Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> त्यांचे कल्चरल डिफरन्सेस,
>> त्यांचे कल्चरल डिफरन्सेस, अप्रोप्रिएट/ इनप्रोप्रिएट /पोलिटिकल करेक्टनेस च्या कॉन्सेप्ट्स वगैरे मजेशीर आहे. ते जास्त बघायला आवडले. (पर्सनल स्टोरी, लव इंटरेस्ट्स इ. पेक्षा ) >> एकझॅक्टली. म्हणूनच बघतोय. हापिसात फ्रँकोफोनसमोर दोन चार जोकची बेगमी झाली की बास!
मला भेटलेले फ्रेंच (आयटी मधले) असले तिरसट न्हवते. क्युबेक मधले मात्र असेच खडूस्स असतात.
>>एमिली ला सगळे बिग शॉट क्लायन्ट्स सहज भेटतात, ईझिली डील्स होतात ते फार फेच्ड वाटतं पण अर्थात लाइट सीरीज म्हणून दुर्लक्ष केले. >> अगदी अगदी. बाळबोध आहे, पण हा कन्सेप्ट (अमेरिकन लेन्स मधुन पॅरी) आवडला म्हणून बघतोय. मै, कुंडलकरांची आठवण झाली की नाही?
एमिलीमुळे बऱ्याच दिवसानी एवढं
एमिलीमुळे बऱ्याच दिवसानी एवढं फ्रेंच ऐकलं.
मी मध्यंतरी एक वेस्टर्न सिरीज
मी मध्यंतरी एक वेस्टर्न सिरीज बघितली होती. बहुतेक नेटफ्लिक्सवर.. आता subscription संपलंय आणि नाव आठवत नाहीये. एक outlaw एका शेतकरी स्त्रीला मदत करतो something... कुणाला माहीत आहे का ?
बंदिश बँड इट (Bandish Bandits
बंदिश बँड इट (Bandish Bandits)
मिस करू नये अशी खूप सुंदर वेबसिरीज .
कॅमेरा मूव्ह होतो आणि दिसते ती राजस्थान मधील विविध भागातील संस्कृती त्याचवेळी एक आगळी वेगळी प्रेमकथा हळूवार पणे बहरात जाते क्लासिकल संगीत चा मेहनत घेऊन अभ्यास करणारा राधे आणि आजच्या पिढीचे आधुनिक संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारी व तेच ध्येय बाळगून असलेली तमन्ना , यांचा स्वतःला शोधण्याचा एक प्रवास खूपच सुंदर पद्धतीने उलगडून दाखवला आहे.
संगीत घराणेशाही त्यातले राजकारण , बेरकीपणा खूप सहजतेने हाताळले आहे, नासिरुद्दीन शाह , अतुल कुलकर्णी , शिबा चड्ढा असे मात्तबर कलाकार यांनी चार चांद लावले आहेत तसेच. संगीत मनापासून आवडणाऱ्यांसाठी एक वेगळीच मेजवानी मिळेल.
यातील सर्वच बंदिश अप्रतिम आहेत ( सजन बिन / गरज गरज too good ) शेवटची जुगलबंदी म्हणजे एक वेगळाच अनुभव इथे अतुल कुलकर्णी चे डोळ्यांतील भाव एकदम कातील ... एक तरल अशी हि सिरीज वेगळ्याच नोट वर संपते आणि आपल्या मनात रेंगाळत राहते.
अतुल कुलकर्णी आणि क्लासिकल..
अतुल कुलकर्णी आणि क्लासिकल.. बापरे डोक्यावर हात मारून घेतला मी. डेंजर ओवर अॅक्टींग केलीय त्याने.त्यापेक्षा राधे चांगला वाटला. बाकी बंदिश आणि ते लागे जियाको ठेस आवडले.
बन्दिश बँडिट ची गाणी मला तरी
बन्दिश बँडिट ची गाणी मला तरी आवडली. कदाचित क्लासिकल समजत नसल्यामुळे असेल.
सोनी लिव वर स्कॅम १९९२: हर्शद मेहता स्टोरी आलीय नवीन... जबरदस्त सिरिज आहे १९९२ च्या शेअर घोटाळ्याबद्दल... महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व संस्थांची आणि व्यक्तीन्ची नावं थेट घेतली आहेत. अगदी पी व्ही नरसिंहा पासून एस्बीआय पर्यंत...
I am watching vlog on YouTube
I am watching vlog on YouTube by Ridergirl Vishakha
Mumbai to Kedar nath solo riding
It's very interesting
वत्सला सेम पिंच , नर्मदा
वत्सला सेम पिंच , नर्मदा परिक्रमा पहात आहे तिची..
अजिंक्यराव पाटील: Godless?
अजिंक्यराव पाटील: Godless?
1992 scam मध्ये adult/sex
1992 scam मध्ये adult/sex scenes आहेत का इतर वेबसिरीजप्रमाणे? ज्येष्ठ नागरिकांसोबत बघायची आहे पण असे सीन असले तर awkward होईल.
नेटफ्लिक्स वर बॅड बॉय
नेटफ्लिक्स वर बॅड बॉय बिलिओनायर्स बघितली का कोणी? टिपिकल नेटफ्लिक्स सिरीज आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि सुब्रतो रॉय यांच्या उदयापासून अस्तापर्यंतची docu series आहे. छान आहे.
मी बघितेय. सुब्रतो रॉयचा
मी बघितेय. सुब्रतो रॉयचा एपिसोड राहिलाय.
सत्यमचा राजूचा एपिसोड बिहारमध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने काढून टाकण्यात आलाय .
हो चांगली आहे. मल्ल्याचा
हो चांगली आहे. मल्ल्याचा एपिसोड पूर्ण पाहिला आणि नीरव मोदीचा थोडा पाहिला आहे. खूप इन्टरेस्टिंग आहे.
हो माल्याचा बघितला मोदी बघत
हो माल्याचा बघितला मोदी बघत आहे. खूप प्रयत्न चालू आहेत हस्तांतरणासाठी.
1992 scam मध्ये adult/sex
1992 scam मध्ये adult/sex scenes आहेत का इतर वेबसिरीजप्रमाणे? ज्येष्ठ नागरिकांसोबत बघायची आहे पण असे सीन असले तर awkward होईल.>
एकही सीन नाहीय. दोन चार शिव्या सोडल्या तर अगदी लहान मुलांबरोबर देखील पाहू शकतो...
१९९२ थोडी पाहिली. आवडली.
१९९२ थोडी पाहिली. आवडली. त्यातला कलाकार एकदम परफेक्ट आहे भूमिकेला.
नंतर प्रिमीयम घ्या म्हणून नोटीस यायला लागली आणि रात्र पण झाली होती त्यामुळे थांबवले. आणि आता बाकी पुढच्या वीकेंड ला.
आश्रम पण थोडी पाहिली. प्रेडिक्टेबल असली तरी जबरदस्त ग्रिपिंग वाटली. काही डिस्क्लेमर्स सहित १२ प्लस मुलांना या वेगळ्या प्रकारच्या मालिका नक्की दाखवाव्या. आपल्या प्रोटेक्टिव्ह, लाड प्यार वाल्या, अगदी लिमिटेड अडचणी वाल्या जगाबाहेर चे जग काय आहे याचे काल्पनिक का होईना, चित्र त्यांना कळावे.
मिर्झा पूर वर चर्चा झाली आहे
मिर्झा पूर वर चर्चा झाली आहे का याआधी? मला सापडली नाही. मी आत्ताच संपविली. फार लाऊड वाटली. पण अखंड आनंद त्रिपाठी चा अभिनय बेस्ट! सर्वात आवडला मला तोच
ईथे बरीच चर्चा झाली आहे
ईथे बरीच चर्चा झाली आहे बहुतेक , पण मी हल्लीच डाउन्टन अॅबी बघायला सुरुवात केली
.
,मस्तच आहे .
धन्यवाद प्रवीण.
धन्यवाद प्रवीण.
आम्ही 1992 सुरू केली आहे. जबरी आहे..प्रचंड आवडते आहे.
स्वस्ति, डाउनटन अॅबीबद्दल
स्वस्ति, डाउनटन अॅबीबद्दल इथे धागा आहे.
https://www.maayboli.com/node/56922
स्वस्ति, डाउनटन अॅबीबद्दल
स्वस्ति, डाउनटन अॅबीबद्दल इथे धागा आहे.>>> धन्यवाद फा . ही कमेंट आता पाहिली
या धाग्याव्यतिरिक्त ही कुठेतरी सविस्तर चर्चा वाचल्याची आठवतेय.
१९९२ स्कॅम बघितलि आणि खुप
१९९२ स्कॅम बघितलि आणि खुप आवडली. दोन-चार शिव्या वगळल्या तर मस्त वेबसिरिज. शेवट घाईत उरकल्यासारखा वाटतो, पण ठिक आहे.
शेअर बाजाराचं आकर्षण असेल (भलेही ट्रेडिंग करत नसाल तरी) तर नक्किच बघा.
उगाच मला माबो वरचि "बॅंक नावाची शिवी" हे लेखमाला आठवली.
रिस्क है तो इश्क है
रिस्क है तो इश्क है
जुड लॉ ची मिनिसिरीज आलीये 'द
जुड लॉ ची मिनिसिरीज आलीये 'द थर्ड डे' नावाची हॉटस्टारवर. भारी वाटली.
https://youtu.be/T43V6z9wYyE
जुड लॉ म्हणजे त्या रॉबर्ट
जुड लॉ म्हणजे त्या रॉबर्ट डाऊनी ज्युनियरच्या शेरलॉक पिक्चरमधला वॉटसन का ?
मला कोणीतरी थांबवा, मला
.
मला कोणीतरी थांबवा, मला
मला कोणीतरी थांबवा, मला कोरियन ड्रामा चं वेड लागलंय. आधी crash landing on you मग marriage contract, मग she was pretty मग एक वेगळी सिरीयल vergin river बघितली मग परत k drama.
Was it love
Fight for your way
What is wrong with secretary Kim
आणि आता सद्ध्या oh my venus बघतेय
>>
यात किड्स बरोबर कोणत्या पहाता येतिल? क्रॅश लॅन्डिन्ग पाहिली आहे.
हल्ली बरेच लोक कोरियन बघतात..
हल्ली बरेच लोक कोरियन बघतात.. १३/१५ भागात संपते हेही एक कारण असावे..
Submitted by परदेसाई on 14 October, 2020 - 07:45
>>
नाही कारण आहे की मुलांबरोबर पहाता येतात पण एकदम पुचाट नसतात. पुर्वी हिंदी मराठीत असे
असायचे, आताशा फॅमिली ड्रामा सोडुन असे काही नसते की मुलांबरोबर पहाता येइल.
आता "द हॉन्टिन्ग ऑफ ब्लाय मॅनर उगाच मध्यी काही सीन टाकले की फॅमिलीबरोबर पहाता येणार नाही. अशी मैल्ड हॉरर सस्पेन्स जर सीन टाकले नाहित तर मस्त फॅमिली बरोबर एन्जोय करता येइल. अगदी काहितरी पुचाट नाहितर एकदम अॅडल्ट याच्या मध्यी ठन्ठणाट आहे.
मिर्झापुर 2 आली आहे. गरजूंनी
मिर्झापुर 2 आली आहे. गरजूंनी लााभ घ्यावा
Reply 1988 बघा
Reply 1988 बघा. Korean drama आहे.
नेट्फलिक्स वर आहे. जर तुम्ही ८० च्या दशकात वाढला असाल तर बघायला खूप मज्जा येईल. माझी मुले टीनेजर्स आहेत, येता जाता त्यानी पण बघितली, मधून मधून मधून खो खो हसू येत होते मुलांना. आवडली असावी.
Pages