३ कप पाणी
२ कप तांदळाच पीठ
१ टीस्पून जिरे
५-६ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून मीठ
२-३ टीस्पून पापडखार
१. मिक्सरच्या भांड्यात जिरे, हिरवी मिरची घालून जाडसर भरड काढा. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात हि भरड घाला. नंतर मीठ व पापडखार घाला. तांदळाचे पीठ चाळणीने चाळून घ्या.
२.आता पाण्याला उकळी आली कि तांदळाचे पीठ घालून एकजीव करा. मग गॅस बंद करून झाकण ठेवून २ मिनिटे ठेवा. नंतर परातीत पीठ काढून हलकेच मळून त्याचे लांबट आकाराचे मुटके बनवून चाळणीला थोडा तेलाचा हात लावून त्यात हे मुटके लावून त्याला बोटाने भोक पाडून घ्या, म्हणजे ते आतपर्यंत वाफवले जातील. हे मुटके १५ मिनिटे वाफवून घ्या.
३. वाफवून झाले कि एकेक मुटके काढून वाटीने दाबून गुठळ्या सोडून घ्या. चांगल मळून त्याचे छोटे - छोटे गोळे बनवा. (इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी इथे कुठेही तेलाचा वापर केला नाही, कारण तेलाने पापडाला खवट वास येतो मग ते जास्त दिवस टिकत नाही.)
४.आता दोन प्लास्टिक पेपर घेऊन एका प्लॅस्टिकवर गोळा ठेवून त्यावर दुसरे प्लास्टिक ठेवून वरून वाटीने गोलाकार फिरवा म्हणजे ते लाटल्यासारखे दिसेल. वरचे प्लास्टिक काढून पापड दुसऱ्या एका मोठया प्लास्टिक पेपरवर केलेले पापड ठेवून उन्हात सुकायला ठेवा. एक दिवसानंतर पापड उलटवून दुसरी बाजू सुकवा असे चार दिवस कडक उन्हात वाळवून घ्या. नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि वर्षभर वापरा. हवे तेव्हा काढून भरपूर तेलात तळा. भरपूर तेलात एवढ्याच साठी की हे पापड दुप्पट आकाराने फुलतात. हे पापड असेच खायलाही रुचकर लागतात.
५.वाळलेले पापड व तळलेले पापड बघा कसे छान फुलून आलेत ते (म्हणूनच छोटे छोटे पापड करा)
मस्त दिसतायत.
मस्त दिसतायत.
छानच!
छानच!
सही ! फोटोत जाम खुसखुशीत
सही ! फोटोत जाम खुसखुशीत दिसतायत, तर प्रत्यक्षात किती असतील? रेसेपी जपुन ठेवलीय.
हा फोटो तुम्ही काढला आहे का?
हा फोटो तुम्ही काढला आहे का? तुमचा नसेल तर काढून टाका.
रेसिपी छान आहे.
मस्तच..! या वर्षी करूनच पहातो
मस्तच..! या वर्षी करूनच पहातो.
फेण्या वेगळ्या प्रकारे करतात.
फेण्या वेगळ्या प्रकारे करतात. हे सुद्धा करून पाहायला हवे.
संजय खंदारे यांच्या फुड
संजय खंदारे यांच्या फुड चानेलवरून फोटो घेतलाय का?
मस्त! आइ नेहमी करते हे पापड,
मस्त! आइ नेहमी करते हे पापड, मला याची उकड आवडते खायला त्यावर किन्चित तिखट आणी तेल टाकुन खायची
मस्तच.
मस्तच.
आई गुजराथी पद्धतीने तांदुळाचे पापड करायची, ढोकळयासारखी थाळी करून मग त्याचे पापड करायची, सारवडे म्हणतात बहुतेक त्याला. एक थाळी आम्हाला खायला ठेवायची, पापडनो लोट खायला मजा यायची. झरझर लाटलेही जायचे हे पापड. लाटायला आणि वाळवायला आमची मदत.
छान
छान
काल केले पापड तुमच्या
काल केले पापड तुमच्या रेसिपीने. मस्त झाले. Thank u.
या पापडा साठी तांदळा चे पिठ
या पापडा साठी तांदळा चे पिठ कसे करायचे?
मी चिन्मयी, मस्त झालेत पापड!
मी चिन्मयी, मस्त झालेत पापड!
सही दिसताएत पापड चिन्मयी.
सही दिसताएत पापड चिन्मयी.
पापडखार म्हणजे काय?
पापड मसाला
पापड मसाला
Mrunali पापडखार पांढरया
Mrunali पापडखार पांढरया रंगाची पुड असते जी पापड सांडगे मध्ये ते फ़ुलून येण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी वापरतात.
मी चिन्मयी तुमचे पापड मस्त झालेत..
तुमचे फोटो बघून मला ही हे पापड करायची इच्छा झाली.
यात तांदळचे पिठ कसे तयार केले. नुसते तांदूळ दळुन का ते 2 दिवस भिजत घालून वाळवुन म दळुन
गोरेबंधु सांगली ह्यांचा
गोरेबंधु सांगली ह्यांचा कुईफुई पापड मसाला फेमस आहे
https://youtu.be/Dy4lZCejC7o
यात तांदळचे पिठ कसे तयार केले
यात तांदळचे पिठ कसे तयार केले. नुसते तांदूळ दळुन का ते 2 दिवस भिजत घालून वाळवुन म दळुन>>> अमुपरी, तांदूळ एकदाच धूवुन सुकवुन घेतले होते फक्त. भाकरीसाठी दळलेलं पीठ होतं. तेच वापरलं मी.
ते दोन दिवस भिजत घालून वगैरे तांदळाच्या पापड्या बनवतात बहुतेक. जाम किचकट. त्यापेक्षा हे बरं. सोपं, सुटसुटीत.
हो असे तांदुळाचे पिठ असेल तर
हो असे तांदुळाचे पिठ असेल तर खुपच सोपे पडेल. धन्यवाद चिन्मयी..