८-१० मोठ्या पोपटी हिरव्या मिर्च्या
३-४ मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून
लाल मिर्ची पावडर,
गरम मसाला पावडर,
आमचूर पावडर,
चाट मसाला,
कोथिंबीर धूउन बारिक चिरून
मीठ
बेसन पीठ
चिमुट्भर खा. सोडा
मिर्च्यांचे देठ न काढता मिर्चीला मधे चीर देउन बिया काढून थोड्या मिठाच्या पाण्यात टाकून ठेवाव्यात.
बटाटे सोलून किसून किंवा मॅश करून त्यात आवडीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, चिमूट्भर आमचूर पावडर, मिठ, चिरलेली कोथिंबीर, सर्व मसाले एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यावे.
मिर्च्या पाण्यातून काढुन घेउन निथळून त्यात वरिल प्रमाणे तयार केलेले सारण गच्च भरावे.
एका भांड्यात बेसन, चविपूरते मीठ, चिमूट्भर सोडा घालून भजीसाठी भिजवतो त्या प्रमाणे पण थोडे घट्टसर पिठ भिजवावे.
कढईत तेल चांगले तापवून मग मध्यम आचेवर बेसनाच्या बॅटर मध्ये बुडवून मिर्च्यांचे वडे तळावेत.
चिंच खजूराच्या गोडसर चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावेत.
मिर्च्या घेताना कडक ताज्या मोठ्या घ्याव्यात. मोठ्या मिर्च्या कमी तिखट असतात.
तशीही ह्या मिर्च्यांना खास चव नसते.
म्हणूनच सारणात लाल तिखट आणि गरम मसाला दोन्ही वापरावे.
देठ न काढता मिर्च्या तश्याच ठेवल्याने तळताना सोप्पे जाते.
बेसन पिठात शक्यतो तिखट किंवा हळद घालू नये. तळल्यावर काळपट दिसतात.
चविसाठी ओवा-जिरा पूड वापरू शकता.
हे वडे मध्यम आचेवर तळल्याने एक्दम खमंग होतात.
पार्टीसाठी वेरिएशन म्हणून बेसनाच्या बॅटर मधून बुडवून मग भिजवलेल्या साबुदाण्यात घोळवले की मोतिया भजी सारखे दिसायला सुंदर दिसतात. व वर चिकटलेल्या साबुदाण्यांमुळे छान लागतात.
नुसती कृती वाचून तोंडाला पाणि
नुसती कृती वाचून तोंडाला पाणि सुटलंय....
>>वाढणी/प्रमाण:
खाउ तसे >> हे जाम आवडलं
काहीतरी मस्त खमंग वाटतेय
काहीतरी मस्त खमंग वाटतेय ग!

धन्यवाद
बटाटेवड्याचे सारणपण टाकता येईल मस्त लसणाची फोडणी देउन
मस्त आहे..करुन
मस्त आहे..करुन बघणार...
पार्टीसाठी वेरिएशन म्हणून बेसनाच्या बॅटर मधून बुडवून मग भिजवलेल्या साबुदाण्यात घोळवले की मोतिया भजी सारखे दिसायला सुंदर दिसतात. व वर चिकटलेल्या साबुदाण्यांमुळे छान लागतात.>>>>>> भारीच..
मस्तच!!
मस्तच!!
ओह आम्ही ह्याला मिर्ची भजी
ओह आम्ही ह्याला मिर्ची भजी म्हणतो
पॉटलकसाठी ऑन डिमांड आयटम असतो नेहेमी. आतल्या सारणात तिखटाऐवजी हिरवी मिरची बारीक चिरुन घालायची. अशी मस्त झणझणीत भजी होतात. यम्मी !!
साबुदाण्याची आयड्या भारीच.
साबुदाणा आयडीया खुपच खास.
साबुदाणा आयडीया खुपच खास. यासाठी नक्की करणार येत्या वीकांताला.
आम्ही हैद्राबादला खाल्ली होती
आम्ही हैद्राबादला खाल्ली होती मिरची भजी. नवर्याच्या मित्राच्या आईने केली होती. त्यात त्यांनी मिरचीमध्ये खसखस, दाण्याचे कूट, चिंच आणि इतर मसाले (हळद, तिखट्,ग्.मसाला) यांचे सारण भरले होते.
माझी आई नेहमी आम्ही गेलो की करते जावयाला आवडतात म्हणून. ती मात्र मिरचीत काहीही सारण घालत नाही. फक्त मिरचीला चिर देऊन त्यात मीठ लावून ठेवते, मग पिठातून घोळवून तळते. त्याही मस्त लागतात.
वाव ग्रेटच गं सान्वी.. आजच
वाव ग्रेटच गं सान्वी.. आजच संध्याकाळी मिरच्या आणते आणि करते वडे..
मी उदयपुरला एकलिंगजीच्या देवळाकडे खाल्लेले, तिथली स्पेशॅलिटी म्हणुन. त्याची चव अजुन रेंगाळतेय जिभेवर....... आता पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायलाच पाहिजे परत...
प्राची, त्या मिरची भज्यांची
प्राची, त्या मिरची भज्यांची कृती किट्टुने वेगळी टाकलिये.
हो का, सॉरी. मला माहित
हो का, सॉरी. मला माहित नव्हतं.