गेल्या दोन-तीन वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करणार्या छोट्या कंपन्यांमधल्या (साधारण १० ते ८० कामगार) नोकर्यांच्या या जाहिराती पहा.जाहिरातींमधे अपेक्षिलेले ज्ञान आणि अॉफर केलेला पगार/पॅकेज पहा.
जितके ज्ञान अपेक्षिलेले आहे त्या तुलनेत पगार खूपच कमी दिसताहेत.या सर्व जाहिराती महानगरांमधल्या आहेत.अशा बर्याच जाहिराती येत आहेत.नमुन्यादाखल फक्त तीन इथे दिल्या आहेत.
म्हणजे बघा की ज्या व्यक्तीला जाहिरातीत दिलेय तितके ज्ञान असेल तर तो एखाद्या मोठ्या कंपनीत जाईल किंवा स्वत:च या ज्ञानावर आधारीत व्यवसाय सुरु करायला बघेल ना? ज्याच्याकडे चांगलं ज्ञान आहे तो छोट्या कंपनीत इतक्या तुटपुंज्या पगारावर का येईल? अगदी वाण्याच्या दुकानात किंवा मॉलमधे फारसं डोकं न लावता करायच्या कामालाही इतका पगार सहज मिळत असावा.(इतका शिकलेला उमेदवार वाण्याच्या दुकानात पुड्या बांधायला जाणार नाही ही गोष्ट वेगळी.फक्त तुलनेसाठी लिहिले आहे.)
हा झाला सामान्य तर्क.परंतु असंही आहे की ज्या अर्थी जाहिरातदारांनी अपेक्षिलेलं ज्ञान आणि त्यासाठी ठरवलेला पगार हा मार्केटचा अभ्यास करुनच दिलेला असणारेय.उमेदवार नोकरीसाठी येतील अशीच अॉफर कुणीही देईल ना?
तर प्रश्न असा आहे की हा नक्की काय प्रकार आहे? हे कसलं मार्केट प्रेशर आहे? इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या छोट्या कंपन्यांना इतक्या कमी पगारावर इतकं चांगलं ज्ञान असणारा उमेदवार त्यांच्याकडे नोकरीसाठी येईल अशी खात्री वाटण्यामागे नक्की काय कारणं आहेत? हे नक्की कशाचे अवमूल्यन आहे? कोणी खुलासा करेल का? _/\_
काय चुकीचे आहे? 1 वर्ष exp
काय चुकीचे आहे? 1 वर्ष exp मागितला आहे, असे लोक असू शकतात ज्यांना ही ऑफर ( पॅकेज) मंजूर असेल.. अनुभव घेण्यासाठी..
मी स्वतः 4000 पर मंथ ( 48K पॅकेज) ने काम केले आहे अनुभव घेण्यासाठी... 2007 मध्ये...
मिळतात असे लोक...
@च्रप्स
@च्रप्स
१ वर्ष जावा नि एम्बेडेडमधे अनुभव असलेल्याला ८ हजार पगार? सध्याच्या काळात? महानगरात?
इथे या जाहिरातींमधे आधीच अनुभव असलेले लोक हवेयत.फ्रेशर नकोयत किंवा नुसती थेअरी माहित असलेले नकोयत.
२००७ साली ४ हजार अनुभवी माणसाला कोणी अॉफर केला असता का?
पुण्या-मुंबईत नोकरी साठी येऊन
पुण्या-मुंबईत नोकरी साठी येऊन राहायला हा पगार अतिशय कमी आहे.आईबाप पॉकेटमनी देत असतील तर ठीक आहे.
यांना एकतर या पगारात लोक मिळणार नाहीत किंवा मिळाले तर 6 महिने 1 वर्षात सोडून जात असतील.
एकंदर ट्रेंड पाहता यांचा प्रेक्षकवर्ग हा पगार म्हणून नोकरी करणारे नसून कॉलेज झाल्यावर जी आर ई किंवा एम बी ए देईपर्यंत टाईमपास म्हणून नोकरी करणारी मुलं हा असावा.
इलेक्ट्रॉनिक/ एम्बेडेड या
इलेक्ट्रॉनिक/ एम्बेडेड या फील्डमध्ये पुण्यासारख्या शहरात MNC मध्ये फ्रेशरला तीन ते साडेतीन लाखाचे पॅकेज मिळते.
CDAC, मास्टर्स, niche technology असेल तर थोडे जास्तही मिळते.
तिथून पुढे ते आकडे कंपनीच्या पॉलीसीनुसार आणि त्या कॅंडीडेटच्या परफॉर्मन्सनुसार वाढत जातात.
तुम्ही लिहलेय ते छोट्या प्रायव्हेट कंपन्यांच्या बाबतीत खरेही असेल कदाचित पण overall market इतके वाईट नक्कीच नाहिये!
@mi_anu
@mi_anu
हो खूपच कमी आहे.केवळ महानगरातच नव्हे तर कोल्हापूर, सांगली सारख्या छोट्या शहरात PLC पॅनलचं वायरींग करुन देणार्या छोट्या कंपन्या आहेत.तिथे तर सद्या फ्रेशरला महिना ३ हजार तर अनुभवीला साडेतीन हजार देतात.सर्व्हिस इंजिनिअर म्हणून सर्विसिंगच्या कामालासुद्धा कधी कधी पाठवतात.
@स्वरुप
मोठ्या कंपन्यांमधे म्हणजे शंभरच्या पटीत कामगार असणार्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमधे पगार चांगलेच आहेत.छोट्यांमधेच हा केविलवाणा प्रकार सुरु आहे.
हा घ्या पेस्केल साईटवरचा डाटा
हा घ्या पेस्केल साईटवरचा डाटा:
@mi_anu
@mi_anu
हा व्हिडीअो बघा
https://www.facebook.com/367185886772730/videos/684273282448776/
>>मोठ्या कंपन्यांमधे म्हणजे
>>मोठ्या कंपन्यांमधे म्हणजे शंभरच्या पटीत कामगार असणार्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमधे पगार चांगलेच आहेत.छोट्यांमधेच हा केविलवाणा प्रकार सुरु आहे
हो.... छोट्या कंपन्यात पगार कमी असतातच..... ज्यांना MNC मध्ये कॅंपसमधून नोकरी मिळत नाही त्यांच्यासाठी हे छोटेमोठे लॉंचपॅड्स असतात.
पण तुम्ही दिलेले आकडे खुपच कमी वाटतायत..... अगदी पर्वती इलेक्ट्रॉनिक इस्टेटमधल्या छोट्या छोट्या कंपन्या पण याच्यापेक्षा चांगलाच पगार देतात फ्रेशर्सला!
फारच कमी आहेत हे पगार.
फारच कमी आहेत हे पगार.
2007 मध्ये शून्यानुभव असणाऱ्या इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सना आमच्याकडे सहा महिन्यांच्या प्रोबेशन पिरियड मध्ये महिन्याला 12K मिळायचे कन्व्हेयन्स आणि सेलफोन बिल मिळुन.
आणि 2017 ला मी कंपनी सोडली तेव्हा 25K होते.
@स्वरुप आलेखांबद्दल खूप आभार
@स्वरुप
आलेखांबद्दल खूप आभार
गेल्या दोन-तीन वर्षातील
गेल्या दोन-तीन वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करणार्या छोट्या कंपन्यांमधल्या (साधारण १० ते ८० कामगार) नोकर्यांच्या या जाहिराती पहा >>>>>
दोन-तीन वर्षातील?? दोन जाहिराती कोविड काळातल्या / या वर्षातील वाटतात. तिसरी कळली नाही कधीची.
पगार उत्तम / पुरेसा / कमी या गोष्टी आपण टेबलाच्या कुठल्या बाजूला आहोत यावरून भासतात.
कंपनीचा जीव किती, धंदा किती, फायदा किती, फायद्याला कितीने भाग जाणार -- यावर ऑफर देणार ना ते?
कोविडमुळे ज्यांना छोट्या कंपनी सेवा / कच्चा माल पुरवतात, त्या मोठ्यांकडून येणार्या ऑर्डर घटल्या असतील आणि वाढण्याचे संकेत नसतील तर कशाच्या बळावर आकडे मोठे देतील ते?
आधी कमी सांगून मग काम / ज्ञान पाहून वाढवू शकतील. उलटे नाही ना करता येणार.
दुसरी जाहिरात ९६००० पगार डिसें २०२० डेडलाईनवाली --- स्टार्टप वातावरणात काम करायची तयारी हवी म्हणतायत. स्टार्टपला नसेल परवडत दणकून पगार. आता टीम बिल्डींग स्टेज असेल. उत्तम काम कराल तर पार्टनरही व्हाल पुढेमागे. सगळी हिरेमाणके पहिल्या पगारात देतात?
तिसरी जाहिरात इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स रिपेअर साठी वाटते. जर प्रॉडक्ट उत्तम असेल, तक्रारींची शक्यता नगण्य असेल, सर्विसींग आणि AMC इतकेच काम असेल तर ते सावध राहूनच पगार देणार. का खैरात करतील?
त्यातूनही ते बेसिक १२ह देतायत. + इन्सेंटिव्ज आहेत. जे कामावर, गुणवत्तेवर, फिल्ड व्हिजीट संख्येवर असू शकेल?
सिद्ध करा स्वतःला आणि घेऊन जा १२ह + २५-३०ह अतिरिक्त.
पगार दिला जातो तसा 'कमवावा'ही लागतो.
फक्त इंजिनीअर शिक्क्यासाठी मस्त पगार हवा तर तसा शिक्का विशेष प्राविण्यासह मिळवून कॅम्पसमध्ये पटकवावी नोकरी. नका बघू SME कडे. एम्प्लॉयर / सॅलरी स्पेक्ट्रम आहे तसा गुणवत्ता दर्जासुद्धा वेगवेगळा आहेच ना.
@कारवी
@कारवी
विशेष प्राविण्यासह मिळवून कॅम्पसमध्ये पटकवावी नोकरी.
मी तर म्हणतो हेच सर्वात योग्य. : )
कारण तिशीच्या आत महानगरात स्वत:चा फ्लॅट ही हल्लीच्या लग्नाळू मुलींची अपेक्षित स्थळाकडून असणारी 'किमान अपेक्षा' आहे. ती अशा गरीब कंपन्यांमधे राहून पूर्ण व्हायची शक्यता शून्य. अशा छोट्या कंपन्यांमधे काम करणार्यांना कधी मोठ्या कर्जाची गरज भासली तर बँका फार सतावून, अनेकदा फेर्या मारायला लावून मग कर्ज मंजूर करतात.
उत्तम काम कराल तर पार्टनरही व्हाल पुढेमागे.
हा कै च्या कै आशावाद वाटतो मला.
इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स रिपेअर साठी वाटते. जर प्रॉडक्ट उत्तम असेल, तक्रारींची शक्यता नगण्य असेल, सर्विसींग आणि AMC इतकेच काम असेल तर
ही सुखासीन अवस्था , निवांतपणा किती काळ राहील? कधीतरी स्पर्धा येणारच. अशा कंपन्यांमधे ग्रोथ काय होणार?
त्यातूनही ते बेसिक १२ह देतायत. + इन्सेंटिव्ज आहेत. जे कामावर, गुणवत्तेवर, फिल्ड व्हिजीट संख्येवर असू शकेल?
सिद्ध करा स्वतःला आणि घेऊन जा १२ह + २५-३०ह अतिरिक्त.
इतकं कॅलिबर असेल तर कोणीही ते MNC त वापरेल की.ते लोक निदान मोबदला तरी देतील चांगला. ; )
BTW या छोट्या कंपन्या या वरील प्रकारच्या जाहिराती पुन:पुन्हा देत असतात.यांचे बकरे कोण असतात तर टेक्निकल ज्ञान चांगलंय पण अॅकेडमिक्समधे कमी पडलाय असे उमेदवार.सध्या करु या छोट्या कंपनीत काम दिवस बदलतील आपले या भ्रामक विश्वासावर.या छोट्या कंपन्या अनेक वर्ष उर्जितावस्थेत येत नाहीत.मग ही मुले कंटाळून सोडून गेली की मग परत जाहिरात. मागील पानावरुन पुढे सुरु.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या छोट्या कंपन्यांमधील असमाधानकारक पगार यासाठी उदा दिलेल्या जाहिरातींची दुसरी बाजू जी लक्षात आली ती दाखवली. या या शक्यता असतील तर त्या बेसिसवर आता याक्षणी इतकी ऑफर देणे शक्य आहे, ते त्यांनी केलेय. इतकाच मुद्दा. काळागणिक, परिस्थितीगणिक सारे बदलतेच.
कारण तिशीच्या आत महानगरात स्वत:चा फ्लॅट ही हल्लीच्या लग्नाळू मुलींची अपेक्षित स्थळाकडून असणारी 'किमान अपेक्षा' आहे. ती अशा गरीब कंपन्यांमधे राहून पूर्ण व्हायची शक्यता शून्य. अशा छोट्या कंपन्यांमधे काम करणार्यांना कधी मोठ्या कर्जाची गरज भासली तर बँका फार सतावून, अनेकदा फेर्या मारायला लावून मग कर्ज मंजूर करतात. >>>>>
हे सगळे इंजिनीअरिंगला अॅडमिशन घेऊन जे करायचे ते न करता, चार वर्षे फक्त टवाळक्या करत, थिअरी, ओरल, सबमिशन, प्रॅक्टिकल चटावरच्या श्राद्धासारखे उरकताना करायचे विचार आहेत. नोकरीसाठी बूट झिजवताना करायचे नाहीत. तेव्हा उशीर झालेला असतो. ज्ञान + कौशल्य मिळवण्याची जबाबदारी / कर्तव्य आपण पार पाडली नसेल तर पगाराचा मला हवा तसा आकडा हा हक्क कसा देईल कोणी?
कै च्या कै नसतात सगळ्याच गोष्टी, आपल्याला वाटतात म्हणून. शक्यता सांगितली. आजचा प्रत्येक ट्रेनी उद्याचा पार्टनर असतो असा सुविचार नाही लिहीलाय. स्टार्टप्स बंदही पडतात.
तुमची नवीन / लहान कंपनी आहे. कच्चा माल, उत्पादन खर्च, जागेचे भाडे, मार्केटिंग, ग्राहक बांधणे या सगळ्यातले चढउतार पार करताय. परिस्थिती अनिश्चीत आहे. तर तुम्ही किती द्याल वरच्या ३ पोस्टसाठी? कुठून द्याल? किती काळ देऊ शकाल स्वतःला धस न लागता ?
मागणीपेक्षा पुरवठा जास्त = अवमूल्यन हे सगळेच जाणतात.
टेक्निकल ज्ञान चांगलंय पण अॅकेडमिक्समधे कमी पडलाय >>>
हे कसं होईल? किती असतील असे?
ज्ञानही नाही नि अॅकेडमिक्समधे कमी फक्त डिग्रीचा कागद हातात, अशी बहुसंख्य जनता आहे म्हणून इथे लिहीलेय अनेकांनी दुसर्या धाग्यावर.
डिग्री नाही पण अनुभवाने, चुका-शिका पद्धतीने कंपनीचा आधार बनलेले कितीतरी अतिकुशल पण अशिक्षीत कामगारही आहेत. त्यांना किती पगार मिळतो? हे शोषण म्हणू आपण. तो वेगळा विषय.
पहावे त्या नजरेने दिसते. बकरे बघाल तर खाटीक दिसेल. काही न करण्यापेक्षा हाताला काम, बुद्धीला चालना, बायोडेटाला अनुभव, खिशाला थोडका पैसा म्हणून काम स्वीकारायचे हे बघितले तर स्टेपिंग स्टोन दिसेल. उमेदवारी कोणाला चुकलीय?
ज्याला आस्था / रस आहे त्याने सल्लागार व्हावे. करावा सर्व्हे SME चा. त्यांची बाजू, गरजा, मर्यादा समजाव्या. त्यांना जाहिरात खर्च वाचवायचे मार्ग सांगावेत. जास्त पगार देण्याची अनिवार्यता सांगावी. मुले म्हणतात नोकर्या मिळत नाहीत. एम्प्लॉयर म्हणतात माणसे मिळत नाहीत हा विरोधाभास तरी कमी होईल.
>>मग ही मुले कंटाळून सोडून
>>मग ही मुले कंटाळून सोडून गेली की मग परत जाहिरात. मागील पानावरुन पुढे सुरु.
हेच वर्किंग मॉडेल असते बऱ्याच छोट्या कंपन्यांचे.... एखादा चुकून टिकला तर नकोच होतो कंपनीला..... कारण मग त्याच कामासाठी अनुभवानुसार पगार वाढवत रहावा लागतो.... MNC त असते तसे ग्रोथ पाथ, करीअर प्लॅनिंग वगैरे करणे ना परवडते ना तशी सोय असते.... त्यामुळे एखादाच टिकवलेला सिनीअर, कधीकधी तर खुद्द मालक नवीन पोरांना ट्रेन करत रहातो आणि कमी पैश्यात आवश्यक तितकेच काम काढून घेत राहतो.
शोषण वगैरे काही नसते.... परस्पर गरज असते!
कारवी मस्त प्रतिसाद.
कारवी मस्त प्रतिसाद.
टेक्निकल ज्ञान चांगलंय पण अॅकेडमिक्समधे कमी पडलाय अश्या लोकासाठी स्टर्टअप्स , छोट्या कंपन्या ह्या ह्यआ स्टेपिंग स्टोन असतात. २-३ वर्ष अश्या कंपनीत काम करुन चांगला अनुभव घेतल्यास चांगला जॉब मिळु शकतो. ५ वर्षाचा अनुभव झाल्यावर कुठुन डिग्री केली आहे आणि किती मार्क आहेत हे कोणी विचारत नाही.
छोट्या कंपन्याकडे भांडवल, व्यवसाय. मर्यादित असल्याने ते जास्त पगार देउ शकत नाहीत म्हणुन ते कॅपस मधे नोकरी न मिळालेल्या मुलाना कामवर घेतात ज्यामुळे दोघाचा फायदा होतो.
टेक्निकल ज्ञान आणि अॅकेडॅमिक्स दोन्ही ची कमतरता असलेले मात्र जॉब सोडुन आपल्याला जे झेपेल ते करतात.
हेच वर्किंग मॉडेल असते बऱ्याच
हेच वर्किंग मॉडेल असते बऱ्याच छोट्या कंपन्यांचे.... एखादा चुकून टिकला तर नकोच होतो कंपनीला >>> सहमत. आमच्या कंपनीचे उलट होते. आमचे प्रॉडक्ट्स युनिक, तशात निर्वात तंत्रज्ञान हे कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवले जात नाही, निर्वात तंत्रज्ञान म्हटलं की लोकांना फक्त व्हॅक्युम क्लिनर तेवढे माहीत असतात. त्यामूळे आम्हाला लोकांना सगळं ट्रेनिंग द्यावं लागायचं, थिअरी + प्रॅक्टिकल, मग ऑन साईट, ऑन द जॉब ट्रेनिंग सगळं होऊन कँडीडेट इंडिपेंडंटली केसेस हाताळू शकेल या स्थितीला यायला दोन वर्षे लागायची.
त्यामुळे आम्हाला सोडून न जाणारे कँडीडेट हवे असत, अन्यथा परत दोन वर्षे त्यावर मेहनत.
फक्त मागच्या दोन तीन वर्षातच
फक्त मागच्या दोन तीन वर्षातच नाही तर आधीपासूनच छोट्या कंपन्या ची हिच परिस्थिती आहे...फक्त इलेक्ट्रॉनिक्स च नाही तर प्रत्येक ब्रांचसाठी हिच परिस्थिती आहे.. ज्यांना कैम्पस थ्रु जॉब मिळत नाही त्यांना पहिले पाच सहा वर्षे अशा खडतर कंपन्या मध्ये जॉब करावा लागतो..ज्यांना ग्रो व्हायचा इंटरेस्ट असतो ते या पाच सहा वर्षाच्या अनुभवावर चांगल्या कंपन्यामधे शिफ्ट होतात.