लॅपटॉप घेताना अनेक जण गोधळतातयात अनेकांना फार साधी कामे करायची असतात.
आणि तरीही गरज नसतील तर उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो - वस्तूत: हि ताकद कधीही वापरली जात नाही - किंवा फार क्वचित वापरली जाते .
अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो .
आज लॅपटॉप अतिशय मागणी आल्याने आणि चीन मधून पुरवठा बराच कमी झाल्याने लॅपटॉप च्या किमती - नवीन आणि जुन्या फार वाढल्या आहेत . आणि आता मार्केट खराब असल्याने पैसे वाचवणे ही गरज झाली आहे
तसेच इंटेल चे आय सिरीज च्या जुन्या प्रोसेसर चे लॅपटॉप हि आय सिरीज चे आहेत म्हणून विकले जातात . यातील काही फार जुने असतात. थर्ड जनरेशन च्या आय ३ प्रोसेसर हे २०१२ ला लाँच झाले होते आणि २०१४ पर्यंत विकत होते फार फार तर २०१५ पर्यंत - म्हणजे हे ५ वर्षे जुने लॅपटॉप आहेत .
बरेच नवीन पेंटियम हे सेकण्ड / थर्ड जनरेशन च्या आय ३ / आणि काही आय ५ पेक्षा पॉवरफुल आहेत - आणि जर बेसिक काम असेल तर पुरेसे आहेत .
बहुसंख्य लोकांची कॉम्प्युटर वर कामे असतात
१) इंटरनेट ब्राउजिंग - फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही .
यात मी मी सांगेन कि बरेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नका .- त्याऐवजी ऑपेरा / ब्रेव्ह / इज असे ब्राउसर वापरून पहा - फायरफॉक्स - पूर्वी चांगला होता - आता तो हि लोड देतोय असे दिसले आहे
.२) व्हिडीओ कॉल - झूम वगैरे - याला हि फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
३) मायक्रोसॉफ्ट ऑफिस -वर्ड . एक्सेल फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही पॉवर पॉइंट वापरायचा थोडी जास्त , पण काम चालून जाते .
४) व्हिडिओ बघणे ( व्हीलसी वगैरे )
५) गाणी ऐकणेवरील कामासाठी फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाहीबरीच सॉफ्टवेअर पण कमी प्रोसेसिंग पॉवर वर चालतात
अनेक प्रोग्रामिंग च्या युटीलिटी ही कमी प्रोसेसिंग पॉवर वर सहज चालतात.
त्याचबरोबर ऑनलाइन टीव्ही आपणास ब्राऊसर मध्ये बघता येईल
आय ३ हा प्रोसेसर आपल्यासाठी फार जास्त होईल आणि आता किमती ही वाढल्या आहेत .
इंटेल ने पेंटियम हे तुलनेने स्वस्त प्रोसेसर काढले आहेत - पेंटिअम मध्ये हि गोल्ड सिल्व्हर आणि क्वाड कोअर आहेत ( quad core - 4 cores)
तसेच एएमडी या कंपनीचे अनेक स्वस्त प्रोसेसर आहेत मी यात AMD A6 / A8 / A9 / A10 सुचवतो.
लॅपटॉप फार बाहेर नेण्याची गरज नाही तर आपण १५. ५ इंची स्क्रीन चा घ्या - हे तुलनेने स्वस्त आणि जड असतात पण स्क्रीन तुलनेत मोठी असते . सिनिअर सिटीझन / विद्यार्थी साठी चांगले .
रॅम हे कमीत कमी ४ जीबी - शक्यतो ८ जीबी घ्या - रॅम हे डीडीआर ४ प्रकारचेच घ्या डीडीआर ३ रॅम जुने तंत्रद्नाण आहे आणि ते स्लो असते.
हार्ड डिस्क शक्यतो एसएसडी प्रकारची घ्या - तिने चांगला स्पीड मिळतो पण जर साधी हार्ड डिस्क असेल तर आपणास सहज एसएसडी हार्ड डिस्क टाकू शकतो - साधारण २४० जीबी एसएसडी अडीच तीन हजारात यावी आणि विकत जिकडून घेता तिकडेच आपणास बदलून मिळेल .
त्याला बदलण्याचा आणि त्यावर विंडोज परत लोड करण्याचा चार्ज किती ते विचारातर
बेसिक लॅपटॉप साठी सुचवलेले स्पेसिफिकेशन
Processor - Intel Pentium or AMD A4/A6/A8/A9/A10
*Ram - 8GB DDR 4
** Hard Disk - Preferred SSD or 1 TB of hard disk
***Screen - 15.5 Inch If you are used to num pad see if there is num pad
* याहून ही स्वस्त आणि स्लो प्रोसेसर आले होते पण आता ते मला तरी मार्केट मध्ये दिसले नाहीत - खरे तर ते ही चालून जावेत - हे प्रोसेसर म्हणजेIntel Atom Intel CeleronAmd Sempron (mostly discontinued)
** बऱ्याचदा लॅपटॉप मध्ये ४ जीबी रॅम असते - तर अनेक लॅपटॉप मध्ये हे रॅम वाढवता येते - फक्त एक रॅम चा स्लॉट खाली आहे आणि किती रॅम वाढवता येईल त्याची चौकशी करा . तो दुकानदार रॅम वाढवून देतोय का ते विचारा .
*** हार्ड डिस्क च्या जागी SSD टाकता येते - आणि त्याने स्पीड वाढतो .
आता वेगळ्या आकाराच्या वेगळा कनेक्टर असलेला आणि अधिक फास्ट अशा M. 2 हार्ड डिस्क आल्या आहेत , आणि त्यात हि २ प्रकार आहेत
m.2 SATAm.2 NVME - हि सर्व प्रकारात फास्ट आहे
आपल्या लॅपटॉप ला कोणता m.2 स्लॉट आहे ते बघा आणि हा असेल तर नेहमीची हार्ड डिस्क ठेवून हि अजून एक लावतात येते - ऑपरेटिंग सिस्टीम व सर्व महतवाचे प्रोग्राम हिच्यावर घ्यावे .
हे बदलणे हे काहीवेळा कौशल्याचे होऊ शकते - त्यामुळे ते विचारून , योग्य ते पार्ट आणून सर्व्हिस सेंटर मधून करून घ्यावे आणि त्याबरोबर वॉरंटी वर काही परिणाम होणार नाही का हे पण विचारावे . आता रॅम / हार्ड डिस्क बदलणे साठी लॅपटॉप उघडावा लागतो
अधिक ची वॉरंटी - अनेकदा लॅपटॉप अधिक ची वॉरंटी विकतात - नॉर्मल वॉरंटी वर बहुतेक वेळा २ वर्षे वाढवून मिळतात - यात बॅटरी आणि अडाप्टर सोडून सर्व कव्हर होते - तरी मला तरी याचा फायदा मिळाला आहे - तर हि वॉरंटी घ्यावी . अनेक दा कंपनी च्या स्कीम असतात आणि वॉरंटी स्वस्तात वाढवून मिळते
कंपनी च्या स्कीम - या काय आहेत ते बघा - बर्याचदा खूप फायदेशीर असतात . अनेकदा या डुलकण आत नाहीत सर साईट वर जाऊन लॅपटॉप रजिस्टर करावा लागतो
तर यावरून आपणास आपल्या सर्वसामान्य गरजेसाठी लॅपटॉप सहन शोधता येईल अशी आशा करतो .
हेमंत वाघे
HuntMyJob.in
Coming Soon
Job Hunt Support – Basics, Preparation, Resume, Approach
चांगली उपयुक्त माहिती.
चांगली उपयुक्त माहिती. धन्यवाद.
छान माहिती हेमंत.
छान माहिती हेमंत.
खूप छान आणि सोप्प्या भाषेत
खूप छान आणि सोप्प्या भाषेत समजावलं आहे,धन्यवाद
खूप छान आणि सोप्प्या भाषेत
खूप छान आणि सोप्प्या भाषेत समजावलं आहे,धन्यवाद >>+1
माझ्याकडे dell चा ८ वर्षे
माझ्याकडे dell चा ८ वर्षे जुना लॅपटॉप आहे. बाकी सर्व व्यवस्थित चालतो पण overheating ची समस्या आहे. त्यामुळे विडिओ कॉलिंग, स्क्रीन शेअर, विडिओ प्ले अशी प्रोसेसर गरम करणारी कामे करता येत नाहीत. केल्यास लॅपटॉप गरम होऊन क्रॅश होतो. आता उन्हाळ्यात तर हि समस्या खूपच त्रासदायक. केवळ या एकाच कारणासाठी नवीन लॅपटॉप घ्यायला नको वाटते आहे कारण लॅपटॉप मध्ये बाकी काही प्रॉब्लेम नाही.
या समस्येवर काही उपाय आहे का?
माबो वाचक, त्यातील कुलिंग फॅन
माबो वाचक, त्यातील कुलिंग फॅन बंद पडला असेल, जाळीवर धूळ साचून हवा ब्लॉक होत असेल, आत धूळ साचली असेल, सिपीयू वरील हिट सिंक सैल झाली असेल, किंवा त्या मधील उष्णता वाहक पेस्ट खराब झाली असेल अशी कारणे असू शकतात जास्त गरम होण्याची.
एकदा लॅपटॉप रिपेअर करणाऱ्या कडुन चेक करुन घ्या.
मुलासाठी वय वर्ष १२ ऑनलाईन
मुलासाठी वय वर्ष १२ ऑनलाईन स्कूल साठी लॅपटॉप घ्यायचे आहे. चांगला लॅपटॉप ४० ते ४५ हजार पर्यंत कोणत्या कंपनीचा आणी जर स्पेसिफिक मॉडेल सजेस्ट केले तर खूप मदत होईल. माझा लिनोव्हो आहे पण ७-८ वर्ष जुना आहे, काही प्रॉब्लेम नाही पण बाकी ब्रँड चे अनुभव मिळाले तर खूप मदत होईल चांगला प्रॉडक्ट सिलेक्ट करायला.
मुलांसाठी ऑनलाईन शाळेसाठी
मुलांसाठी ऑनलाईन शाळेसाठी लॅपटॉप न घेता आम्ही या वर्षी अशातच डेस्कटॉप घेतला. वय वर्षे १३. इतके दिवस तो माझा जुना एच पी चा लॅपटॉप (2012-13 चे I 5 प्रोसेसर असलेले मॉडेल) वापरत होता. त्याचे शाळेचे काही प्रोजेक्ट्स यावर करता आले नाहीत. आणि मला कामासाठी माझा लॅपटॉप लागणार होता.
नवा laptop बजेट बाहेर जात होता. सध्या किमान पुढची तीन वर्षे तरी ( १० वी संपे पर्यंत) मुलगा बाहेरगावी शिकायला जाणार नाही. घरी मोठ्ठा स्क्रीन असलेला डेस्कटॉप जास्त सोयीचा वाटला आम्हाला. त्याला यावर गेम खेळता येत असल्याने मुलगा खूप खुश झाला.
आम्ही असेंबल करून घ्यायच्या विचारात होतो. पण एक वर्ष वापरलेला एच पी एलाइट सिरीज मधला डेस्कटॉप with big screen साठी खूप चांगली डील मिळाली. तुमच्या बजेट च्या निम्म्यापेक्षा कमी.
पुढे तीन - चार वर्षात त्याला लॅपटॉप लागेलच. आत्ताच घेतला तर तो कामाचा रहाणार नाही, नवा घ्यावा लागेल. लॅपटॉप ची बॅटरी वर्ष - दोन वर्षात बदलावीच लागते. शिवाय आमचा लेक खूप काळजी पूर्वक, नीट लॅपटॉप हाताळेल याची पण आम्हाला खात्री नाही.
एकमेव तोटा डेस्कटॉप असण्याचा, ऑनलाईन शाळा असूनही बाहेरगावी ( आजोळी/ गावाकडे) जावून शाळा करता येणार नाही.
जूनमध्ये माईक्रोसॉफ्टने हिंट
जूनमध्ये माईक्रोसॉफ्टने हिंट दिली आहे की ओक्टोबरमध्ये (2021_10_20 )windows 11 येणार.
फक्त 8th gen+ processor वरच ते चालेल. कारण त्यात साइबर हल्ला परतावायचं कसब आहे. जुन्या मशिनवरच्या विंडोज १० ला अपग्रेड मिळणार नाही. त्याचा सपोर्ट संपणार. २०२५ मे.
लेनोवोच्या आणि एचपीच्या दुकानात विचारून आलो. स्टार्टिंग प्राईस ४० हजार विद एसएसडी आणि ओफिस ३६५ आहे. एएमडी राईझन प्रसेसर आहे.
"तो i8 चा equivalent आहे का ?" -माहिती नाही.
------------------------
१) आता सिक्युरटी वॉल सॉफ्टवेरवर अवलंबून नसून ती हार्डवेरवर ढकलण्यात आली आहे.
२) जुन्या 7th जेनरेशनच्या त्यांच्याच एका सरफेस ट्याबला अपग्रेड मिळणार नाही. तर बाकिच्यांचं काय?
३) 7th gen साठी विचार चालू आहे म्हणे. अर्थात काही कापून बिपून देतील. ते म्हणजे android apps देणारेत ती कापतील.
४) आताचे मशीन (विंडोज १०) चार वर्षांत खेळणं होणार?
---------------
५) जे लोक ,विद्यार्थी बिझनेससाठी पिसी - माइक्रो ओएस वापरणार नाहीत त्यांनी android tabs घ्यावेत का?
सामसंग/लेनोवो चे २२ह पासून मिळतात. त्यात वर्ड,एक्सेल apps चालतातच.गेमिंगसाठी नको.
_______________________
यावर प्रकाश टाका. लेख मार्चमधला आहे आणि माईक्रोसॉफ्टने कोलदांडा जूनमध्ये घातला. या अगोदर सांगत होते की विंडोज १० शेवटचीच.
>>"तो i8 चा equivalent आहे का
>>"तो i8 चा equivalent आहे का ?"
8th gen म्हणजे i8 नव्हे. कोर i3 पण आठव्या जनरेशन चा असू शकतो. सपोर्टेड प्रोसेसरची लिस्ट इथे बघा
इंटेल प्रोसेसर साठी
https://docs.microsoft.com/en-us/windows-hardware/design/minimum/support...
AMD प्रोसेसर साठी
https://docs.microsoft.com/en-us/windows-hardware/design/minimum/support...
याद्या पाहिल्या. धन्यवाद.
याद्या पाहिल्या. धन्यवाद.
थोडं थांबून जानेवारीत विंडोज ११ ची लोडेड मशिन घेणं हाच विचार आला.
क्रोम बुक कोणी स्वतः वापरले
क्रोम बुक कोणी स्वतः वापरले आहे का? कसा काय अनुभव आहे?
मुलासाठी घ्यायचा आहे. ऑनलाईन शाळा व अभ्यास हेच एक काम आहे.
हा रिव्यु assus चा आहे. पण
हा रिव्यु assus चा आहे. पण थोडी कल्पना येईल. क्रोम ओएस डिवलपिंग आहे.
https://youtu.be/kakKRI9LIac
@Srd धन्यवाद...!! असे
@Srd धन्यवाद...!! असे भरपुर रिव्यु बघितले आहेत हो. युट्युबच्या रिव्युवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न आहेच. बर्याचदा हे रिव्यु पेड असतात. इथे कोणी प्रत्यक्ष वापरला आहे का?
रिव्यु पेड च आहे. म्हणजे की
रिव्यु पेड च आहे. म्हणजे की assus ने ते डिवाईस आणून दिले.
तरीही रणजितने त्यातले पॉईंट्स सांगितले. अर्थात ते सर्व क्रोमबुक्सना लागू आहेत. क्रोम ओएस लंगडी आहे. आणि भरपूर इंटरनेट खाते. टीमवर्क करणाऱ्यांसाठी ठीक आहे. एक्सेल आणि वर्ड apps आहेत. ती कामाची.
तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी चालेल.
वर्ड, एक्सेल आणि पॉवर-पॉईंट
वर्ड, एक्सेल आणि पॉवर-पॉईंट ची वेब अॅप्स आणि मोबाईल अॅप्स (फ्री वाली. ऑफिस ३६५ सब्सस्क्रिप्शन वाली नाही) अगदीच बेकार आहेत. एक काम धड होत नाही त्यावर. त्यापेक्शा ओपन ऑफिस (पूर्णपणे फुकट आणि मात्र १५० एमबी साईझ; ओपन ऑफिस.ओआरजी वर फ्री डाऊनलोड) कैकपटीनं चांगलं आहे.
ओपनऑफिस नको libreoffice वापरा
ओपनऑफिस नको libreoffice वापरा
https://www.libreoffice.org/discover/libreoffice-vs-openoffice/
मी लिब्रे ऑफिस वापरतोय गेली
मी लिब्रे ऑफिस वापरतोय गेली दोन वर्षे.
फक्त एकच ग्लिच जाणवली. Writer मध्ये फाईल .docx एक्सटेंशन ने सेव्ह केली की आणि परत फाईल उघडली की डॉकुमेंट मधील टॅब्सची गडबड होते. परत नीट ऍडजस्ट करावे लागते.
लिब्र ऑफिस घरच्या लॅपटॉपवर
@मानव, तुम्ही म्हणताय तो प्रॉब्लेम कधी आला नाही. पण माझा वापर पण मर्यादीत आहे.
लिब्र ऑफिस घरच्या लॅपटॉपवर मुलाच्या शाळेचे प्रोजेक्ट बनवायला वापरतो, तेव्हा .odt, .doc किंवा .rtf सेव्ह करुनही चालतं. फाईल शेअर करायची असेल तेव्हा PDF मध्ये बदलुन पाठवायची.
.doc / .docx दोन्ही मध्ये ती
.doc / .docx दोन्ही मध्ये ती ग्लिच पाहिली.
बाकी पार्टनर्स MS Office वापरतात त्यामुळे असे सेव्ह करतो, त्यांना एडिट करता यावे.
अर्थात हा मोठा प्रॉब्लेम नाही, पुढे सॉल्व्ह होईल कदाचित अपडेट मध्ये.
बाहेर शेअर करताना pdf.
धन्यवाद योकु, भरत, मानव
धन्यवाद योकु, भरत, मानव पृथ्वीकर , व्यत्यय .
थँक्स सगळ्यांना, लॅपटॉप
थँक्स सगळ्यांना, लॅपटॉप मुलासाठी आणी आमचा दोघांचा ऑनलाईन जॉब असल्यामुळे एक स्टॅण्डबाय ऑपशन म्हणून ghyacha आहे.
https://avita-india.com/
https://avita-india.com/ ह्यान्चे AVITA PURA लॅपटॉप्स पहा. कमी किंमत आणि २ वर्ष वॉरंटी आहे
ऑफिस साठी WPS Office For PC
ऑफिस साठी WPS Office For PC पहा
HP ELITEBOOK i7 / 8th / 16
HP ELITEBOOK , Al Metal Body, i7 / 8th / 16 GB/ 256 GB SSD / Touch screen / 8 GB Graphics Card / 4.2 GHz नवीन लॅपटॉप ( गोडाऊन क्लिअरन्स सेल ) कितीला घ्यावा ?
विंडोज ११ च्या लॅपटॉप्स ला
विंडोज ११ च्या लॅपटॉप्स ला बॅटरी ड्रेन चा इश्यू येतो आहे का कुणाला?
माझ्या कडल्या डेल व्होस्त्रो ला गेल्या २-३ महिन्यांपासून असला रोग आहे. जेमतेम २ तास जाते बॅटरी. नवा लॅपटॉप आहे एक वर्श पण व्हायचंय अजून. तिथेच माझा ऑफिस चा विंडोज १०, ३२ जिबी रॅम + कोअर आय ७ लॅपटॉप ऑलमोस्ट पूर्ण दिवसभर चालतो. दोन्हींत एसएसडी आहेत.
विंडोज ११ मध्ये एखाद्या अॅप ची (किंवा सगळ्याच अॅप्स ची) बॅकग्राउंड बॅटरी यूसेज कशी लिमिट करायचा?
सध्याच्या घटकेला डेलचंच, बॅटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर टाकून बॅटरी ६०% च्या वर चार्ज होणार नाही असं केलंय. तसंपण तो लॅपटॉप नेहेमी घरीच असतो तर त्याला पॉवर अॅडाप्टर नेहेमीकरता लावून ठेवता येऊ शकेल. महिन्यातून १-२ दा बॅटरी सायकल (चार्ज-डिस्चार्ज) केली की काम होईल.
विंडोज ११ च्या लॅपटॉप्स ला
विंडोज ११ च्या लॅपटॉप्स ला बॅटरी ड्रेन चा इश्यू येतो आहे
>>+1
Lenovo दीड वर्ष झाल्यावरच त्रास सुरू झाला आहे.
माझाही घरीच असतो म्हणून सतत चार्जिंग चालू ठेवूनच वापरतोय.
Dell - Windows 10 - २ वर्षे
Dell - Windows 10 - २ वर्षे झाली. बॅटरी २-३ तास चालते. Brightness चा थेट परिणाम होतो बॅटरी च्या तासांवर.
अवांतर
अवांतर
Tablet x laptop असेही विडिओ पाहिले आणि लक्षात आलं की माझी गरज आता तरी tablet भागवणारे आहे. Excell नसले तरी चालेल. गूगल sheets करून save as excel xlxs file करु शकतो. (Video editing चं काम नाही. त्यासाठी laptop लागेल.) Realme pad 2 (8+256 gb) ok आहे.