लेखाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो ... म्युच्युअल फंडावर लिहिताना मला १२ वर्षांचा अनुभव होता. फॅक्टर इन्व्हेस्टिंग ही माझ्यासाठी सुरुवात आहे. त्यामुळे हे "संकल्पना" (Concept) य स्वरूपात आहे. माबो वरच्या तज्ञ आणि अनुभवी लोकांचे प्रतिसाद मला या स्ट्रॅटेजी मध्ये मदत करतील म्हणूनच हा लेखनप्रपंच
____________________________________________________________________________________________________________________________
सुरुवात ......
अशाच एका आळसावलेल्या शनिवारी (सध्या लॉकडाऊन मुळे घरातच विश्रांती घ्यावी लागते), म्युच्यअल फंड्स चा रिव्ह्यू करीत असताना एक गोष्ट लक्षात आली कि गेल्या वर्षभरात फोकस फंड्स नी उत्तम रिटर्न्स दिले आहेत. कुतूहल चाळवले कि कुठल्या ह्या पंचवीस कंपन्या ज्यामध्ये हे फंड्स पैसे गुंतवतात ? (फोकस २५ या नावामुळे पंचवीस कंपन्या )
खालच्या तक्त्यामध्ये टॉप ३ फोकस फंड्स आणि त्त्यांनी पॆसा गुंतवलेल्या कंपन्या (टॉप १०)
या तक्त्यात काही कंपन्या किमान दोन फंडात आहेत . HDFC Ltd. तिन्ही फंडात आहे. तसेच या कंपन्या प्रामुख्याने बँक / IT आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातल्या आहेत .
मग विचार आला ..आपण या फंडात पैसे गुंतवतो ... मग फंड मॅनेजर या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात .. मग आपणच या पंचवीस कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले तर ?
_________________________________________________________________________________________________________________
कल्पना तर एकदम भारी होती .. पण मग शंकेची पाल चुकचुकली ... हे इतकं सोपं असेल तर यापूर्वी कोणी कधी केलं का नाही ? आपले काही चुकतंय का ?
मग गुगल बाबाला शरण गेलो. बरीच शोधाशोध केल्यावर कळलं की याला Factor Investing Strategy म्हणतात.
गुंतवणुकीच्या ३ प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात
१. Passive Strategy : मुख्यतः बाजाराच्या कार्यक्षमतेवर भरवसा ठेवून गुंतवणूक करायची. इंडेक्स फंडस् तसेच ETF या प्रकारात येतात. या मध्ये अर्थातच गुंतवणुकीचा खर्च कमी असतो. कारण विश्लेषण , पोर्टफोलिओ बदलणे वगैरे गोष्टी कमी असतात / जवळजवळ नसतातच
२. Active Strategy : बरेचसे फंड्स आणि सामान्य गुंतवणूकदार या प्रकारात येतात. विश्लेषण व इतर माध्यमातून मिळणाऱ्या माहिती नुसार पोर्टफोलिओची पुनर्रचना (restructure) करणे हा याचा मूळ गाभा आहे. ही पुनर्रचना daily / monthly / quarterly / yearly / ad-hoc कशीही असू शकते
याचा मुख्य उद्देश हा निर्देशांकावर मात करणे (Outperform Market Index ) हाच आहे.
३. Factor Strategy : वरील दोन्ही स्ट्रॅटेजीज चा माध्यम मार्ग म्हणजे फॅक्टर स्ट्रॅटेजी . यात मार्केट वर परिणाम करणारे इतर फॅक्टर जसे (Govt. Policies , technology वगैरे यांचाही विचार करायचा आणि फक्त Market analysis वर विसंबून वारंवार पोर्टफोलिओची पुनर्रचना करायची नाही
जसे कि :
_____________________________________________________________________________________________________________
माझी स्ट्रॅटेजी फॅक्टर इन्वेस्टींगशी साम्य दाखवणारी असली तरी त्यात थाडेसे बदल आहेत
आता मी जी गुंतवणूक करायची ठरवली आहे (या महिन्यात गुंतवणूक करण्याचा मानस आहे ) त्याची रूपरेखा खालील प्रमाणे
१. एकूण २५ कंपन्या निवडणार
२. प्रत्येक कंपनीत सामान गुंतवणूक करणार. सध्या दहा लाख गुंतवायचे ठरवले आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनीत ४० हजार. (प्रती शेअर किंमतीनुसार ४० हजारात जेव्हडे शेअर्स येतील तेव्हडे) एखादी कंपनी आवडते म्हणून जास्त गुंतवणूक असे नाही
३. २५ पैकी २० लार्ज कॅप आणि ५ मिड कॅप कंपन्या निवडणार
३. दर तीन महिन्यांनी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार. अर्थात (लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स चा लाभ घेण्यासाठी आणि शॉर्ट टर्म गेन्स टाळण्यासाठी पुनर्रचना एका वर्षानंतरच करणार
४. या एक वर्षाच्या कालावधीत जर रक्कम गुंतवलेल्या कंपनी बद्दल काही विशेष बातमी तरच त्याचे शेअर्स विकून त्याच किमतीचे दुसऱ्या कंपनीचे शेअर्स घेणार (Event based changes only )
_____________________________________________________________________________________________________________
आता मुख्य मुद्दा : २५ कंपन्या कुठल्या ?
तर टॉप परफॉर्मिंग म्युच्युअल फंडांना आधारभूत मानून कंपन्या शॉर्टलिस्ट करणार (याचा अर्थ : या फंडांनी चांगली कामगिरी केली. अर्थात या फंडांच्या मॅनेजर ने केलेले विश्लेषण बरोबर आहे. त्यामुळे त्यांना पैकी च्या पैकी मार्क देऊन त्यांचे विश्लेषण आपले म्हणणार. अर्थात शोरलिस्ट केलेल्या प्रत्येक कंपनीचा डिटेल अभ्यास करूनच फायनल २५ ठरवणार आहे.
फक्त फोकस फंड्स वर “फोकस” न ठेवता लार्ज कॅप आणि मिड कॅप पण विचारात घेणार आहे,
खालचा तक्ता बघा
३ फोकस्ड, २ लार्ज कॅप आणि २ opportunity फंड्स यांचा एकत्रित विचार केला (टॉप १० कंपनीज)
इंडस्ट्री सेक्टर प्रमाणे कलर कोडींग केले आहे
यात बँकिंग / फायनान्स आणि IT / Software कंपन्यांचे प्राबल्य आढळते. तसेच अशा काही कंपन्या आहेत ज्यांचा बहुतेक सर्वच फंडात समावेश होतो
उदाहरणार्थ
HDFC
Infosys
TCS
Axis back
ICIC
Bajaj Finance
L&T
__________________________________________________________________________________________________________
समारोप
वरील माहितीच्या आधारे सध्या २५ कंपन्या शॉर्टलिस्ट करायचे काम चालू आहे.
एकंदरीत हा कन्सेप्ट आणि विचारधारा याविषयी तुमची मते जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तसेच काही चुकत असेल तर जरूर सांगा
छान माहिती.
छान माहिती.
माझ्या कंपन्या शाॅर्टलिस्ट
माझ्या कंपन्या शाॅर्टलिस्ट करताना मी ब्ल्युचिप फंडस् चा डेटा वापरला होता.
अर्थात शाॅर्टलिस्टेड कंपन्यांची फायनॅन्शिअल स्टेटमेंट्स आणि रेशिओज ही तपासले होते.