कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५ चा अपवाद वगळता गेली १० वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.
मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्या होणार्या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.
१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्यांची नावे बघून अॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.
शुभेच्छा!!
उपक्रमाला शुभेच्छा!!
मभादि स्वयंसेवकासाठी मी
मभादि स्वयंसेवकासाठी मी ईच्छूक आहे. छोटी, मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी हातभार लावला जाईल.
ईच्छूक होतो, पण काही अटी जाचक
ईच्छूक होतो, पण काही अटी जाचक आहेत असे वाटत आहे जसे की खरं नाव गाव नेट वर देणे.
वाचक म्हणून अनेक वर्षे सहभागी आहेच, या वर्षी प्रतिसादक म्हणून येथे सहभाग घेईन.
छान, माझे मराठी यथातथाच.
छान, माझे मराठी यथातथाच. त्यामुळे कधी यात सहभाग नोंदवता येत नाही. लहान मुलांचे काही असेल तर मुलांना भाग घ्यायला लावेन. सर्व उपक्रमांना आगाऊ शुभेच्छा आणि भावी संयोजक मंडळाचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ही स्वयंसेवक म्हणून काम
मी ही स्वयंसेवक म्हणून काम/सहभागी होऊ इच्छिते
धन्यवाद
उपक्रमासाठी मनापासुन शुभेच्छा
उपक्रमासाठी मनापासुन शुभेच्छा!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप शुभेच्छा !
खूप खूप शुभेच्छा !
या वर्षी स्वयंसेवकांचा
या वर्षी स्वयंसेवकांचा प्रतिसाद कमी असल्याने हा उपक्रम स्थगीत करत आहोत.
(No subject)