Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Madhura Kulkarni >>
Madhura Kulkarni >>
मला fantacy आवडते. तुम्ही लिहिलेल्या सिरीज कुठे आहेत?
अलिशिआची मुलं गोड आहेत <<<<
अलिशिआची मुलं गोड आहेत <<<< आणि फ़ारच नम्र. मला अॅलिशिया आणि तिच्या मुलांचं रिलेशन फ़ार आवडतं
ह्याच सिरीजचा पुढचा भाग good fight पण आहे प्राईमवर. फ़क्त त्यात ह्यातली 2/3 पात्रे आहेत.
इथे कोण fantacy genre च्या
इथे कोण fantacy genre च्या web series पाहणारे आहेत का नाही माहित नाही...
>>> मी पण आहे
फा , रेड जॉन सापडला का?>>
फा , रेड जॉन सापडला का?>> स्वस्ति,नाही अजून
दुसर्या सीझन च्या मध्यावर पॉज घेतला आहे. इतर कॅच अप करून पुन्हा बघणार.
अलिशिआची मुलं गोड आहेत <<<<
अलिशिआची मुलं गोड आहेत <<<< आणि फ़ारच नम्र. मला अॅलिशिया आणि तिच्या मुलांचं रिलेशन फ़ार आवडतं >>>> +१०००
मुलगा त्या गर्ल्फ्रेन्डच्या नादी लागलाय , पण मुळात दोन्ही मुलं गुणी आहेत.
काही स्टोरीज पण छान आहेत . मेडिकल इन्श्युरन्स नंतर ती एक ज्युरीज वाली स्टोरी .
रेड जॉन ला अजून 3 सिझन बाकी
रेड जॉन ला अजून 3 सिझन बाकी आहेत
चवीने बघा
मी परत बघते आहे पहिले 3.
Alias Grace
Alias Grace
Netflix वर लिमिटेड सीरीज आहे
Based on a novel of the same title
ब्रेकिन्ग बैड बघतोय परत बायको
ब्रेकिन्ग बैड बघतोय परत बायको बरोबर. नन्तर बेटर कौल सौल आणि अल कमिनो सिनेमा बघेन.
The Queen's Gambit
The Queen's Gambit नेटफिल्क्सची चेस वर आधारित असलेली एक दर्जेदार सिरीज...बेथ हार्मण ही वयाच्या सातव्या वर्षी एका अपघातात आई गेल्याने अनाथ होते मग अर्थातच तिची रवानगी एका अनाथालयात केली जाते पण तिच मन काही तिथे रमत नसते. एकदा अनथालयाच्या बेस्मेंट मध्ये गेली असता तिला तेथे इमारतची देखभाल करणारा शायबल हा एकटाच चेस खेळताना दिसतो व ती आपसुकच चेस कडे आकर्षित होते व मला पण हा गेम शिकवा म्हणून त्याच्याकडे विनंती करते पण हा गेम तुझ्या कुवतीचा नाही म्हणून तो पहिले तिला फटकारतो पण ती जिद्द सोडत नाही व ज्या ज्या वेळी ती बेस्टमेंट मध्ये येते त्या त्या वेळी ती त्याचा गेम बघून स्वतःच शिकते व एके दिवशी त्यालाच मात देते तीचा हा खेळ बघून तो तिला चेस बद्दलची पुस्तके इतर अधिक माहिती देतो व पुढे खेळण्या करीता प्रोत्साहीत करतो आणि मग येथून सुरू होते पुरुषांची मक्तेदारी असलेल्या खेळात एका मुलीची विजयी घोडदौड...चेस मध्ये पाढर्या सोगंट्या ने गेम ओपन करणार्या मुव्हला Queen's Gambit म्हणतात सिरीज कुठेही चेस बद्दल जास्त पाल्हाळ लावत नाही तर नेमकंच दाखवते त्यामुळे ज्यांना ह्या गेम बद्दल माहिती नाही ते देखिल बघतांना बोर होत नाही व उत्कंठा लागते की पुढे काय होईल याची ..बॅकग्राउंड म्युजिक , कलाकारांचा अभिनय व वेगवान कथानक बघणार्याला खिळवून ठेवतात तर नक्की बघा एक अनाथ मुलगी चेस ह्या खेळाची Queen कशी बनते...
Maheshkumar, thanks.
Maheshkumar, thanks.
महेशकुमार , मस्त परिचय .
महेशकुमार , मस्त परिचय . बघायच्या यादीत आहे ही मालिका
इथे कोण ब्लॅकलिस्ट पाहत का?
Aspirants वेबसिरीज बघितली .
Aspirants वेबसिरीज बघितली . रंगीला यांनी परिचय करून दिल्याबद्दल आभार . छान वाटली . विशेष करून SK याचे पात्र आवडले . असा सगळ्यांना सांभाळून घेणारा एक तरी मित्र हवाच .
>>धन्यवाद अश्विनी11.
>>धन्यवाद अश्विनी11.
My octopus teacher डॉक्युमेंटरी netflix वर आहे. Octopus एका वेगळ्या अर्थाने समजतो. माणूस आणि निसर्ग यांचं नातं सुंदर चित्रित केलं आहे .
हे नेहमीच्या पठडीतील नाही आहे. त्यामुळे नक्की पहा. एखादा तास सार्थकी लागेल .
धन्यवाद जाई व फिल्मी....
धन्यवाद जाई व फिल्मी....
kuni prime vqr chi
kuni prime vqr chi pushpavalli series pahili aahe ka? atishay jabardast vishay aani nikhal karamnuk aahe ajibat nudity shivya hinsa mahi pan tari atyant khilaun thevnaari aahe. amazing awesome
इथे कोण fantacy genre च्या
इथे कोण fantacy genre च्या web series पाहणारे आहेत का नाही माहित नाही...>>> मी पण आहे. Vampire diaries, the originals ची पारायणं करून झालीत. या दोन सिरिज इतक्या आवडल्या की त्यापुढे अजून कुठची आवडेना झालेय. Legacies पहिला सिझन बरा वाटला. पुढचे नाही बघवत.
WandaVision बघितली. फार नाही आवडली.
असपीरंट्स मध्ये सगळ्यात बेस्ट
असपीरंट्स मध्ये सगळ्यात बेस्ट संदीप भैया चे character आहे....
The last hour काल बघितले सगळे
The last hour काल बघितले सगळे आठ एपिसोड्स.
घाणेरडे सीन्स आणि वाईट डायलॉग्ज नसल्याने पाहु शकले. विषय पण चांगला आहे.
The last hour काल बघितले सगळे
The last hour काल बघितले सगळे आठ एपिसोड्स.
घाणेरडे सीन्स आणि वाईट डायलॉग्ज नसल्याने पाहु शकले. विषय पण चांगला आहे.>>>हो मी पण चालू केला आहे पाहायला, पहिल्यांदीच ईशान्य भारत मधले कलाकार पहाते आहे some thing new faces
मी सध्या '३० वेडस् २१' बघतेय.
मी सध्या '३० वेडस् २१' बघतेय. ३० वर्षीय तरुण घरच्यांच्या दबावामुऴे २१ वर्षीय मुलीशी लग्न करतो. पण मेंटली त्याला वयातला फरक झेपत नाहीये.
तेलुगु आहे, सबटायटल्स आहेत. मी युट्युबवर ४च एपिसोड पाहिलेत. इतर कुठे आहे का माहित नाही.
द लास्ट अवर उत्कंठावर्धक आहे.
द लास्ट अवर उत्कंठावर्धक आहे. खूप भारी वगैरे नाही. टाईमपास होतो छान.
पॅरानॉर्मल + रहस्यमय गोष्टी हा जॉनर आहे.
द लास्ट अवर कशावर आहे ?
द लास्ट अवर कशावर आहे ?
अमेझॉन प्राईमवर आहे.
अमेझॉन प्राईमवर आहे.
प्राइमवर.
प्राइमवर.
मला ईशान्येकडील कलाकार व पर्वतरांगा फार आवडल्या. संजय कपूर , देव (कलाकार), शहाना गोस्वामी , सर्वांची कामं आवडली. त्यात बिग आइज बेंगॉली ब्यूटी रायमा सेन 'लाल भडक , माल कडक' होऊन येरझाऱ्या करत रहाते. शेवट काही कळला नाही, यमा नाडू मेला का नाही. बघू पुढे, शेवटचे दोन एपिसोड संथ झाली होती म्हणून मी खिचडी टाकायला उठले आणि यमा नाडूचे काय झाले कळलं नाही. जे काही झाले पण आवडली , सुखद बदल वाटला.
अनिल कपूरचा भाऊ आहे यात. संजय
..
फ्लिपकार्ट व्हिडीओ वर कौन
फ्लिपकार्ट व्हिडीओ वर कौन पहायला सुरूवात केली आहे. जर फ्लिपकार्ट अॅप वर पाहिली तर गेम पण खेळता येतो. खूनी कोण हे गेस करायचं. बक्षीस मिळण्याची शक्यता आहे.
शेवटी तो त्याच्या शेवटच्या
शेवटी तो त्याच्या शेवटच्या तासात जातो. त्याच्याकडे एक विशेष शक्ती असते तिच्याबद्दल त्याला शेवटी समजतं. भूतकाळातली एक घटना त्याला बदलता येत असते. यमानाडू त्यासाठीच देवच्या मागे लागलेला असतो. ती शक्ती त्याला मिळाली तर तो अशी एखादी घटना बदलणार असतो कि पुढचे सगळेच बदलेल.
देव त्याच्या शेवटच्या तासात भूतकाळात मागे जाऊन ती त्याला पहिल्यांदा भेटली तिथे जाऊन ती शक्ती तिला देऊन टाकतो.
ते लक्षात आले पण यमा नाडू
ते लक्षात आले पण यमा नाडू मेला असं समजायचं का ?
ट्रू लव्ज किसने शक्तीचे हस्तांतरण झाले का ?
यमा नाडू मेला तर दुसरा सीझन
यमा नाडू मेला तर दुसरा सीझन होणार नाही.
संजय कपूर सुखद वाटला यात.
द लास्ट अवर बघितली मी पण.
द लास्ट अवर बघितली मी पण. छान आहे वेगळी कन्सेप्ट. नॉर्थइस्टचे कलाकार पण छान वाटले बघायला. नो ओव्हरअॅक्टींग. संजय कपूरचं इतकं काम बघायची कधी वेळ आली नव्हती. छान केलंय त्याने पण. त्याच्या मुलीचं काम करणारीने पण छान केलीये अॅक्टींग.
Pages