भेंडी, चौकोनी चिरलेली - साधारण ३-४ वाट्या, कांदा १ मध्यम किंवा अर्धा मोठा, टोमॅटो - १ मध्यम आकाराचा, सिमला मिरची - एक मध्यम. किंवा फार मोठी असल्यास अर्धी पुरेल, धण्या-जिर्याची पूड दीड ते २ चमचे, गरम मसाला (ऑप्शनल), कसुरी मेथी, हळद, तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य.
ही भाजी सोपी आहे. फार खटपट नाही. पण चटपटीत, अगदी रेस्टॉरन्ट स्टाइल लागते चवीला. भेंडी आणि सिमला मिरची हे काँबिनेशन छान लागते.
तर भेंडी, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची चिरून घ्या. भेंडी फार बारीक चिरू नये. सिमला मिरचीचे देखिल मोठेच तुकडे असू द्यावे.
कढईत तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी करा. त्यात कांदा परतावा. पारदर्शक झाला की टोमॅटोच्या फोडी घालून परताव्या.
मिश्रण जरा मिळून आले की धणे जिरे पावडर, गरम मसाला (घालणार असल्यास), हळद, तिखट घाला. लगेचच भेंडी घालून जरा परतावी. २-३ मिनिटांनी सिमला मिरचीचे तुकडे घालावे. सिमला मिरची थोडी नंतर घालण्याचे कारण म्हणजे ती फार गाळ शिजणे अपेक्षित नाही.
आता मीठ घालावे, भाजी मध्यम आचेवर शिजू द्यावी. झाकण ठेवू नये. शिजत आल्यावर दोन तीन चिमुट कसुरी मेथी घालून मिक्स करा. कसुरी मेथीचा स्वाद फार छान लागतो. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला. भाजी तयार!
मस्त! आज-उद्याच करून बघते.
मस्त! आज-उद्याच करून बघते. भेंडी आहे घरात आणि एकच सिमला मिरची शिल्लक आहे
छान
छान
हॉटेलात मसाला जास्त आणि भेंडी फार कमी असतात , तेंव्हा मला फार राग येतो
जिरे मोहरीच्या फोडणी न करता
जिरे मोहरीच्या फोडणी न करता ही भाजी बरेचदा करते.मला आवडते.
आवडली रेसिपी.. सोपी आहे..
आवडली रेसिपी.. सोपी आहे.. नक्की करून बघता येईल...
हे काँबो कधी ट्राय नाही
हे काँबो कधी ट्राय नाही केलेलं. भेंडी फार आवडती नाही पण करेन ट्राय तरीही.
मघाशी सिमला मिर्ची निसटली
मघाशी सिमला मिर्ची निसटली नजरेतून. हे ट्राय करायला पाहीजे.
सिमि ऐवजी हिमि आणि भरपूर कांदा घालून नेहमी होते ही भाजी आमच्याकडे.
भेंड्या वातड का होतात?
भेंड्या वातड का होतात?
सोपी आहे
सोपी आहे . करून पाहीन
एक शंका : सिमला मिरची घातल्याने भेंडीचा स्वाद मारला जात नाही का ?
रेसीपी चांगली आहे. Without
रेसीपी चांगली आहे. Without सिमला मिरची try करेन .
मैत्रेयी, भारीच दिसतंय हे
मैत्रेयी, भारीच दिसतंय हे काँबो प्रकरण.. नक्की करुन बघेन..!
यात थोडी आमचूर पावडर पण घाला
यात थोडी आमचूर पावडर पण घाला.मस्त चव येते.
थॅन्क्स. जाई - सिमला मिरची
थॅन्क्स. जाई - सिमला मिरची चे प्रमाण कमी असल्याने स्वाद येतो पण ओवरपावर करत नाही. देवकी, टोमॅटो आहे यात आधीच त्यामुळे तशी गरज भासत नाही पण घालायचा तर चव बघून मगच आमचूर घाला हे सजेस्ट करेन.
मी आज रात्री भेंडीची भाजी
मी आज रात्री भेंडीची भाजी करणार आहे.. आणि अनायासे सिमला मिरची पण आहे घरात.. ह्या पद्धतीने करून बघेन..
छान पाकृ.
छान पाकृ.
ओके मैत्रेयी
ओके मैत्रेयी
आज केली होती दुपारी! आवडली
आज केली होती दुपारी! आवडली
मी थोडे मटारपण घातले. होतेच घरात म्हणून.
छान रेसीपी. करून पहाण्यात
छान रेसीपी. करून पहाण्यात येईल ( खरं तर करून खाण्यात येईल म्हणायला हवं )
आमच्याकडे शिन चॅनचा भाऊ रहात असल्याने सिमला मिर्च घालणं मुश्कील. पण मला रेसिपी आवडल्यामुळे एकदा स्वतःसाठी नक्की बनवेन.
आमच्या कडे मसाला भेंडी म्हणजे ब्राऊन ग्रेव्ही असते. हॉटेलमध्ये असते तशी. ( The Home minister - youtube )
छान पाककृती .. माझ्या लेकाला
छान पाककृती .. माझ्या लेकाला भेंडी आजिबात आवडत नाही पण सिमला मिर्च आवडते , आता या पद्धतीने करून खायला घालेन .
मस्तं !
मस्तं !
खाल्ली आहे ही गरमागरम भाजी MT च्या हातची !
छान वाटतीये कृती. तेल जास्त
छान वाटतीये कृती. तेल जास्त घातलेस का गं?
छान आहे रेसिपी. फोटो मस्त. हे
छान आहे रेसिपी. फोटो मस्त. हे combination चांगलं लागत असणार.
मस्त
मस्त