांनी आपल्या सगळ्या ट्वीट्स उडवल्यात. पूर्ण पाटी साफ.
प्रकाश जावडेकर बाहेर.
प्रकाश जावडेकर बाहेर.
नारायण राणे केंद्रात म़त्री
नारायण राणे केंद्रात म़त्री आणि कृपाशंकर सि़ह यांचा भाजप प्रवेश या दोन गोष्टींसाठी मायबोलीवरील भाजप समर्थकांचं विशेष अभिनंदन.
त्यांनी या दोघांबद्दल लिहिलेले प्रतिसाद डिलीट करता आले असते तर किती बरं वाटलं असतं (त्यांनाच)
यालाच राजकारण म्हणतात!
यालाच राजकारण म्हणतात!
चालायचेच!...... सत्ताकारणातल्या तडजोडी असतात या
इथे मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी ज्याला पक्ष काढल्यापासून शिव्या दिल्या त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत लोक..... बाकी तर किरकोळ आहे त्यापुढे
बाई बाई. सत्तर वर्षांत झाला
बाई बाई. सत्तर वर्षांत झाला नाही इतका महान , लोकप्रिय नेता पंतप्रधान! जगातला सगळ्यांत मोठा पक्ष! शंभरीकडे वाटचाल करणारी मातृसंघटना! पार्टी विथ अ डिफेन्स!
तरीही तडजोडी कराव्या लागतात?
उद्या कोणाच्याही भ्रष्टाचाराबद्दल कीबोर्ड बढडवताना लक्षात ठेवा म्हणजे झालं.
नवे मंत्री तरी काही कामं करणार की जुन्यांसारखे फक्त राहुलला ट्रोल करणार?
राणेंना ठाकरेंना ट्रोल करायला घेतलं असेल.
>>भ्रष्टाचाराबद्दल कीबोर्ड
>>भ्रष्टाचाराबद्दल कीबोर्ड बढडवताना<<
इतके भाबडे आहे का कुणी इथे? भलताच आशावाद!
>>राणेंना ठाकरेंना ट्रोल करायला घेतलं असेल.<<
सो नाइव्ह!! मंत्री झाल्यावर जास्त जबाबदारीने वागायला लागते..... इथले ब्रिगेडी जी भाषा बोलतात ती बोलता येते का तुमच्या मंत्र्यांना? अगदी मनात कितीही तेच असले तरी संयमानेच बोलावे लागते ना त्यांना?
भाजप मंत्री आणि जबाबदारी?
भाजप मंत्री आणि जबाबदारी?
सध्याच्या मंत्र्यांच्या ट्वीट्स वाचल्याचं का कधी?
हर्षवर्धननी डॉ मनमोहन सिंगना दिलेलं उत्तर?
गोरी मारो बालों को फेम अनुराग ठाकुरचं प्रमोशन.
बाकी जिथे यांचा मुकुटमणीच डिसलेक्सिया सारख्या गंभीर गोष्टीवरून मुलांसमोर नीच कमेंट्स करतो तिथे नीचपणा करणं हीच खरी कर्तबगारी
एक पण मुस्लिम व्यक्ती ल
एक पण मुस्लिम व्यक्ती ल मंत्रिपद नाही.
डी एन ए एकच हाय पर्षांत भौ
डी एन ए एकच हाय पर्षांत भौ
महाराष्ट्र मधून जे मंत्री
महाराष्ट्र मधून जे मंत्री केले आहेत त्यांना राज्य स्तरावर कोण ओळखते?त्यांच्या मतदार संघा पुरतीच त्यांची ओळख आहे.
मोदी ना असेच मंत्री पाहिजेत ज्यांना लोकांचा पाठिंबा नाही.
आणि हे कमजोर मंत्री मोदी सांगेल तेच करणार ह्यांना स्वतच्या मनाने काहीच करण्याची हिम्मत होणार नाही .
अनेकांना वाटतं असेल की आजच्या
अनेकांना वाटतं असेल की आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामुळे महाराष्ट्रात जास्त काही फरक पडणार नाही तर आपण कदाचित राजकारण फक्त वरवर बघतो आहोत. आजच्या घडामोडींमुळे कदाचित महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना काहीही फरक पडत नाही कारण त्यांना 2019 विधानसभा निवडणूकीत नेते गेल्यामुळे जितका नुकसान व्हायचा तो झाला आहे. उलट आता सत्तेची कवच कुंडले असल्यामुळे त्यांना आपले परंपरागत विभाग अधिक मजबूत करता येत आहेत.
त्याउलट, शिवसेनेचे चालू आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने दोन-तीन खुश मस्कऱ्यांच्या नादाला लागून नामकरणाच्या मुद्द्यातून आगरी समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे ही भावना असंख्य आगरी युवकांच्या मनात आहे. जो आगरी समाज स्थापनेपासून आपल्या सोबत होता त्यालाच बाजूला करताना पुढील गोष्टींची कल्पना देखील शिवसेना नेतृत्वाला येऊ नये?
आज कपिल पाटील साहेबांना केंद्रात मंत्रीपद देऊन आगामी काळात भाजपा आगरी समाजात पकड मजबूत करणार हे स्पष्ट आहे. नारायण राणे साहेबांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद देऊन आगामी काळात शिवसेना - भाजप युती होणार नाही हे देखील अप्रत्यक्षरीतीने जाहीर केले. सत्तेची साथ मिळाल्यावर राणे यांच्यासारखा नेता आपले राजकीय वजन कोकणात दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. सिंधुदुर्गात मागील महिन्यात एका पेट्रोल पंपावर झालेला राडा आगामी काळातील संघर्षाची कदाचित एक झलक असू शकते. त्यामुळे, मुंबई पासुन कोकणात शिवसेनेचा स्ट्राँग होल्ड आहे तिथे-तिथे भाजप आपले अस्तित्व वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. याचा फटका ना राष्ट्रवादीला बसणार ना काँग्रेसला बसणार. उदाहरणच द्यायचे झाले तर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांचेच देता येईल. त्यांना या मंत्रीमंडळ विस्तारामुळे कोणताही फरक पडत नाही. त्यांची सीट पडणार नाही. पण, त्याच रायगड मधील उरण तालुक्यात शिवसेनेला आगामी काळात शेकापक्षाचे विवेक पाटील यांच्या बाजूला झाल्यामुळे संधी होती. पण, आता सध्यातरी तिथे शिवसेना मागे पडली आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई येथे जिथे शिवसेनेसोबत आगरी समाजाची ताकद होती तिथे शिवसेनेला बसणारा फटका खुप अधिक असेल आणि कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रीपद देऊन भाजप या सर्व ठिकाणी आपली ताकद अधिक जोमाने वाढवेल.
बीडमध्ये मंत्रीपद न दिल्यामागे देखिल शिवसेना हेच कारण तर नसेल ना?
आगामी काळात खुप सारा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येणार आहे. विधानसभा अधिवेशनात घडलेल्या घडामोडी ही कदाचित त्याचीच झलक असावी...!!
त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष
त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष चर्चा करण्या साठी धागा.
>>>>>>
हे भारताची क्रिकेट टीम जाहीर झाली तर शक्य आहे. ईथे नाही
पण या धाग्यामुळे हे असे झालेत हे समजले. नाहीतर हल्ली बातम्याच बघणे होत नाहीत. कोरोनातही मेल्यांचे राजकारण संपत नाहीये.
विखे ना मन्त्रिपद नाही
विखे ना मन्त्रिपद नाही
पपु डिसलेकसिया असेल तर मग हे
पपु डिसलेकसिया असेल तर मग हे दाढिवाले अल्झायमरचे शिकार म्हटले पाहिजेत
निवडणुकीतील वचने आठवत नाहीत
अल्झायमरचे शिकार दाढीवाले
अल्झायमरचे शिकार दाढीवाले नाही, भारतीयांना म्हणा.
दाढीवाले हुषार आहेत.
राणेंनी काय कर्तृत्व दाखवलं,
राणेंनी काय कर्तृत्व दाखवलं, त्यामुळे त्यांना एवढं महत्व दिलं, इथे तर फार बडबड करत होते, उ ठा मु मंत्री होणार नाही. आज पडेल सरकार, 11 दिवस, 11 महिने. झालं दीड वर्ष. त्यांना पक्ष एवढा का डोक्यावर बसवतोय.
कृपाशंकर सिंह यांना का घेतलं, तेही आवडलं नाही मला.
उरणकर तुमची पोस्ट आत्ता वाचली
उरणकर तुमची पोस्ट आत्ता वाचली, अभ्यासू आहे. तरी शेवटी राजकारणात त्या त्या वेळी काय होईल आणि कोण कोणाबरोबर जाईल, काही सांगता येत नाही मात्र. शिवसेनेने अकारण एका मोठ्या समाजाला दुखवू नये, वेळीच सावरावे हे नक्की वाटतं. मी सेनेची मतदार नाही, भाजपची आहे.
पुढची निवडणूक सेनेला कठीण जाणार आहे निदान कल्याण मतदारसंघात तरी नक्की, डोंबिवलीत भाजपचे मतदार जास्त आहेत, कल्याण भागात सेनेचे आहेत पण वर उरणकर यांनी उल्लेख केल्याप्रमाणे आगरी समाजाची मतं सेनेला मिळतील असं वाटत नाही, ती मनसेकडे वळण्याचे चान्सेस जास्त आहेत (आत्ताही आमच्या कल्याण ग्रामीणचे आमदार मनसेचे आहेत). युती होती म्हणून आमची मतं (भाजप मतदार) त्यांना मिळायची, कारण आमच्या भागात सेनेला जागा मिळायची पण आता भाजपचे मतदार भाजपला मत देणार कारण आता वेगवेगळे लढतील.
नुसत्या एअरपोर्टला नाव न
नुसत्या एअरपोर्टला नाव न देण्याने जगभरचा आगरी समाज अमुक पक्षाला मत देणार नाही , ह्या फक्त वलग्ना आहेत , असे काही होत नाही
शीख दंगलीचे भांडवल भाजपे प्रत्येक निवडणुकीत करतात , पण ह्या वेळच्या राज्य निवडणुकीत पंजाबमध्ये जनतेने भाजपाचे सरकार हाकलून काढून काँग्रेसचेच सरकार आणले. अमित शहाने स्वप्नातसुद्धा ऑपरेशन लोटसचा विचार करू नये , इतक्या कमी सीट भाजपाच्या आल्या आहेत
कुणीही कितीही म्हटले तरी जनता स्वतःच्या सोयी बघते आणि राजकारणीही स्वतःच्या सोयी बघतात. सेना आणि मनसेवालेच पर प्रांतीय करून नाचत असतात , पण आज ह्यांचेच 20- 25% तरी प्रतिनिधी नेते परप्रांतीय असतील ना ?
भाजपावाळ्याना आज काही उद्योग उरला नाही , म्हणून ते एअरपोर्ट नामांतरवरून नाचत आहेत , जर त्यांची सत्ता असती तर त्यांनीही मोदी नैतर वाजपेयींचे नाव दिले असते.
आणि आज जे नामांतर प्रकरणावरून भाजपला मिठी मारत आहेत , एकेकाळी ह्यांनीच वाजपेयींचे सरकार 1 मताने पाडले होते.
2 वर्षात मोदी सरकारने आरोग्यमंत्री बदलला म्हणजे करोना , लसीकरण इ वर देश पातळीवर मोदीसरकार फेल झाले , ह्याचा कबुलीजबाब का ?
ह्याचा कबुलीजबाब का ?>> हो.
ह्याचा कबुलीजबाब का ?>> हो.
Pages