२०-२५ मोठ्या लसूण पाकळ्या, ४०० ग्रॅम तोंडली, २ टेबलस्पून तेल, ४-६ लाल सुक्या मिरच्या, पाव टीस्पून जिरे आणि मीठ (आणि काशिनाथ घाणेकर च्या चालीवर!)
'हा कसला व्हिडिओ पाठवलायस?' मैत्रिणीचा मेसेज आला.
'गार्लिक तेंडली - बाय संजीव कपूर'
'तू खाऊन पाहिलंस का?' मैत्रीणीचा खवचट प्रश्न. जिप्सीच्या (शिवाजीपार्कमधलं) मेन्यूवर 'तोंडलीच्या काचर्या' वाचून तिने 'ऑर्डर करू यात का?' असं विचारल्यावर मी थैमान घातलं होतं मागे एकदा.
'हो. आणि मस्त झाली म्हणून तुला पाठवला व्हिडिओ'
मैत्रिण जवळ रहात असती तर ती खुर्चीवरून पडल्याचा आवाज नक्की आला असता मला
सध्या फूडफूड चॅनेलवर संध्याकाळी ७ वाजता 'How To Cook' ह्या कार्यक्रमात संजीव कपूर रेसिपीज शेअर करतोय. त्यातल्या मी ट्राय करून आवडलेल्या रेसिपीज इथे शेअर करेन म्हणते. फूड फूड चॅनेल वेबसाईट, त्यांचं युट्यूब चॅनेल किंवा संजीव कपूरची साईट ह्यावर हे व्हिडीओज मिळाले नाहीत. मिळाले तर प्लीज लिंक द्या. मग इथे पाकृ टाकायला नकोत.
तर आता पाककृती.
तोंडली खलबत्त्यात घालून अर्धवट ठेचा. लसूण पाकळ्याही थोड्या ठेचून घ्या. लाल मिरचीचे बारीक तुकडे करा.
तेल गरम करा. त्यात जिरं, लसूण, तोंडली, लाल मिरची घाला. परता. मीठ घाला. मिक्स करा. झाकण ठेवून मध्यम आंचेवर ठेवा. तोंडली शिजली की झाली भाजी तयार. डाळ भातासोबत तोंडी लावायला झक्कास होते.
संजीव कपूर हा एक महान शेफ आहे असं घरच्यांचं मत झालेलं आहे. कारण इतने बरसोंमे जो हो ना पाया वो उसने करके दिखाया. आता मी तोंडल्याची फॅन झालेय
ता.क. भाजीचा फोटो फार ग्लॅमरस नाहिये. पण थोर सांगून गेलेत 'मत रहना अखियोंके सहारे'
छान
छान
ठेचलेली तोंडली परतून मग त्यात तयार भात घालून परता, मस्त तोंडली भात बनतो,
खलबत्ता नसेल तर लाटणे उभे धरून एकेक तोंडले ठेचावे
छान पाककृती आहे. आता तोंडली
छान पाककृती आहे. आता तोंडली आणली कि करून बघेन. म्हणजे खाईन.
छान. आमच्याकडे या पद्धतीने
छान. आमच्याकडे या पद्धतीने ठेचलेली तोंडली नागपंचमीला करतात. (काही चिरायचं/ कापायचं नसतं ना त्यादिवशी. मग ठेचा )
सगळ्या प्रतिसादात तोंडली आहे.
सगळ्या प्रतिसादात तोंडली आहे.
मूळ संजीव कपूर महाराजांनी याला तेंडली म्हटलंय का ते माहिती नाही. धागाकर्त्यांनीही तोंडली लिहिलं आहे.
ऑ अॅडमिन्,प्लिज हेल्प. टायटलात दुरुस्ती करा. शोधायला कठीण जाईल स्पेलिंग मिश्टिक मुळे.
https://www.flickr.com/photos
https://www.flickr.com/photos/dinesh_valke/423969177
तेंडली तोंडली व इतर नावे
लिहिणार्याचे आडनाव वाळके आहे.
आता वाळके , काकडी, फूट , खिरा हे कुठे शोधू ?
टरबूज्याला विचारून पहा.
टरबूज्याला विचारून पहा.
वेगळीच कृती आहे. करून
वेगळीच कृती आहे. करून पाहण्यात येईल
स्वप्ना, किती दिवसांनी दिसलीस इथे! अलभ्य लाभ!!
ही आंध्रातली फार जुनी रेसीपी
ही आंध्रातली फार जुनी रेसीपी आहे. मी करते काही वेळा. मास्टर रेसीपी मध्ये रोहिणी हत्तंगडी ह्यांनी तोंडलीची फुटी अश्या नावाची रेसीपी दिली आहे ती पण छान आहे.
मला आता सेलि ब्रिटी शेफ कल्चरचाच वैताग आला आहे. ते चांगल्या रेसीपी उगीच मॉडिफाय करून फेकतात. उदा रणवीर ब्रार च्या रामेन देशी पास्ता वगैरे रेसीपी.
स्वप्ना तुम ची चित्रपट परीक्षणे परत चालू करा की.
स्वप्ना, आज बर्याच
स्वप्ना, तुम्ही आज बर्याच वर्षांनंंतर दिसलात. वेलकम बॅक !
तोंडली च्या काचर्या मला खूप
तोंडली च्या काचर्या मला खूप आवडतात. आता अशाप्रकारे करून बघेन.
छान आहे रेसिपी.
छान आहे रेसिपी.
तुम ची चित्रपट परीक्षणे परत चालू करा की.>>>>>>>मी तुमचा लेख वाचून आनंद सिनेमा पाहिला होता.
परतलेली तोंडली एकूणच मला
परतलेली तोंडली एकूणच मला आवडतात. ही करून बघेन.
पण तोंडली शिजायला फार वेळ लागतो. तोवर लसूण करपत नाही का?
हो ना.. स्वप्ना_राज खूप
हो ना.. स्वप्ना_राज खूप दिवसांनी आल्या.. राखेचा ३ सुरु झालं होतं पण आता शुटिंग बंद झालं. बघत होता की नाही..??
>>मूळ संजीव कपूर महाराजांनी
>>मूळ संजीव कपूर महाराजांनी याला तेंडली म्हटलंय का ते माहिती नाही. धागाकर्त्यांनीही तोंडली लिहिलं आहे.
मूळ संजीव कपूर महाराजांनी याला तेंडलीच म्हटलंय बरं का. म्हणून तसं नाव दिलं रेसिपीला. एव्हढ्याश्या गोष्टीसाठी बिचार्या अॅडमिनचा धावा कशाला केला माहित नाही. मी दुरुस्ती करू शकले असते. सॉरी अॅडमिन. तुम्हाला उगाच त्रास झाला. असो. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
rmd, अमा, अजय, mrunali.samad - धन्यवाद. पुन्हा पहायचे आहेत पुन्हा चित्रपट. पण वेळ मिळत नाहिये. आणि तसंही इथे आता काही लिहायला नको वाटतं.
DJ.......राखेचा २ ची अवस्था पाहून ३ पहायचं नाही असं ठरवलं. तसंही अण्णा आणि शेवंताचा कंटाळा आला होता.
>>पण तोंडली शिजायला फार वेळ लागतो. Sad तोवर लसूण करपत नाही का?
ओह असं आहे का? मी तोंडल्याची भाजी वगैरे केली नाही कधी. ही भाजी २-३ वेळा केली तेव्हा लसूण करपली नाही. आणि खरं सांगायचं तर एकेका तोंडल्यासोबत तळलेली लसणाची पाकळी आणि मिरचीचा तुकडा वेचून घेऊन खायला मजा येते.
तोंडल्याची तळासणी म्हणून
तोंडल्याची तळासणी म्हणून कोंकणी रेसिपी आहे ही.
https://youtu.be/GnlfTBx0KLE
भाषा पूर्ण समजली नाही तरीही क्रुती बघताना कळते.
आमची एक मैत्रीण सैनिक पुरीत
आमची एक मैत्रीण सैनिक पुरीत घर बांधत होती तर तिथेच दीड खोलीचे आउट हाउस भाड्याने घेउन राहात होती. तिथे अगदीच कमी साधने होती तेव्हा तिने अशी भाजी केली आहे बरोबर साईचे दही घातलेला दहीभात. एकदम जबरी लागते.
प्लस अर्धी वाटी तेलात मिरच्यांचे तुकडे तळून घ्यायचे व त्यात उतरवून हळद हिंग मोहरी हवी असल्यास व एक लिंबाचा रस घालायचा एकदम जबरी आंबट चिंबट तिखट लोणचे रेडी.
मी करून पाह्यली होती त्यानंतर
मी करून पाह्यली होती त्यानंतर कळलं की जे इतकं टेम्प्टिंग वाटतंय व करायला सोपं करायला जाऊ नये. त्यापेक्षा कुरकुरीत काचर्या भन्नाट लागतात.
अखेर पसंद अपनी अपनी
बाकी तुझ्या हातखंडा पाककृती (लेखाची) वाट बघतोय...
आंध्रा मध्ये पब्लिक गार्डन
आंध्रा मध्ये पब्लिक गार्डन पक्षी बाग्याम ( बाग ए आम ) मध्ये दरवर्षी एक द्वाकरा मेला भरतो. स्मॉल सेविन्ग ग्रूप्स चा मेळा असतो. फार मजा असाय ची. इथल्या सरस चा अवतार. पण फार साधा व खेडवळ. त्यात त्या महिला जेवण देत. त्यात ह्या तळलेल्या काचर्या, तळीव शेंगदाणे अशी भाजी, भात सांबार रसम पातळ दही. वांगे भाजी.
रेसीपी वाचून पहिले तीच आठवण आलेली. प्रदर्शन भटकून पाय दमले की स्वर्गीय वाटायचे ते जेवण.
मी हि अशीच करते तेंडल्याची
मी हि अशीच करते तेंडल्याची भाजी .. आमच्याकडे ह्याला तेंडल्या तलासनी बोलतात..
मी तेंडली चेचून कुकर ला २
मी तेंडली चेचून कुकर ला २ शिट्ट्या काढते.. आणि मग फोडणीत लसूण भाजून त्यावर तोंडली टाकते.. १० मिनिटात होते.. तेल पण कमी लागते.. न शिजवता केली तर तेल आणि वेळ पण भरपूर लागतो.. चवीत फरक पडतो पण वेळ पण पाहिजे ना तेवढा..
>>तिने अशी भाजी केली आहे
>>तिने अशी भाजी केली आहे बरोबर साईचे दही घातलेला दहीभात. एकदम जबरी लागते.
फर्मास बेत!
>>बाकी तुझ्या हातखंडा पाककृती (लेखाची) वाट बघतोय...
मी आपली विचार करतेय की माझी अशी कुठली हातखंडा रेसिपी आहे मग कळलं की तुम्ही इतर लिखाणाबद्दल बोलताय
>>त्यात ह्या तळलेल्या काचर्या, तळीव शेंगदाणे अशी भाजी, भात सांबार रसम पातळ दही. वांगे भाजी.
मुंहमे पानी आ गया. आता तर हॉटेल, महालक्ष्मी सरस वगैरे गोष्टी मागच्या जन्मात केल्या असं वाटू लागलं आहे
प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे आभार
आता ही भाजी समारंभातल्या
आता ही भाजी समारंभातल्या बुफेत येणार. भेंड्या कुणी खात नव्हतं पण अमचूरवाली पंजाबीभाजी बुफेच्या तिसऱ्या पातेल्यात /बाजूच्या तव्यावर असते.