लॉकडाऊन सुरू झाले आणि घरून काम करणे सुरू झाल्यावर एरवी प्रवासात वाया जाणारे दिवसाचे चक्क चार तास पदरात पडले! इतके दिवस करू करू म्हणून राहून गेलेल्या कित्येक गोष्टी करण्याचा हीच एक चांगली वेळ होती. अगदी पहिल्या दिवसातून ऑनलाईन शिकवणे सुरू असल्यामुळे याच बाबतीत मी बरेच काही प्रयोग केले, विविध अँप्लिकेशन्स वापरून पाहिली. त्या सर्व प्रयोगांपैकीच एक प्रयोग म्हणजे लाईट बोर्ड.
जेव्हा आपण मुलांकडून दिवसाचे चार तास ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची अपेक्षा करतो तेव्हा विविध गोष्टींचा वापर करून आपली लेक्चर्स जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी होतील याची जबाबदारी प्रत्येक लेक्चररची असते. गुगल मीट किंवा झूम वर घेतलेली त्याच त्याच प्रकारची लेक्चर्स कंटाळवाणी ठरू शकतात. तसेच क्लासरूम मध्ये ब्लॅकबोर्ड कडे तोंड करून लिहिताना रेकॉर्ड केलेल्या लेक्चर्समध्ये बऱ्याचदा विद्यार्थी लेक्चरर च्या चेहऱ्याकडे पाहू शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि जुन्या पद्धतीने वापरला जाणारे "खडू फळा" टेक्निक याचा संगम म्हणजे हा "लाइटबोर्ड" किंवा "लर्निंगग्लास'
पारदर्शक काचेच्या सभोवती लावलेल्या LED स्ट्रिप्समधून बाहेर पडलेली लाईट काचेमध्ये अडकून राहते आणि आपण जेव्हा निऑन मार्कर पेन वापरून अशा काचेवर लिहितो तेव्हा ही लाईट त्या अक्षरांमधून बाहेर येते. कॅमेरा आणि शिक्षक यांच्या मध्ये असलेल्या या ग्लासच्या आरपार दिसत असल्याने शिकविणाऱ्याचे तोंड हे सदा कॅमेऱ्याकडे राहते. कॅमेऱ्याची सेटिंग्ज आणि थोडेसे व्हिडीओ एडिटिंग केले की सुंदर ट्रेनिंग व्हिडीओ तयार होतात. त्याच्या जोडीला OBS स्टुडिओ या सॉफ्टवेअर ची जोड दिली की तुम्ही युट्युब किंवा फेसबुकवर लाईव्ह पण जाऊ शकता!
ज्यांना कुणाला ऑनलाईन ट्रेनिंग व्हिडीओ बनवायचे असतील त्यांना लाईट बोर्ड नेमका कसा असतो आणि तो नेमका कसा बनवायचा याबद्दल संपूर्ण माहिती हवी असल्यास माझ्या Career Sochh. या युट्युब चॅनल ला जरूर भेट द्या. यापुढच्या व्हिडीओ मध्ये विविध साधनांचा वापर करून ऑनलाईन ट्रेनिंग व्हिडिओ कसे बनवायचे याबद्दलचे मार्गदर्शन पण नक्की करेन.
https://youtu.be/aNOyDz4h7_g
लाईटबोर्ड व्हिडीओ
Submitted by दिनेशG on 12 February, 2021 - 06:15
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच छान उपयोग आहे
खूपच छान उपयोग आहे लाइटबोर्डचा. शुभेच्छा!
धन्यवाद नरेन
धन्यवाद नरेन
हा व्हिडिओ मस्त,आणि तुमच्या
हा व्हिडिओ मस्त,आणि तुमच्या चॅनल वरचे इतर सगळे व्हिडीओ ही माहितीपूर्ण
शुभेच्छा
छान! हा प्रकार माहिती नव्हता.
छान!
हा प्रकार माहिती नव्हता.
लाईटबोर्ड मला नाही लागणार
लाईटबोर्ड मला नाही लागणार कदाचित.
पण छान आहे व्हिडिओ आणि detailing.
शुभेच्छा!
धन्यवाद आपल्या सर्वांचे.
धन्यवाद आपल्या सर्वांचे.
इंटरेस्टिंग.
इंटरेस्टिंग.
अरे वा छान माहिती.
अरे वा छान माहिती.
खूप छान. अक्षरे उलटी का दिसत
खूप छान. अक्षरे उलटी का दिसत नाहीत, हा प्रश्न पडला होता. पण त्याचे उत्तर मिळाले.
तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे आणि कष्टाचे कौतुक आहे.
इंटरेस्टिंग >>> +999
इंटरेस्टिंग >>> +999