Submitted by MSL on 12 May, 2021 - 06:04

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा किलो कच्ची केळी,
रवा 1 वाटी
तिखट मीठ चवीनुसार
8-10 लसूण पाकळ्या,
आल्याचा तुकडा,
4-5 हिरवी मिरची
तेल
क्रमवार पाककृती:
1: कच्ची केळी साली सहित कूकर वर शिजवून घ्यावी...शिजवताना पाणी जास्त घालू नये...4-5 शिट्ट्या पुरे आहेत
2: कूकर थंड झाल्यावर , केळी ची साले सुटतात...त्यातला गर काढून. कुस्करून लगदा करून घ्यावा...
3: त्यात मीठ, आले लसूण मिरची पेस्ट, असे मिक्स करून घावी..
4: याचे लहान पॅटीस तयार करून घ्यावे..
5: एका प्लेट मध्ये कोरडा रवा ,त्यात मीठ n जरासे तिखट असे मिक्स करावे...
6: पॅटीस दोन्ही बाजूंनी हे मिश्रण लावून घ्यावे..
7: फ्राईंग पॅनमध्ये.दोन्ही बाजूंनी खमंग शॅलो फ्राय करून घ्यावे..
8: चटणी /दही/ सॉस सोबत गरम सर्व करावे
वाढणी/प्रमाण:
4-५
माहितीचा स्रोत:
Myself and internet
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
अप्पे पात्रात गोल करून बघू
मस्त. फोटो पाहिजे होता.
मस्त. फोटो पाहिजे होता.
भारीच प्रकार आहे... नक्की
भारीच प्रकार आहे... नक्की करून बघेन. ब्लॅककॅट म्हणतात तसं आप्पे करायचे असतील तर केळ्याच्या लगद्यात रवा मिक्स करावा लागेल अन थोडी सरसरीत कंसिस्टंसी ठेवावी लागेल. एवढं करून ते आप्पेपात्राला चिकटले तर करायला गेलो गणपती अन झाला मारुती असं व्हायचं त्यापेक्षा नकोच ते आप्पे
छान रेसिपी.
छान रेसिपी.
पाककृती छान वाटते पण फोटो
पाककृती छान वाटते पण फोटो हवाच.
कोणती केळी घ्यायची? नेहमीची कि प्लॅन्टेन?
आम्ही अप्पे पात्रात गोल
आम्ही अप्पे पात्रात गोल पॅटिसच करतो
घट्टच ठेवायचे , रवा लावून ठेवायचे
सगळीकडून भाजायचे
अप्पे पात्र फक्त भाजण्यापूरते वापरायचे , पण त्याचे अप्पे करायचे नाहीत
IMG_20210512_225424.jpg (173
IMG_20210512_225424.jpg (173.83 KB)
केळी कोणत्याही प्रकार ची
केळी कोणत्याही प्रकार ची चालतील...
भाजीसाठी मोठी केळी मिळतात.. ती बेस्ट...
....
छान लागेल असे वाटतेय,
छान लागेल असे वाटतेय,
मला पाकृ वगैरे कळत नाही. पण आमच्याकडे कच्च्या केळाचे काप (कदाचित थोडे शिजवून की काय कल्पना नाही पण) फिशफ्राय सारखे रवा आणि मसाला वगैरे लाऊन तळायचे ते आवडायचे मला.
मस्त आणी सोपी आहे रेसिपी..
मस्त आणी सोपी आहे रेसिपी..
आम्ही पण कच्या केळ्या चे काप करतो रवा आणी तांदळचे मिक्स लावुन . ते करताना केळी नाही शिजवत.
मी एकदा कच्च्या केळ्या चे कबाब केले होते तेही मस्त लागतात.
हो... कच्च्या केळ्याचे काप
हो... कच्च्या केळ्याचे काप करतात त्यावेळी शिजवावे लागत नाहीत... काप करून मिठाच्या पाण्यात टाकून नंतर त्याला कोरडा रवा आणि तांदुळाचे पीठ त्यात तिखट मीठ असे घालून शॅलो फ्राय करतात..
>>>कच्च्या केळीची भजी पण करतात बटाट्याच्या प्रमाणे......( बेसन मध्ये तळून) ...
कच्च्या केळ्याचे काप करतात >>
कच्च्या केळ्याचे काप करतात >>> वा! काय अनुप्रास जमून आलाय!!
#कुणाचंकायतरकुणाचंकाय