Submitted by Shreya_11 on 30 December, 2020 - 20:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धी वाटी ओट्स , अर्धी वाटी मुगडाळ , १ छोटा चिरलेला कांदा ,१ चमचा हळद , अर्धा चमचा जिरे /जिरेपूड , १ ते दीड वाटी चिरलेल्या भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे ( गाजर, कोलिफ्लॉवर , बटाटा , ओले हरभरे , पावटा , वाटाणा , बीटरूट , beans,पालक , मेथी यापैकी कोणतीही )
क्रमवार पाककृती:
कुकरमध्ये डाळ घेऊन धुवून घ्या . त्यात ओट्स , कांदा , भाज्या एकत्र करा . ४ वाटी पाणी घालून मीठ घाला . हळद टाका . मला थोडा तिखट आवडता म्हणून अगदी थोडसं कोल्हापुरी तिखट घालते . आवडत असेल तर एक चमचा तूप टाका . ४ शिट्ट्या काढा . तुमची खिचड़ी तयार !!
भाज्या चिरायचाही कंटाळा आला असेल तर फक्त ओट्स आणि मुगडाळीची सुद्धा छान लागते .
वजन कमी करायचे असेल तर तुमच्या डाएट मध्ये नक्की add करा . अगदी कमी कॅलरीस आहेत आणि पोटभर होते , स्वानुभव !!
आजच्या खिचडीमध्ये घातलेल्या भाज्या ...
वाढणी/प्रमाण:
१ जणांसाठी
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छानच पौष्टिक आहार
छानच
पौष्टिक आहार
छान
छान
छान मऊ मऊ हेल्दी दिसतीय.
छान मऊ मऊ हेल्दी दिसतीय.
धन्यवाद जाई , BLACKCAT ,
धन्यवाद जाई , BLACKCAT , वर्णिता
छान आहे रेसीपी करुन बघेन
छान आहे रेसीपी करुन बघेन
Mee karun pahili. Awadali
Mee karun pahili. Awadali
मस्त
मस्त
मस्त.
मस्त.
धन्यवाद Ampuri , च्रप्स ,
धन्यवाद Ampuri , च्रप्स , मामी
@नानबा - अरे वा ! छान , धन्यवाद ...
अतिशय चविष्ट प्रकार. बिन
अतिशय चविष्ट प्रकार. बिन तेलाचा हे ही खूपच छान! करुन पाहिली, आता माझी खूपच आवडती!
छान पाककृती. करून बघेन.
छान पाककृती. करून बघेन.
Which oats Shreya? I have
Which oats Shreya? I have quick cooking ones.
Which oats Shreya? >>>> For
Which oats Shreya? >>>> For this kinda recipe (khichdi), i would prefer steel cut than rolled oats.
रोल्ड ओट्स घाईघाईच्या ब्रेकफास्टसाठी (मसाला ओट्स किंवा पॉरिज साठी ठीक आहेत). पण या रेसिपीसाठी गुंईगुंई होतील.
गुईगुई(अनुस्वार वेळेअभावी
गुईगुई(अनुस्वार वेळेअभावी टाळलाय ) हा शब्द जाम आवडण्यात आला आहे.
धन्यवाद peacelily2025 ,
धन्यवाद peacelily2025 , अस्मिता
@ sneha1 मी old fashioned वापरते . Quick cooking ओट्स ची खीरचं होते . एकदा चुकून आणला होता . फक्त डोसे करून संपवला .
@ मीरा - thank you!! मसाला ओट्स म्हणजे ओटस चा उपमा ना ? कि अजून काही वेगळे करता? या रेसिपीसाठी गुंईगुंई होतील +१
mi_anu
मसाला ओट्सचे पाकीट मिळते.तेच
मसाला ओट्सचे पाकीट मिळते.तेच उकळत्या पाण्यात शिजवले तर मस्त लागते.
लहान बाळासारखी ओरपतापण येईल.
लहान बाळासारखी ओरपतापण येईल. :)) यम्मी.