१) २ वाटी बाजरीचे पीठ ,
२) भाजलेले तीळ २ चमचे (फराळाचा चमचा),
३) प्रत्येकी १ टीस्पून जिरे, ओवा,
४) २ हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट,
५) अद्रकचा छोटा तुकडा ,
६) ४-५ पाकळ्या लसूण ,
(हे तीनही जिन्नस वाटून घ्या, जाडसर पेस्ट बनवा)
७) चिमूटभर हळद ,
८) चवीनुसार मीठ
९) पिण्यायोग्य पाणी
१) खारोड्या करायच्या आदल्या रात्री /संध्याकाळी बाजरीचे पीठ कोरडे भाजून घ्या.
२) त्यात १ फराळाचा चमचा दही घालून चांगले फेटून घ्या.
इडलीचं batter असतं त्या consistancy मध्ये भिजवायचं, येथे अंदाजे दीड वाटी पाणी हवं.
३) हे मिश्रण रात्रभर भिजू द्या.
४) दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता ऊन निघायच्या आधी) कढईत तेल घालून तेलात जिरे, ओवा, आलं लसूण मिरची पेस्ट , हळद , तिखट हे घालून परतून घ्या.
५) ह्या फोडणीत २ वाटी पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या.
६) पाण्यात चवीनुसार मीठ घाला.
७) रात्रभर भिजवलेले बाजरीचे पीठ ह्या पाण्यात घाला. हे मिश्रण हळूहळू घाला आणि पिठलं घोटतो तसे घोटा /हटवा.
८) ह्याला दणदणीत वाफ येऊ द्या.
९) वाफ आल्यावर त्यात तीळ घाला.
१०) हे मिश्रण थंड होऊ द्या .
११) चमच्याने किंवा हाताने (हाताला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे मिश्रण चिकटणार नाही)हे मिश्रण थोडे थोडे करून जाड प्लास्टिक पेपरवर घाला.
उन्हात वाळवायला ठेवून द्या.
१२) चांगले खडखडीत वाळू द्या.
- ह्या खारोड्या, भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर असे सर्व्ह करा. मस्त चटपटीत हेल्थी स्नॅक आहे.
- मराठवाड्यात उन्हाळ्यात वर्षभराच्या खारोड्या करतात.
- गच्चीवर/अंगंणात खारोड्या घालणे हा प्रोग्राम प्रत्येक घरी पाहवयास मिळतो.
ही माझ्या आईची पद्धत आहे, सोपी आहे. लोकं अजुन वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ बनवतात.
छान आहे पद्धत सांज तुमची पण
छान आहे पद्धत सांज तुमची पण
पहिली स्टेप झाली
पहिली स्टेप झाली
पतंजली स्टोअर वाले पीठपण ठेवतात , 20 रु अर्धा किलो मिळाले
रात्री पीठ दहि व पाणी घालुन
रात्री पीठ दहि व पाणी घालुन आंबवले.
सकाळी खारोड्या केल्या
थोड्या मोठ्या झाल्या आहेत , पण चालते, थोडे वाळ्ल्ले कि अजुन एकाचे २,४ करता येतात.
अर्धे केले आहेत
कोथिंबीर भरपुर घालुन एक हिरवी बॅच करायची बाकि आहे
मस्त आंबुस होतात, शिजवलेले पीठ उकडीसारखी खाता येते
फोटो टाका ब्लॅककॅट
फोटो टाका ब्लॅककॅट
कालचा दिवस दुसरा update :
कालचा दिवस दुसरा update :
(साबा ह्यांची पद्धत )
१.परवा आणलेल्या बाजरीला मुंग्या लागल्या होत्या, त्या घालवण्यासाठी बाजरी पाखडून, निवडून घेतली.
२.बाजरी मुंग्याविरहित झाल्यानंतर कोरडीच खमंग भाजून घेतली.
३. भाजलेली बाजरी mixer मधून दळून घेतली
पूर्वी जात्यावर दळत असत. त्याचं texture खूप छान येतं. तसं हवं असेल तर जातं arrange करून होऊन जाऊ द्या program किंवा मिक्सर मधून भरड दळा. अगदी बारीक नको पीठ.
(ह्या ३ steps चे फोटो नाहीत, पुढच्या steps चे आहेत, देते थोड्या वेळात )
४. भरड दळलेल्या बाजरीच्या
४. भरड दळलेल्या बाजरीच्या पीठाला पाण्याचा हबका मारून थोडेसे ओले करून घ्यावे
५. आता आधण करायचे आहे.
तेलात जिरे, कढीपत्ता, ठेचलेला लसूण(लसूण नको असेल तर हिंग )घालून फोडणी करावी. त्यात तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. पाणी घालावे. चांगले उकळून घ्यावे.
६. आता ह्या आधणात पीठ घालायचे
६. आता ह्या आधणात पीठ घालायचे आहे. एका हाताने थोडे थोडे करून घालावे. दुसऱ्या हाताने मोठ्या डावाने / चमच्याने हटवत राहावे. (पीठले हटवतो त्या प्रमाणे )
(दोन्ही हात वेगवेगळ्या व्यक्तींचे असू शकतात, म्हणजे एकाने पीठ घालायचं, एकाने हटवायचं, असं. चित्रातला एकही हात माझा नाही, मी फोटो काढत होते. :खोखो:)
साधारणपणे जे पातेलं घेतलंय त्यात ७०% मसाला पाण्याचे आधण असावे आणि मावेल तितके पीठ थोडे थोडे घालायचे आहे.
.
.
७. हे मिश्रण चांगले शिजवून
७. हे मिश्रण चांगले शिजवून घ्यायचे आहे.
बॅटर ची consistency हाताने खारोड्या घालण्याइतपत झाली की gas off करावा.
बॅटर पराती मध्ये काढून घ्यावे म्हणजे थंड होते. किंचित निवले की खारोड्या घालण्याची सुरुवात करू शकतो
शेवटची step :
शेवटची step :
गच्चीवर / balcony मध्ये जावे.
जाताना शिजलेले पीठ, थोडेसे पिण्याचे पाणी, रिकामे bowl, आणि ज्यावर खारोड्या घालणार ती वस्तू (म्हणजे ताट किंवा प्लास्टिक / polythin ) घेऊन जावे.
प्लास्टिक शीट व्यवस्थित अंथरुन घ्यावे. ते उडू नये म्हणून कोपऱ्यावर वजन ठेवावे. स्वच्छ हात धुवून निवांत मांडी घालून बसावे. Bowl मध्ये पाणी ओतून घ्यावे. पीठ गरम असेल तर bowl मधल्या पाण्यात हात बुडवून लगेच ओल्या हातानी खारोड्या घालायच्या.
एक एक करून सर्व खारोड्या घालून घ्या.
चांगल्या कडक उन्हात खडखडीत वाळायला हव्यात.
आजचा तिसरा दिवस update :
आजचा तिसरा दिवस update :
काल वरती दिलेल्या सविस्तर कृतीने खारोड्या घातल्या.
दिवसभर छान ऊन होतं.
संध्याकाळी ठीकठाक वाळल्या होत्या
आज मेलं ऊन गायब झालं, आभाळ आलंय
बघू आता कधी खडखडीत वाळतील ते!
Will update u guys
मस्त च
मस्त च
स्टेप बाय स्टेप पाककृती साठी आभार !
स्टेप बाय स्टेप पाककृती साठी
स्टेप बाय स्टेप पाककृती साठी आभार>>>+१
पदार्थ मस्त आहे. माझ्या जळगाव
पदार्थ मस्त आहे. माझ्या जळगाव च्या रुममेट आणायच्या कधीकधी.
शिवाय पौष्टीक पण आहे.
हे असे पदार्थ कुरकुरे किंवा लेज किंवा बिंगो मॅड अँगल ऐवजी खायला जास्तीत जास्त प्रमोट व्हायला हवेत.
हे असे पदार्थ कुरकुरे किंवा
हे असे पदार्थ कुरकुरे किंवा लेज किंवा बिंगो मॅड अँगल ऐवजी खायला जास्तीत जास्त प्रमोट व्हायला हवेत.>>+१११
त्या पॅकेट फूड पेक्षा घरचे वाळवणातले पदार्थ कधीही बेस्टच वाटतात मला.
साधे
साधे ----------------------------------------- कोथिंबीरवाले
युट्युबवर अजून एक प्रकार
युट्युबवर अजून एक प्रकार दाखवला आहे
शेंगदाणा घेऊन तो ह्यात बुडवून सगळीकडून कोट करून घेणे व वाळवणे . आम्ही ते केले नाहीत.
आंबलेले पीठ गार झाल्यावरही छान लागते, तांदळाची उकड गार पडली की टेस्ट जाते , पण ह्याला तसे होत नाही.
वा मस्त दिसतंय सगळं.
वा मस्त दिसतंय सगळं.
छान झाल्यात खारोड्या blaccat
छान झाल्यात खारोड्या blaccat
Yummy
हो, बॅटर मला खूप आवडतं
तसंच खायचं गरम गरम
स्टेप बाय स्टेप फोटो सकट पाकृ
स्टेप बाय स्टेप फोटो सकट पाकृ सोपी आणि छान वाटतेय.
ब्लॅककट, तुमच्या ही खारोड्या छान दिसतायत
खूप छान रेसिपी किल्ली
खूप छान रेसिपी किल्ली
ब्लॅक कॅट फार छान खारोड्या
किल्ली रेसिपी आणि फोटो मस्तच.
किल्ली रेसिपी आणि फोटो मस्तच.
ब्लॅककट छान झालेत दोन्ही प्रकार. कोथिंबीरवाला जास्त भारी दिसतोय.
हा प्रकार काही माहिती नव्हता.
तसं म्हटलं तर बाजरीच्या
तसं म्हटलं तर बाजरीच्या पिठाचे सांडगेच की हे. छान आहेत.
मस्त रेसिपी आहे किल्ली..
मस्त रेसिपी आहे किल्ली..
ब्लॅक कॅट तुमच्या खारोड्या पण yummy दिसत आहेत..
माझी पहिली स्टेप
माझी पहिली स्टेप महिन्याभरापूर्वीच आत्मनिर्भर तेने पार पडली होती नेहमीप्रमाणे. आत्मनिर्भरतेमध्ये स्वीकार करण्याची भानगड नसते कडक उन्हाने वाळवणाचा ताप उच्चांकी होता ... रवा भिजत पडला होता कुरडयांसाठी ... कुरडया होत नाही तो पावसाने खाडकन ताप उतरवला नं...बाजरी मोक्षप्राप्तीच्या प्रतिक्षेत...
..
ताटात पातळ थर घेऊन बारीक
ताटात पातळ थर घेऊन बारीक शंकरपाळ्या पाडल्या तर काम जास्त सोपे होईल नै
आज छान वाळल्या आहेत खारोड्या
आज छान वाळल्या आहेत खारोड्या
या खायला
पहिल्यांदाच पहिल्या या
पहिल्यांदाच पहिल्या या खरोड्या. करून बघावस वाटतयं पण एव्हढी मेहनत करण्याआधी चव कळली तर नक्की ठरवता येईल. कुठे विकत मिळतात का या?
कच्च्या कुरड्या
कच्च्या कुरड्या खाल्ल्यासारख्या लागतात
खारोड्या संपल्या
खारोड्या संपल्या
आज अजून एक batch करायची आहे
आभाळ आलंय नेमकं
रिक्षा भरपूर ऊन आहे लाभ घ्या
रिक्षा
भरपूर ऊन आहे
लाभ घ्या
Pages