
साहित्यः सुपरमार्केटमध्ये तोफूचा फर्म्/एक्स्ट्रा फर्म वगैरे ब्लॉक/पॅक येतो तो एक-चौकोनी तुकडे करुन, रंगीत भोपळी मिरच्या- हवा तो कलर- उभ्या चिरुन, गाजर- उभे चिरुन, मश्रूम्स, फ्रोजन एदामामे, एशियन सॉस- सोया सॉस, एशियन स्टाईल गार्लिक सेसमी सॉस, व्हेरी व्हेरी तेरियाकी सॉस, सिराचा सॉस, आलं, लसूण पेस्ट, मीठ.
कृती- सगळ्या भाज्या उभ्या चिरुन घेऊन तेलावर परतून घ्याव्यात. त्यावर आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावं. गॅस मध्यम ते हाय असावा. त्यावर हे बाकीचे एशियन सॉसही घालावेत. जसा रस हवा असेल किंवा जर ड्राय हवं असेल त्याप्रमाणे सॉसचं प्रमाण ठरवावं. सगळ्यात शेवटी तोफू घालून मग सिराचा सॉस, मीठ घालून जरा भाज्या शिजू द्याव्यात. गरम गरम थाय जास्मिन राईसबरोबर खावं किंवा नुसतंही खाऊन चांगलं लागतं.
टीप- काही जणांना तोफूवर वजन ठेवून त्यातलं पाणी काढून वापरायला आवडत. जसं हवं असेल वापरावं.
मस्त.
मस्त.
स्टरफ्राय इज माय फेवरीट टू ..
स्टरफ्राय इज माय फेवरीट टू .... आणि किक्कोमन फर्स्ट चॉईस. एन्जॉय !!
छान पाकृ.
छान पाकृ.
खायला आवडेल, पण करून बघायचे तर जमेल की नाही शंका आहे.
सायो, धन्यवाद. बेस्ट प्रोटीन
सायो, धन्यवाद. बेस्ट प्रोटीन डाएट सुचवलं आहेस. मला जिमिंग नन्तर हा बेस्ट ब्रेफा ऑप्शन वाटतो आहे. नक्कीच करायला आवडेल.
मीरा, मलाही प्रोटीन वाढवायचं
मीरा, मलाही प्रोटीन वाढवायचं होतं म्हणून मी ह्या पद्धतीने तोफू खायला लागले. अन्यथा तोफू अजिबात आवडत नाही.
मानव, का जमणार नाही? चिराचिरी पलिकडे काही करायचं नाहीये. हे सॉस भारतात मिळणार नाहीत पण अशा टाईपचं दुसरं काही पर्याय म्हणून वापरुन चालेल.
अरे वा.. मी पण अगदी डिट्टो
अरे वा.. मी पण अगदी डिट्टो ह्याच पद्धतीने बनवते..सगळे सॅास वगैरे टाकून.. पूर्वी फार आवडायचं नाही टोफू पण आता प्रोटीन इनटेक वाढावा म्हणून असं बनवून खाते
सायो मी सॉस करताच तसे म्हणालो
सायो मी सॉस करताच तसे म्हणालो. सोय सॉस वगळता इतर नावेही ऐकली नाहीत. इथे अमेझॉन वर मिळतीलही पण कशाचे प्रमाण किती, नाही मिळाले तर पर्यायी सॉस कुठले वापरावे काहीच कल्पना नाही.
तो अंदाज असेल तर पाकृ तशी सोपी वाटतेय.
मानव, पर्यायी सॉस मला नाही
मानव, पर्यायी सॉस मला नाही सुचवता येणार कारण कल्पना नाही तिकडे काय ऑप्शन्स आहेत.
प्रमाण- सोया सॉस मी कमी घेते आणि बाकीचे सॉस प्रमाण सांगायचं झाल्यास साधारण एक डावभर प्रत्येकी. पण किती ग्रेव्ही/रस हवाय त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त चालेल. जर भाताबरोबर खायचं असेल तर जरा रस हवा.
नेचर्स बास्केट मधे मिळतात
नेचर्स बास्केट मधे मिळतात बहुतेक.. sriracha तर माझा फेवरेट आहे.. जीथे टोफू मिळेल तीथेच हे सगळे सॅासेस पण मिळतील
सायो धन्यवाद.
सायो धन्यवाद.
एकदा बघतो करून प्रयोग. मला असल्या डिशेस आवडतात.
मस्त दिसतंय! तोफू अजिबात नाही
मस्त दिसतंय! तोफू अजिबात नाही आवडत पण. श्रिम्प/चिकन घालून करावी का?
तोफू मलाही एरवी आवडत नाही.
तोफू मलाही एरवी आवडत नाही. रेस्टॉरंट्समध्येही वगैरे अगदी चामट असतं. पण फक्त ह्याच एका पद्धतीने केलेलं आवडतं.
श्रींप, चिकन वगैरे घालून करुन बघ. मला कल्पना नाही चवीबद्दल.
छान रेसिपी.
छान रेसिपी.
,माझ्याकडेही इतके सगळे सॉसेस नाहीत पण छोट्या बाटल्या मिळाल्या तर आणून करून बघेन.
यात थिकनेससाठी कॉर्नचं पीठ नाही लागत का घालायला?
नाही, अजिबात गरज नाही.
नाही, अजिबात गरज नाही.
ह्या पदार्थाला भारतीय साज
ह्या पदार्थाला भारतीय साज द्यायचा असेल तर भारतात मिळणारे कोणतेही सोया सॉस, चिली सॉस वापरून हे बनवता येईल. ऑनलाईन शोधणार असाल तर ऑयस्टर सॉस, बार्बेक्यु सॉस पण मिळाले तर चांगले लागतील. मन्चुरिअनची ग्रेव्ही पण छान लागते. तेरीयाकी सॉस घरी पण बनवता येईल. सोप्या रेसिपिज आहेत नेटवर.
चांगला वाटतोय हा प्रकार,
चांगला वाटतोय हा प्रकार.
तोफू अजिबातच आवडत नाही, पण प्रोटीन ईनटेक साठी हे एकदा करुन बघेन
रेसिपी मस्तच आहे.
रेसिपी मस्तच आहे.
मी ही स्टर फ्राय करते पण कोणताही सॉस न वापरता. तोफू ऐवजी पनीर घालते. छान होतं, वन डिश मील.
ऑऑवर २-३ लसणी बारिक चिरून घालायच्या. त्यात नंतर कांदा उभा चिरून. गाजर, भो.मिरची, झुकिनी. वांगं घालायचं असेल तर उभ्या चकत्या करून मीठ लावून एका ताटलीवर ठेवायचं म्हणजे पाणी काढून काढायचं. सगळयात शेवटी टॉमेटो घालायचा (पाणीदार/बियांचा भाग काढून) . नंतर पनीर घालायचं. चवीप्रमाणे मीठ व ओरेगॅनो घालायचं आणि गरम गरम खायचं.
मस्त दिसतंय सायो. मीही करतो
मस्त दिसतंय सायो. मीही करतो कधीकधी. आता करेन. तेरियाकी कधी एवढा घातला नाही. बघतो.
आडो, छान आहे रेसिपी. हो वन
आडो, छान आहे रेसिपी. हो वन डिश मिल आहे. हवंतर भाताबरोबर आणि हवं तर नुसतंच.
भाचा, ह्यातले सगळे सॉस आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात वापरता येतील. मी जेव्हा पहिल्यांदा हा पदार्थ केला तेव्हा माझ्याकडे हे सॉस होते म्हणून मी हेच वापरते आहे. बाकी कोणाला काही वेगळं ट्राय करायचं असल्यास तसं चालेलंच.
छान रेसिपी. यामुळे तोफू
छान रेसिपी. यामुळे तोफू खाववेल असे वाटतेय. सॉसच्या बाटल्यांचे फोटो टाकल्याबद्दल स्पेशल धन्यवाद.