Yoga is the journey of the self, through the self to the self …The Bhagwat Geeta.
त्या दिवशी माझी योगशिक्षिका मला म्हणाली की, “अश्विनी, तुला समवृत्ती प्राणायाम जास्त आवडतो ना, मग तू त्याचा जास्त सराव कर. त्यातूनच तुला तू समजत जाशील.” मला काहीच समजेना. मला मी समजत जाईन म्हणजे? प्राणायाम करून स्वतःची ओळख पटते? योगासनांमुळे शरीराला आणि प्राणायामामुळे मनाला होणारे फायदे मला माहीत होते. पण त्यातून तुम्हीच तुम्हाला उलगडत जाता ही कल्पना माझ्याकरता नवीन होती. हा नवा अर्थ समजून घेण्यास मी अतिशय उत्सुक होते. मी विचारात पडले की हे सगळे मला आधी कसे काय कोठून समजले नाही?
योगासने म्हणजे फक्त आसने करणे नव्हे. पण ती करताना तुम्ही स्वतःबद्दल काय शिकता ते महत्वाचे असते. माझी योगाची शिक्षिका आम्हाला प्रत्येक आसनानंतर, प्रत्येक प्राणायामानंतर शरीरातले बदल ओळखायला शिकवायची.त्यामुळे योगासने करताना जिथे जिथे आपले शरीर ताठर असते, विरोध दाखवत असते, जिथे ऊर्जा अडकून पडलेली असते, त्या जागा आपल्याला समजतात. योगासनांमुळे शरीराच्या बाह्य अवयवांमधील आणि अंतर्गत अवयवामधील सहजता, ताठरता, तिथले आरोग्य तिथली ऊर्जा या सगळ्याची तुम्हाला जाणीव होते.
ह्या सगळ्या मागचे कारण असे की भावनांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. एखादी भावना दीर्घकाळ अनुभवली गेली तर शरीर ती भावना साठवून ठेवत असते. वेगवेगळ्या भावना शरीराच्या वेगवेगळ्या भागात साठवल्या गेलेल्या असतात. जेव्हा तुम्हाला एखाद्या भागात ताण जाणवतो तेव्हा तिथे ऊर्जा अडकलेली असते असे समजावे. आसने करताना अश्या ठिकाणची दबली गेलेली भावना आपण ओळखू शकतो, आपला स्वभाव,आपले मानसिक आजार ओळखू शकतो. प्रत्येक आसनानंतर शरीर रीलॅक्स करून अडकलेल्या ऊर्जा काढून टाकता येतात.इतकेच नाही तर योगाच्या सरावाने तुमचे शरीर पूर्ववत निरोगी करता येते.
हळूहळू मला हे ही समजले की योग साssवकाश, सहजतेने, स्वतःवर प्रेम करत आणि जाणीवा, विचार न्याहाळत करायचा असतो. माझी शिक्षिका तर म्हणायची कि तासाला 10 आसने केलीत तर छान…पण 4 आसने केलीत तर उत्तम. जी आसने, जे प्राणायामाचे प्रकार तुम्हाला जास्त आवडतात आणि सहज जमतात ते करून स्वतःचा आनंद वाढवायचा असतो. मग तुमच्यात बदल होत जातात, तुमचा आत्मविश्वास वाढतो, भीती, काळजी, नैराश्य दूर पळते. ताठर शरीर लवचिक बनते. योगामुळे तुम्ही तुमची ताकद वाढवता आणि तुमचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास बसायला लागतो. तुम्ही अधिकाधिक सामर्थ्यवान, शांत होत जाता. योगासने करता करता तुम्ही मनाने स्थिर होत जाता. योग तुम्हाला तुमच्या आतील अवयवांना देखील व्यायाम घडवत शरीरातले बदल टिपण्यास शिकवते. योगाच्या माध्यमातून स्वतःच्या अंतरंगात शिरून स्वतःचा शोध घेता येतो. अंतरंगातल्या या प्रवासात तुमची सजगता वाढते, तुमच्या शरीरात लपलेला तुमचा चांगला आणि वाईट स्वभाव तुमच्या लक्षात येतो. योगामुळे आपले स्वतःशी नाते जुळते ते असे.
तिने हेही शिकवले की योगासने करताना आपण शरीराबरोबरच आपल्या मनाकडे, विचारांकडे लक्ष द्यायचे असते, कोणतेही आसन करताना निर्माण होणाऱ्या भावना जाणवून घ्यायच्या असतात आणि कोणतेही निकष न लावता त्या भावनांचा,पर्यायाने आपला आदर करायचा असतो. असा आदर करण्याने तुम्ही स्वतःला जसे आहात तसे स्वीकार करत जाता. असे केल्याने तुमचे मन मोकळे होते. हळूहळू तुम्ही तुमच्या भावना लपवून न ठेवता जगू लागता. आणि मग परिणामी शरीरही हलके होते, संवेदनशील होते.
तुमचा श्वास तुमच्या मनाची अवस्था दाखवत असते. श्वास स्थिर, संथ, लयबद्ध असणे हे शरीर आणि मन निरोगी असण्याचे लक्षण आहे. प्राणायाम करताना आणि आसने करताना तुम्ही श्वासावर नियंत्रण ठेवायला शिकता. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे, मन निरोगी ठेवणे शक्य होते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे योगामुळे तुम्ही वर्तमानात जगायला शिकता. वर्तमानात शाश्वत आनंद लपलेला असतो. परिणामी तुम्ही आनंदी होता आणि आसनांमधील स्तब्ध क्षणात तुम्ही खरे कोण आहात ते तुम्हाला समजते. योग तुमच्यात असलेल्या चैतन्याची ओळख करून देतो.
Yoga does not change the way we see things, it transforms the person who sees. – B.K.S. IYENGAR.
मला या नव्या साधनाचा वापर करून घेऊन स्वतःला नव्याने जाणून घ्यायचय.
फार छान लेख आहे, आवडला खूप
फार छान लेख आहे, आवडला खूप विचारप्रवर्तक!
छान लेख .
छान लेख .
अगदी अगदी. आवडला.
अगदी अगदी. आवडला.
छान लेख!म आवडला
छान लेख!म आवडला
खुप छान विचार!
खुप छान विचार!
मांडलतही खुप छान!
धन्यवाद
छान लेख.
छान लेख.
सुंदर लिहिलायं लेख... आवडला..
सुंदर लिहिलायं लेख... आवडला..!!
छान दृष्टिकोन मांडला आहे!
छान दृष्टिकोन मांडला आहे!
छान लेख .
छान लेख .
खूप छान लिहिले आहेस अश्विनी.
खूप छान लिहिले आहेस अश्विनी. . पुढे पण यावर लिहीत रहा. .
वेगळा आणि आत्तापर्यंत मला
वेगळा आणि आत्तापर्यंत मला माहित नसलेला विचार छान मांडलाय. मानेचे व्यायाम करताना केवळ त्या स्नायूंना व्यायाम होत नाही तर स्ट्रेस सुद्धा रिलीज होतो. असा विचार मनात आणून ते व्यायाम केल्यास नक्कीच जास्त फायदा होत असेल.
Youtube वर तुम्हांला माहिती असलेले योगासनाचे चांगले व्हिडिओज असल्यास कृपया इकडे शेअर करा
वेगळा दृष्टिकोन! लेख आवडला.
वेगळा दृष्टिकोन! लेख आवडला. धन्यवाद. सरनौबत +1
मला एक शंका आहे.इथे कुणी
युट्युबवर विडिओ बघून योगासने करावीत का?
खूप छान ले ख.
खूप छान ले ख.
हल्ली फार प्रकर्षाने वाटते की
आपण सगळेच जण वेळ मिळाला की तो भ रून क सा टाकायचा (म्हणजे काय वाचायचे, काय बिंज वॉच करायचे) इकडे घालवतो.
आपल्याला आत डोकावायचे असते, स्वतःशी एकरू प व्हायचे असते, हे ही लक्षात नाहिये.
फार मस्त वाटलं हा लेख वाचू न.
हा पुन्हा पुन्हा वाचणार.
तुम्ही जे करायला हवं लिहिलं, ते कसं करायचं ह्यावर पण लिहाल का?
युट्युबवर विडिओ बघून योगासने
युट्युबवर विडिओ बघून योगासने करावीत का? >> नाही. उत्तम शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करा. योग केवळ व्यायाम प्रकार नाही, ती एक जीवनशैली आहे. उत्तम शिक्षक त्यातील मर्म तुमच्यपर्यन्त पोचवु शकेल.
अरेच्चा इतकं असतं होय यात?
अरेच्चा इतकं असतं होय यात?
एक्च्युली वरचा प्रतिसाद जस्ट
एक्च्युली वरचा प्रतिसाद जस्ट एडिट केला होता.. इथे लिहिणे योग्य आहे कि नाही असे वाटले म्हणून.
भ्रमर म्हणताएत ते बरोबर आहे.स्वतः हुन विडिओ पाहून करू नये.प्रशिक्षित योगा शिक्षक च व्यवस्थित शिकवू शकतात.
छान लेख!
छान लेख!
सुरेख लिहिलंय.
सुरेख लिहिलंय.
छान लिहिले आहे !!
छान लिहिले आहे !!
>>>>>अरेच्चा इतकं असतं होय
>>>>>अरेच्चा इतकं असतं होय यात?
+ १
बरेच दिवसांनी दिसलात इथे,
बरेच दिवसांनी दिसलात इथे, अश्विनी! छान वाटलं.
लेख खूप छान आहे. अश्या पद्धतीने योगासनं करून पहायला हवीत आता.
छान लेख . आवडला
छान लेख . आवडला
अरेच्चा इतकं असतं होय यात?...
अरेच्चा इतकं असतं होय यात?.....+१.
छान
छान
काहीना माझ्या लेखाचा आशय
काहीना माझ्या लेखाचा आशय आवडला, काहीना माझी लेखन शैली आवडली.
सर्वांना खूप खूप धन्यवाद.
rmd.... तुम्ही दाखवलेल्या आपुलकीने मस्त वाटले.
माझ्या मते youtube वरून पाहून आसने करणे टाळलेले बरे. असे नाही कि ते सगळेच शिक्षक चूक आहेत. पण तुमची तब्येत, तुमचा स्पीड, तुमची गरज या गोष्टी स्वतःच्या स्वतः ओळखता येणे सुरुवातीला अवघड असते. तुम्हाला निदान काही बेसिक गोष्टी क्लास करून (सध्या online क्लास ) शिकायला लागतील. नन्तर तुम्हालाच ठरवता येईल कि कोणत्या लिनक्स विश्वासार्ह आहेत. प्राणायाम करता तर निश्चितच शिक्षक हवा.
मी योगशिक्षिका नाही. वरील लेखात मला काय शिकवले गेले ते मी लिहिले आहे.
अजून थोडेसे विस्ताराने समजावून सांगते.
१. कोणतेही आसन करताना शरीराच्या काही विशिष्ट भागालाच व्यायाम मिळत असतो. म्हणजे धनुरासन करताना ज्या अवयवांना व्यायाम मिळेल त्यापेक्षा ताडासन करताना वेगळ्या अवयवांना व्यायाम मिळेल. तर मग प्रत्येक आसन करताना श्वास एक तर एका लयीत आणत सावकाश श्वसन करत व्यायाम करावा.
२. आसन संपल्यावर ३० सेकंद शांत बसावे आणि ज्या अवयवांना व्यायाम मिळाला आहे तिथे फक्त लक्ष केंद्रित करावे. तिथे जर ताठरपणा जाणवला तर inhale करताना शुध्द हवा आत येत आहे आणि exhale करताना relax असे म्हणत तिथले स्नायू मोकळे करतो/होत आहेत
अश्या मनाला सूचना द्यायच्या. ताठरपणा जाणवला नाही तर फक्त श्वसन कारण हलकेसे हसू चेहऱ्यावर आणत पुढचे आसन करावे.
३. तसेच या दरम्यान आपल्या मनात कोणते विचार आले त्याकडे लक्ष द्यायचे. प्रत्येक आसनाच्या वेळी वेगळे विचार येत असतात. त्याची फक्त नोंद घ्यायची आणि नोंद घेवून झाल्यावर आतल्या मी ला स्वतःला जोडून घ्यायचे आणि स्वतःला आपण जसे आहोत तसे स्वीकार करायचे. स्वतःवर पिटुकले प्रेम करायचे आणि पुढे जायचे. स्वतःशी जोडले जाणे महत्वाचे.
लेखात सांगितल्याप्रमाणे जे आवडेल, जे जमेल तेच करा. हळूहळू सगळे जमायला लागेल. मुख्य म्हणजे स्वतःवर प्रेम करा. योग म्हणजे स्वतःशी नाते जुळवणे.
सरनौबत ..... किंचित फरक आहे. तुम्ही जे म्हणत आहात आणि मी जे म्हणत आहे. स्ट्रेस आहे असे समजू नका. स्ट्रेस आहे का नाही ते आधी जाणवून घ्या आणि मग पुढची कृती करा.
धनवंती......मी अजून काही सुचले तर लिहीनच. पण pintrest वर वरील संकल्पना सांगणारे अनेक उत्तम कोट्स आहेत आणि शिवाय आसना विषयी पण चांगली माहिती आहे. जरूर पहा.
सगळ्यांना परत एकदा धन्यवाद.