Submitted by MSL on 20 May, 2021 - 08:26
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2021/05/20/IMG_20210515_194114-min.jpg)
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
ज्वारीचे पीठ एक वाटी
तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
एक मोठा कांदा
दोन हिरव्या मिरच्या
चवीपुरते मीठ
हिंग ,
हळद,
तेल,
क्रमवार पाककृती:
1: कांदा बारीक चिरून घ्यावा.. मिरचीचे बारीक तुकडे करावे
2: ज्वारीचे पीठ तांदुळाचे पीठ कांदा मिरची हळद हिंग हे सर्व एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालत जावे..
3: हे मिश्रण जास्ती जाड असू नये.. तांदळाचे घावणे करण्यासाठी जेवढी पातळ करतो त्याप्रमाणे करावे..
4: मिश्रणात 1 चमचाभर तेल घालावे..
5: दहा मिनिटे झाकून ठेवावे..
6: फ्राय पॅन गरम करून घ्यावा आणि त्यावर पळीने पातळ डोसे घालावे.. दोन्ही बाजूंनी शेकवून घ्यावे..
7: चटणी सॉस किंवा दही साखर या बरोबर गरम सर्व्ह करावे..
8: वर दिलेल्या साहित्यात पाच ते सहा डोसे होतात..
वाढणी/प्रमाण:
4-5
अधिक टिपा:
ज्वारी चा सोपा पदार्थ...लहान n मोठ्यांना खायला नक्की आवडेल...
माहितीचा स्रोत:
मीच
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
भारी आहे हे... झटपट आणि
भारी आहे हे... झटपट आणि स्वादिष्ट...!!
छान, सोपी रेसिपी..!
छान, सोपी रेसिपी..!
सोपी आहे की रेसिपी..फोटो छान
सोपी आहे की रेसिपी..फोटो छान आलाय
सोपी आहे की रेसिपी..फोटो छान
सोपी आहे की रेसिपी..फोटो छान आलाय
सोपी आहे की रेसिपी..फोटो छान
सोपी आहे की रेसिपी..फोटो छान आलाय
वाचून लगेच करुन पाहिले. मस्त
वाचून लगेच करुन पाहिले. मस्त रेसिपी. सोपी आणि सुटसुटीत. .
मस्त आणि सोप्पी.
मस्त आणि सोप्पी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चला शनिवारचे होमवर्कला नक्की करणार.
भारी दिसतंय, सोप्पंही
भारी दिसतंय, सोप्पंही
मस्तच ! ज्वारी चे "आयते" डोसे
मस्तच ! ! ज्वारी चे "आयते" डोसे , मग कोणाला आवडणार नाही ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
छान रेसिपी!
छान रेसिपी!
Thanks for the recipe.
Thanks for the recipe.
उद्या करून बघते
छान पाककृती
छान पाककृती
छान सोपी पाकृ! दोन्ही फोटोही
छान सोपी पाकृ! दोन्ही फोटोही मस्त.
प्रतिसाद बद्दल धन्यवाद...
प्रतिसाद बद्दल धन्यवाद...
ज्वारी त्यामुळे.खाल्ली जाईल...
भाकरी करतो आपण ( मला जमत नाही...) ..
अश्या मझ्यासरख्या करता करायला जमेल...आणि आवडेल.अशी रेसिपी...
सोपी.. चविष्ट...झटपट होणारी...n एकदम पौष्टिक...
मी हि असेच करते ज्वारीचे डोसे
मी हि असेच करते ज्वारीचे डोसे.. पण फक्त ज्वारीच्या पीठाचे.. कधी ज्वारीची भाकरी खायचा कंटाळा केला नवऱ्याने कि असे डोसे करून देते.. एकूण काय कशीतरी ज्वारी पोटात गेली पाहिजे नवऱ्याच्या.. ( मधुमेहामुळे तांदूळ फारसे वापरत नाही..)
ज्वारीचं पीठ नेहमी विकत आणतो,
ज्वारीचं पीठ नेहमी विकत आणतो, छान असतं. पण यावेळी स्वयंपाकाच्या मावशींनी पीठ खुप जाडसर आहे त्यामुळे भाकरी होत नाही अशी तक्रार केली. घरात भाजणी पीठ असल्याने थालीपीठ पण करणार नव्हतो, अशा वेळेस ही रेसिपी पहिल्या पेजवर दिसणं म्हणजे अगदीच लकी. आज ते जाडसर पीठ वापरून लंचला डोसे केले. उच्च टेस्टी झाले होते, मी यात थोडी fine chopped मेथी घालायला सांगितली होती आणि थोडं ताकही. मावशी कांदा आणि मेथी कॉम्बिनेशनच्या फेवरमधे नव्हत्या, पण पदार्थ मात्र खुप टेस्टी झाला. : slurp:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
MSL धन्यवाद
आज केले मी हे डोसे. पण झाली
आज केले मी हे डोसे. पण झाली धिरडी. काय झाले असेल. कमी पातळ झाले का?.
चवीला मस्त. सगळे फस्त. तज्ञ मंडळी आयते मिळाल्यामुळे खुष.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही काल करून बघितले. पण
आम्ही काल करून बघितले. पण डोसे काही झाले नाहीत. मऊसर धिरडी झाली. तीही थोडी जाड घालावी लागली. नाहीतर तुटत होती. तेल एक च च घातलं पिठात.. नॉन स्टिक तव्याला तेल लावलं नाही.
एकंदरीत काही तितकंसं जमलं नाही प्रकरण.
धिरडी झाली म्हंजे पीठ घट्ट
धिरडी झाली म्हंजे पीठ घट्ट असेल... पीठ अजून पातळ करावे...
तसेच घालताना pan पासुन थोडे वर धरून गोलाकार ओतावे..म्हंजे क्रिस्पी न जाळी पण छान पडते..
आम्ही काल करून बघितले. पण
आम्ही काल करून बघितले. पण डोसे काही झाले नाहीत. मऊसर धिरडी झाली. तीही थोडी जाड घालावी लागली. नाहीतर तुटत होती....
@@...पीठ दाटसर झाले.का...
मस्त पाकृ.
मस्त पाकृ.
आम्ही याला ज्वारीच्या पिठाची आंबोळी म्हणतो. तांदळाचे पीठ अगदी थोडे घालतो. फोटोतले आयते अगदी क्रिस्पी आणि पातळ दिसतायत पण हे इतके पातळ केले तर एकालाच दहा लागतील. डाएट वाल्याना ठीक आहे.
आम्ही ह्यात तांदूळ पिठ नाही
आम्ही ह्यात तांदूळ पिठ नाही घालत. तशीच धिरडी करतो. मस्त लागतात. बराच वेळ शेकावी लागतात नाही तर तुटू शकतात.