
पाव किलो वाटाणे,
२ मोठे बटाटे उकडून,
१ कांदा,
१५ मोठ्या लसुण पाकळ्या,
२ इंच आले,
मिरच्या ३-४,
एक मोठा चमचा जिरे पूड,
एक मोठा चमचा धणे पूड,
मीठ,
३ मोठे चमचे तेल
१. वाटणे आठ ते दहा तास भिजवून ठेवावेत. नंतर ते भिजतील एवढे पाणी घालून, अर्धा चमचा मीठ घालून कुकरला चार शिट्ट्या करून मऊ उकडून घ्यावेत. थोडे गरम असतानाच मॅशर ने मऊ करून घ्यावे.
पाणी जास्त झाले तर चाळणीतून वाटाणे गाळून घ्यावेत. आणि खाली उरलेले पाणी तूप घालून गरम गरम सूप म्हणून घ्यावे. अतिशय भारी लागतं हे!
२. बटाटे सोलून किसून घ्यावे.
३. आलं- लसुण आणि मिरची मिक्सरला वाटून घ्यावे.
४. कढईमध्ये तीन चमचे तेल घालून, आले- लसूण- मिरची पेस्ट घालून परतून घ्यावे. लसणाचा कच्चा वास गेला कि गॅस बंद करावा आणि त्यातच एक चमचा जिरेपूड एक चमचा धणेपूड घालून व्यवस्थित मिक्स करावे.
५. आता कुस्करलेले बटाटे कढई मधल्या मिश्रणात घालावे. त्यावर मॅश केलेला वाटाणा आणि दोन चमचे मीठ घालावे.
६. आता अगदी दोन ते तीन मिनिटं हे मिश्रण गरम करावे. आणि गॅस बंद करावा.
७. एक मोठा कांदा चिरून घ्यावा आणि या मिश्रणात कच्चा मिक्स करावा. हे झालं मिश्रण तयार .
८. आता आपण जसे नेहमी सँडविच करतो तसे बेडच्या एका भागाला हे मिश्रण व्यवस्थित भरावे व वरून दुसरी स्लाईस नीट दाबून धरावी. मिश्रण ब्रेडला लावल्यावर एक एक चिमुट तिखट आणि चाट मसाला पेरावा.
तूपावर खरपूस भाजून घ्यावेत.
ही सँडविचेस केचप प्रमाणेच चिंचेच्या चटणीबरोबर सुद्धा धमाल लागतात . हिरवा वाटाणा असल्यामुळे बर्यापैकी प्रोटिन्स मिळतात. जंक शोधायचा म्हटलं तर ब्रेड स्लाईसेस आहेत!
बाहेर धो धो पाऊस पडताना गरम-गरम वाफाळणारे चटपटीत सँडविच खाण्याची मजा औरच!
मस्त आहे पाककृती! करून पाहणार
मस्त आहे पाककृती! करून पाहणार.
भन्न्न्नाट्ट्ट
भन्न्न्नाट्ट्ट
छान आहे सँडविच.
छान आहे सँडविच.
मस्त कृती आहे.
मस्त कृती आहे.
यातला रगडा उरला तरी ब्रेड संपले तरी शेव चिंच चटणी घालून खाता येईल.
उसळपाव.
उसळपाव.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
Srd, सॅंडविच! उसळीचा मसाला आणि कृती वेगळी आहे . शिवाय बाकी कडधान्यां बरोबर असे सॅंडविच कसे लागेल ते सांगता येत नाही.
तोंपासू
तोंपासू
मस्त आहेत.
मस्त आहेत.
ब्रेड एवजी हा मसाला चपातीत घालुन फ्रन्कि करुन खाता येईल.
पण टोस्ट जास्त मस्त लागतात.
यम्मी
यम्मी
छान लागतील. पण ब्रेड मुळे
छान लागतील. पण ब्रेड मुळे माझा पास. अमुपरी म्हणतेय तसं फ्रॅंकी करून खाईन हे मिक्स्चर वापरून.
काबुली चण्याचे करतात त्यास
काबुली चण्याचे करतात त्यास फलाफेल सँडविच म्हणतात बहुतेक.
माझ्या लहानपणी शाळेजवळ सिंधी कॉलनी होती. तिथे मटकी,मुग,वाटाणे उसळ पाव मिळायचा. खूप लोक खात असत. (१९६६) मसाल्यात आणि पावात फरक असेल पण मूळ तेच. चविष्ट लागते, तळलेला पदार्थ नाही आणि पोट भरते. विरार भागात पूर्वी {पंजाबी}समोसा-पाव मिळायचा.
वाचनखूण करते आहे. आयडिया भारी
वाचनखूण करते आहे. आयडिया भारी आहे.