मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानवजी,
जिज्ञासा
SRD
Dont Follow or go for youtube Reviews...
All are paid reviews...

सब के सब बिक चूँके है....
बाकी
@जिज्ञासा
Hv u checked SAR value of chinese brands?
Its far above the safe level...
And Oneplus every model has high sar...
Check it out *#07#

@Rocky Bartender, प्रथम नवीन व्यवसायास शुभेच्छा. आजच्या नववर्षाच्या शुभेच्छा.
तुमच्या अगोदरच्या samsung centre च्या अनुभवाचा नक्कीच उपयोग होईल. इकडे कधीकधी लिहित जा.

आपल्याकडे कुणाकडे रिव्युसाठी कंपनी फोन पाठवत नाही. आपण फोन विकत घेतल्यावरच कळते काय आहे आणि काय नाही. त्यामुळे रिव्यु साइट्स, युट्युब विडिओज पाहावे लागतात. थोडीफार कल्पना येते. शिवा बजेट. दुकानात गेल्यावर किंवा ओनलाइन शोधताना आपल्या बजेटातले फोन दिसतात मग त्यांचे स्पेक्स आणि रिव्यू पाहतो आणि ठरवतो. इथेही विचारतात, चर्चा करतात. सर्व गोष्टींचा थोडा उपयोग होतोच. चांगला फोन ही एक कल्पना असते. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्या बजेटात मिळवणे हेच ध्येय असते. बजेटपेक्षा बाहेरच्या फोनमध्ये काय आहे हे सुद्धा जाणण्याची उत्सुकता असतेच.

रॉकी बारटेंडर, SAR value काय असते आणि त्या दृष्टीने चांगले फोन कोणते हे इथे सर्वांच्या माहितीत भर पडावी म्हणून लिहाल का? मी गुगल करतेच आहे.
तुमच्या नवीन व्यवसायासाठी अनेक शुभेच्छा!

@जिज्ञासा and all
SAR means Specific Absorption Rate (SAR) For Cell Phones:
SAR values below1.6W/kg are considered safe as per Indian And international Standards.
But some points about SAR u need to know are as belows-
High SAR means phone absorbs more radio-frequency waves thus gets heat up in small phone calls too. But high SAR value phones gives more network coverage than Lower SAR phones. Its not proven that High SAR value phones are harmful to humans but विषाची परीक्षा घेऊ नये. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे , की High SAR value वाले फोन फार वापरल्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, अस्वस्थता जाणवते.
जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर शक्यतो low Sar वाले फोनच वापरा.
आणि जर ग्रामीण किंवा low network coverage area मध्ये राहत असाल , तर थोडा high sar value वालाच फोन घ्या. ज्याठिकाणी रेंज कमी येते , तिथे high sar वाला फोन चांगल्याप्रकारे रेंज खेचू शकतो.
Low SAR फक्त Samsung आणि iphones मध्ये पहायला मिळते.
या दोन कंपन्या SAR च्या नियमाचं अगदी strictly पालन करतात.
SAR value कसा पहावा?
डायल करा *#07#

बापरे!
मी फोटो चांगले येतील असे बघूनच फोन घेते Lol

रॉकी बारटेंडर, धन्यवाद! माझ्या फोनची sar value 0.394 watts/kg आहे. गुगल केली. डायल करून काही दिसलं नाही.

मोटोरोला जी१०/ मोटोरोला इ७ प्लस आणि नार्झो ३०ए ह्यापैकी कोणता घ्यावा ? मला फोटो वगैरेसठी नको आहे. दणकट बॅट्री, बरीच अ‍ॅप्स असताना देखिल स्लो ना होणे आणि ब्लोटवेअर्स काढता येणे शक्य असणे हे प्रमुख क्रायटेरिया !! रेडमी / रिअलमी ह्यामधे चाण्गले पर्याय असल्यास सुचवा.

आगाऊ धन्यवाद!

ब्लोटवेअर्स काढता येणे
शक्य नसते.

मोटोरोला इ७ प्लस ( बजेट फोन आहे. माझ्या इ५प्लसमध्ये १२६ apps टाकली आहेत. स्लो नाही. ) आणि इतर मोटोरोला फोन्समध्ये almost stock android आहे। screen dull.

रेडमी / रिअलमी यांच्या १२ - १५ हजार बजेट फोनांत मोटोरोलापेक्षा चांगले प्रसेसर आहेत, पण spamy notification, ads आहेत.

इ७ पॉवर -
mediatek g25 processor,
RAM 2GB.
नको.
------------
आता फोन घ्यायचा तर प्रसेसर sd 460 किंवा sd665 budget phone साठी बरे.

बरीच अ‍ॅप्स असताना देखिल स्लो ना होणे यासाठी 3gb RAM हवीच. यापैकी available RAM 2gb हवी. ही फोन हातात घेतल्यावरच दिसते. रिव्यूवाले देत नाहीत.

Moto e7plus अथवा G8 पाहा.

Poco m3
६GB RAM.
१२८ gb rom
६००० battery
Sd ६६5 processor
Price १२०००

Srd , sd 460 प्रोसेसर मधे रीअलमी सी १५ फोन कसा वाटतो ?? ४ जीबी /६४ जीबी आहे आणि ६००० mah बॅटरी. मला कॅमेरा बेताचा असला तरी चालेल. वापरण्याजोगी २ जीबी रॅम असावी अशी आशा आहे.

camera bump नसणारा एखादा फोन सुचवा.

माझ्या Redmi Note 3 मध्ये notification light हा multicolor आहे. त्यामुळे missed call, sms, whatsapp, email & other notifications या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रंगामध्ये notification light glow होतो. charging च्या वेळी सुद्धा battery percentage प्रमाणे वेगवेगळे रंग दिसतात. आकाराने देखील तो व्यवस्थित आहे. दिवसा ७-८ फुटांवरून व रात्री अंधारात पार १५-१६ फुटांवरून दिसेल असा आहे. हल्लीच्या फोनमध्ये मात्र notification light फक्त पांढऱ्या रंगात व तोही अवघ्या २-३ फुटांवरून दिसेल एवढ्याच आकाराचा असतो. यामागील कारण काय? वास्तविक नवीन फोन म्हणजे अजून सुधारणा व्हायला हवी ना? त्याऐवजी अशी उलटी गंगा का वाहताना दिसते????

सारखा स्मार्ट फोन वापरून वापरून माणसाची नजर कमजोर होऊ लागली. मग १५-१६ फुटांवरून दिसणारे नोटिफिकेशन्स ठेवून काय उपयोग? म्हणुन २-३ फुटांवरून दिसणारे केलेत. Wink Light 1

मला एक चांगला ७०-८० हजार रुपयांपर्यंत मोबाईल घ्यायचा आहे.
थोडं स्ट्रेच करून बजेट १,००,००० रुपयांपर्यंत जाऊ शकेल.

कृपया जाणकारांनी जरा सल्ला द्या. मी एवढे पैसे आणू कुठून .. ??

sd 460 प्रोसेसर मधे रीअलमी सी १५

दुसऱ्या साइटवर प्रसेसर g35 दाखवत आहे. बजेट फोनसाठी हे दोन्ही ठीक आहेत. ब्लोटवेअर किती ते बघावे लागेल.
मेन क्याम्रा खास नाही. F/2.2

मला सॅमसंग चा २०-२२ हजार पर्यंत किंमतीचा व जास्तीत जास्त मेमरी असलेला मोबाईल सुचवा (अर्थातच सध्या मोबाईल मध्ये प्रचलीत असलेलीही फीचर्स असावीत). गेल्या ४.५ वर्ष्यापासून सॅमसंग गॅलॅक्सी J7 प्राईम वापरतोय. अजूनपर्यंत कोणतीही समस्या आली नाही. म्हणून त्याऐवजी नवीन घेण्याची तशी मुळीच ईच्छा होत नाही. मात्र त्याची इंटर्नल मेमरी १६ गीबी असल्याने, नवीन ऍप्स इन्स्टॉल करता येत नाहीत, प्रत्येक वेळी एखादे ऍप अनइंस्टॉल करून नवीन ऍप टाकावे लागते आणि अश्या प्रकारे इन्स्टॉल-अनइन्स्टॉल ची कवायत सुरु असते.
मला सॅमसंगच घ्यायचा आहे.

F62 8GB/128 GB बघा.
बाय बॅक आणि कॅश बॅक ऑफर धरून मला 22 हजारांना मिळाला. जड व जाड आहे २२० ग्रॅम्स / ~ ९ मिमी.
पण काही दिवसात सवय होते हेमावैम.

Screenshot_20210819-114204_One UI Home.jpg

इथे खाली Personal आणि Discover दिसतेय ना. तिथे Discover वर क्लिक केल्यास जाहिराती दिसतात.

तसेच स्क्रीन ब्लॅंक असताना आपण अनलॉक करायला घेतला की अनलॉक स्क्रीनच्या बॅकग्राउंडला जाहिरात दिसते.
ती फिंगर प्रिंट सेन्स झाला/पासवर्ड टाकला की निघून जाते.

मी इकडे प्रश्न विचारायच्या आधी मानवदादा तुमचे प्रतिसाद वाचले होते आणि त्यामुळे F62 यादीत आहेच. पण मागच्या काही महिन्यात सॅमसंग मध्ये माझ्या बजेटमध्ये सामावणारा अजून एखाददुसरा नवीन मॉडेल आला का ह्याची पडताळणी करत आहे. कारण माझे स्वतःचे ज्ञान अगदीच शून्य आहे, त्यामुळे आपल्यासारख्या जाणकारांनी सुचवल्यास मला बरे होईल.

Pages