...एक मोठा हत्ती...

Submitted by गीतरुप on 23 November, 2009 - 16:07

एक मोठा हत्ती

एक मोठा हत्ती
सुपा एवढे कान
लांबडे लांबडे नाक
जणू जिराफाची मान

एक मोठा हत्ती
छोटे-छोटे डोळे
तोंडाबाहेर डोकावती
भले मोठ्ठे सुळे

एक मोठा हत्ती
अगडबंब पोट
अंगावर चढवलेला
कायम काळा कोट

एक मोठा हत्ती
पाय चार खांब
शेपूट मात्र एवढीशी
हातभर लांब

एक मोठा हत्ती
आता काय म्हणू
एक मोठा हत्ती
जणू बाप्पा गणू

गीतरुप ११/१६/२००९

गुलमोहर: 

मस्तं...
एक कडवं थोडं सोप्पं केलं तर?

>>
अंगावर चढवलेला
कायम काळा कोट
>>
>>
रोज रोज अंगावरती
तोच काळा कोट
>>

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार...
उपासक खरच तस खूप सोप,अजुन चांगल वाटल असत..
गुब्बी मस्तच..

मी माझ्या लेकिला प्रात्यक्षिकासह म्हणुन दाखवली. जाम खुष झाली.