कुमक्वाट्सचं (Kumquats) लोणचं

Submitted by सायो on 6 November, 2020 - 21:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

कुमक्वाट्स- १ पॅकेट, जिरे,धणे, मेथी, मोहरी सग्ळं समप्रमाणात साधारण पाव वाटी, सैंधव मीठ, साखर, लाल तिखट- चवीप्रमाणे, क्लेमेंटाईन्सचा रस किंवा ऑरेंज ज्यूस- अर्धी वाटी, पाणी अर्धी वाटी.

क्रमवार पाककृती: 

कुमक्वाट्सचं १ पॅकेट, ताजा लोणचं मसाला-१:१:१:१ ह्याप्रमाणात मेथी, जिरं, धणे, मोहरी वेगवेगळी भाजून घेऊन दळून घ्यायची. त्यातच हिंग, हळद अंदाजाने घालून घ्यायची.
कुमक्वाट्स धुवून अर्ध्यात चिरुन घेऊन बिया काढायच्या. त्यातच भरपूर सैंधव मीठ, साखर, तयार केलेला ताजा लोणच्याचा मसाला आणि चवीप्रमाणे अंदाजाने लाल तिखट घालून चांगलं मिक्स करुन घेऊन वरुन क्लेमेंटाईन्सचा रस घालून साधारण अर्धी वाटी पाणी घालून शिजत ठेवायचं. गॅस बारीक ठेवून सतत ढवळत रहायचं. पाऊण एक तासात साल पारदर्शक दिसायला लागली की कुमक्वाट्स मुरले असं समजायला हरकत नाही. गॅस बंद करुन पूर्ण गार झाल्यावर बाटलीत भरुन मग फ्रिजमध्ये ठेवावं.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसं
माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! मस्त रेसिपी. फार भारी होते हे लोणचे. फ्लेवर चे अगदी एक्स्प्लोजन !! कुमक्वाट्स चा स्वाद संत्रे +लिंबू सारखा असतो. लोणच्याला अगदी सुटेबल चव. क्लेमेन्टाइन्स चा रस बनवलास की रेडीमेड मिळाला?

मस्त दिसतयं लोणचे , कुमक्वाट्स पुष्कळ वेळा पाहिले , त्यांच्या आकर्षक दिसण्यामुळे घ्यावेही वाटायचे पण काय करावं याचं कळायचं नाही. धन्यवाद सायो. लिंबाचं लोणचं मी करतेच आता हेही करून बघते Happy .
मस्त पाककृती.

मस्त रेसिपि , एका मैत्रीणी़कडे झाड होते तेव्हा घरचे मिळायचे फ्रेश, तिने घर बदलले आता.
सन्त्र आणि लिन्बु अशि एकत्र चव असते. सालासकट खाता येतात.
मार्केट मधे आले कि करते.

गोल्ड्न बेरीजबद्दल कल्पना नाही. पण कुमक्वाट्स पहिल्या फोटोत आहेत तसे संत्र्यासारखे दिसतात. आकाराला छोटे आहेत, मे बी ऑलिव्ह्जपेक्षा थोडे मोठे.

मस्त वाटते आहे रेसिपी.

एका मैत्रिणीकडे झाड आहे. नक्की करून बघते.
नुसते खाणं केवळ अशक्य आहे!

Back to top