साजूक तूप - १ कप
बेसन - २ कप
काजू - पाव कप
पिस्ता - पाव कप
वेलची पावडर - १ टीस्पून
पिठीसाखर - दिड कप
तर मंडळी फराळ तर करून झालाच असणार, पण तरीही पाकृ आणि व्हिडिओ देत आहे..
** सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा **
जाड बुडाच्या भांड्यात मंद आचेवर तूप गरम करा.
त्यात बेसन घालून परतत रहा. आच मंद असुद्या
आधी बेसन आणि तुपाच्या गुठळ्या होतील पण साधारण २०-२५ मिनिटानंतर बेसन तूप सोडायला लागेल आणि मिश्रण सैलसर होऊ लागेल.
अजून साधारण १५-२० मिनिटं मंद आचेवर परतत रहा. मिश्रण भांड्याच्या तळाला लागणार नाही याची काळजी घ्या.
आता मिश्रणात काजूचे तुकडे घालावेत आणि मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या.
बेसन पूर्ण थंड झालं कि त्यात वेलची पावडर आणि पिठीसाखर घालून मिश्रण एकजीव करा
आणि लाडू वळा. सजावटीसाठी लाडूंना पिस्ता/मनुका लावा.
साजूक तुपाचं प्रमाण जास्त असल्याने लाडू मऊ एकदम मऊ होतात आणि आकार बदलतात. पण चव म्हणजे स्वर्गसुख.
आपल्या आवडीनुसार तुपाचे प्रमाण कमी करू शकता.
वा, सुंदर दिसतायत लाडू आणि
वा, सुंदर दिसतायत लाडू आणि व्हिडिओही छान. ते मिश्रण गार होत असताना साखर घातली असती तर?
खूप छान रेसिपी आणि विडिओ पण.
खूप छान रेसिपी आणि विडिओ पण..लाडू मस्त दिसताहेत.. मला खूप आवडतात.. नक्की करून बघेन.
लाडू आणि व्हिडीओ मस्त!
लाडू आणि व्हिडीओ मस्त!
Mast.
Mast.
माझ्यासाठी साखरेचे प्रमाण जास्त आहे,पसंद apni अपनी.
व्हिडिओ मस्तच.
वीडियो छान आहे. लाडु मस्त.
व्हिडीओ छान आहे. लाडु मस्त.
मस्तच. पिस्त्यामुळे एकदम शाही
मस्तच. पिस्त्यामुळे एकदम शाही लुक आलाय.
खूप छान फ्रेश ब्राईट लुक असतो
खूप छान फ्रेश ब्राईट लुक असतो तुमच्या विडीओ चा. लाडू मस्त.
लाडू आणि व्हिडीओ मस्त!
लाडू आणि व्हिडीओ मस्त!
खूप खूप आभार मंडळी..
खूप खूप आभार मंडळी.. दिवाळीच्या शुभेच्छा!
ते मिश्रण गार होत असताना साखर घातली असती तर? >> सायो, सौ ला विचारून सांगतो.
लाडू देखणे दिसत आहेत. मस्त
लाडू देखणे दिसत आहेत. मस्त
छान, व्हिडीओ सुद्धा छान.
छान, व्हिडीओ सुद्धा छान.
मस्त. विडिओ नंतर पाहेन.
मस्त. विडिओ नंतर पाहेन.
मस्तच. पिस्त्यामुळे एकदम शाही
मस्तच. पिस्त्यामुळे एकदम शाही लुक आलाय. >> + 1
विडिओ कुठे गेला? दिसत नाहीये
विडिओ कुठे गेला? दिसत नाहीये मला.