अमलताश / बहाव्याची फुले - ५-६ झुंबरे
कांदे - २ मध्यम आकाराचे
लसूण - ४-५ पाकळ्या
हिरव्या मिरच्या - २ (तुकडे करून)
मोहरी - १ लहान चमचा
हिंग - पाव चमचा
हळद - १ लहान चमचा
लाल तिखट - १ लहान चमचा
मीठ - चवीनुसार
बेसन- २ चमचे .
'भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतीय लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत ही एक रानभाजी.
होळी सरून चैत्र महिना लागला की वातावरणातील उष्णता वाढायला लागते तशी पानगळ झालेल्या बहाव्यातून लहान लहान पिवळी-सोनेरी झुंबरे डोकावू लागतात. साधारण तीन ते ५ मीटर उंच असलेला हा वृक्ष उन्हाळ्यात जंगलामधील आकर्षणाचे केंद्र ठरतो. (आता शहरांमध्येपण बहाव्याची शोभेचा वृक्ष म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड केलेली दिसून येते.) फुलांच्या सौन्दर्यामुळे याला 'गोल्डन शॉवर' असं पण नाव आहे. याला संस्कृतमध्ये व्याधिघात, हिंदीत 'अमलतास' आणि बंगालीत 'सोनालू' म्हणतात. शास्त्रीय नाव 'Cassia fistula'. या बहाव्याच्या झाडाची एक गंमत सांगते. असं म्हणतात की बहाव्याची फुले उमलली की त्यानंतर ४५ दिवसांत पावसाळा सुरु होतो. म्हणून याला 'इंडियन रेन इंडिकेटर ट्री' म्हणून पण ओळखले जाते.
या वृक्षाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यापैकी मुख्य म्हणजे पोटाच्या विकारांवर यापासून बनविलेली औषधें सारक म्हणून काम करतात. विदर्भातील गावांमध्ये वर्षातून एकदा ही बहाव्याच्या फुलांची भाजी खाण्याची पद्धत आहे. खरेतर वर्षभर कोणत्या महिन्यात काय खावे आणि काय खाऊ नये याची एक Do's N Don'ts असलेली कविता लहानपणी ऐकलेली होती. त्यात पण बहाव्याचा उल्लेख आहे. पूर्ण कविता तर आठवत नाहीय पण थोड्याश्या ओळी आठवतात-
चैती कैरी, बहावा वैशाखी...... श्रावणात कांटोळे, केना भादवी.....
असो. तर मूळ मुद्दयाकडे वळू.
भाजी करायला अत्यंत सोपी.
बहाव्याच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून २ पाण्यातून धुवून घ्या व निथळत ठेवा.
कांदा उभा चिरून घ्या. (जितका कांदा जास्त तितकी चव छान येते.) लसूण ठेचून घ्या.
कढईत तेल गरम करून हिंग-मोहरीची फोडणी करा .
त्यात ठेचलेला लसूण घालून खरपूस होऊ द्या.
आता कांदा घालून गुलाबीसर होऊ द्या. हळद, लाल तिखट घाला. त्यात बहाव्याच्या पाकळ्या घालून परतून घ्या. पाकळ्या शिजल्या म्हणजे volume एकदम कमी होतो. त्यानुसार नंतर मीठ घाला. २ चमचे बेसन लावून झाकण ठेवा आणि ५ मिनिटे दणदणीत वाफेवर शिजवून घ्या.
बहाव्याची भाजी/ झुणका तयार आहे. वर कोथिंबीर पेरून भाकरी सोबत खा.
चव सांगायची झाल्यास - as name suggests 'अमलतास' = अम्ल = आंबटसर
पुढे उन्हाळ्यात पोटाचे विकार सतावू नयेत म्हणून विदर्भात वर्षातून एकदा हि भाजी खाण्याची परंपरा आहे.
बालाघाटात आणखी एका अनवट
बालाघाटात आणखी एका अनवट फुलांची चटणी खातात. लासोड्या ची फुले जी झुबक्यांनी लागतात त्यांची गूळ घालून शिजवून चटणी होते. मस्त लागते आंबट-गोड. खूप वर्षात त्याचे झाड पण नाही बघितले.
अमलताशची सुवर्णौत्सवाची फुले
अमलताशची सुवर्णौत्सवाची फुले खाववणार नाहीत.
चिंचेची फुले आणि अगदी कोवळा
चिंचेची फुले आणि अगदी कोवळा पाला सुकवून पूड करून ठेवतात. आंबटपणासाठी स्वयंपाकात वापरतात. विशेषतः डाळीमध्ये. शिवाय गटगटे नावाच्या माशाला लावून ठेवायची ही पूड, मग ते विरघळत नाहीत, अशी माहिती मिळाली.
छान माहिती हीरा. अजून येऊ
छान माहिती हीरा. अजून येऊ देत
गटगटे नावाच्या माशाला लावून
गटगटे नावाच्या माशाला लावून ठेवायची ही पूड, मग ते विरघळत नाहीत, >> हीरा, गटगटे म्हणजे बोंबिल. बॉम्बे डक. खूपच नाजूक असतात हे मासे. कालवणात सोडले की पाच मिनिटांत शिजतात त्यामुळे तसा लगेच गॅस बंद करायचा म्हणजे विस्तुळत नाहीत.
फारच सुरेख !
फारच सुरेख !
चोरटी होत असेल नं भाजी म्हणजे एक वाफ आली की टोपलंभरून असलेली एकदम वाटीभर वगैरे. मी काही करणार नाही, उगीच आगाऊ चौकशी
हो अस्मिता. चोरटी होते वाफ
हो अस्मिता. चोरटी होते वाफ आली की.
उगीच आगाऊ चौकशी>>>आगाऊ चौकशी
उगीच आगाऊ चौकशी>>>आगाऊ चौकशी नाही, त्याला माहिती मिळवणे म्हणायचे.
गटगटे बोम्बिल ला म्हणतात?????
गटगटे बोम्बिल ला म्हणतात?????
बोम्बिल किती छान नाव आहे...
सोनाली मनिम्याऊ थँक्स.
सोनाली
मनिम्याऊ थँक्स.
गोकर्ण बिया फुले विषारी नसतात
गोकर्ण बिया फुले विषारी नसतात का ?
विष शास्त्र वाचून खूप वर्षे झाली आठवत नाही
छान दिसतेय भाजी. पण बहावाची
छान दिसतेय भाजी. पण बहावाची फुलं पहायला आवडतात. त्यामुळे नाही खाणार.
हादग्याची भाजी खाल्लीय.
यु ट्यूबवर गोकर्ण फुलांच्या
यु ट्यूबवर गोकर्ण फुलांच्या चहाच्या रेसिपी आहेत
Blue tea सर्च करा
ह्याला अपराजिता असेही नाव आहे म्हणे.
Blue rice देखील आहे , पण त्यात भातात निळी फुले घालून शिजवणे व रंग आणणे इतकेच आहे , फार मसाले , बिर्याणी वगैरे नाही
अरे वा विस्तुळणे, चोरटी ही
अरे वा विस्तुळणे, चोरटी ही नवीन नावे कळली
मस्त आहेत दोन्ही.
मनिम्याऊ धन्यवाद.
मनिम्याऊ धन्यवाद.
Ugaach Gana Athavala
Ugaach Gana Athavala
Kachchi kaliya tod naa
बंगाल ओदिशा बिहारमध्ये
बंगाल ओदिशा बिहारमध्ये गोकर्णीला अपराजिता म्हणतात. पूर्वी आम्ही चालायला जायचो त्या रस्त्याच्या कडेने हे वेल होते. एक दोन बायका फुले खुडून नेताना दिसायच्या. एक दिवस त्यांना विचारले की काय करता ह्या फुलांचे, तर म्हणाल्या की हे औषधी असते. भाषेच्या अडचणीमुळे त्या अधिक काही सांगू शकल्या नाहीत. पण त्यांनी उच्चारलेले नाव ओपोराजितो असे काहीसे लक्षात राहिले. मग घरी येऊन गूगलवर बघितले.
त्या बायका ओडिशामधल्या होत्या. मुंबईत घरकामे करीत होत्या.
ही बघा आमच्या पद्धत्तीने
ही बघा आमच्या पद्धत्तीने केलेली बहाव्याची भाजी.
बहाव्याच्या फुलांची भाजी
बहाव्याच्या फुलांची भाजी करतात हे माहितच नव्हते! इथल्या प्रतिसादांतूनही माहितीत भर पडली.
Pages