Submitted by VB on 21 September, 2020 - 07:23
हल्ली बहुतेक मुली लग्नानंतर नाव बदलत नाहीत. लग्नाआधी मधले नाव आडनाव वेगळे अन लग्नानंतर वेगळे असते. अश्यावेळी बाळाच्या जन्मदाखल्यात वडिलांचे नाव आडनाव कसे लावतात? हॉस्पिटलमध्ये जर सगळी कागदपत्रे लग्नाआधीच्या नावावर असली तरीही बाळाला वडिलांचे नाव अन आडनाव लावण्यासाठी काय करावे लागते. कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
कृपया माहीत असल्यास सांगा.
तसेच, ऑनलाईन जन्मदाखला कसा मिळवायचा माहीत असेल तर तेही सांगा प्लिज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्ही बी तुम्ही तुमची काळजी..
व्ही बी तुम्ही तुमची काळजी.. खा.. प्या आनंदात राहा.. तेवढीच जर गरज असेल तर एजन्ट पण हि कामे करून देतात.. ४ / ५ हजार घेतात..
धन्यवाद.
धन्यवाद.
मेघा, खूप थँक्स, बरे वाटले वाचून. अन तुमचेही अभिनंदन☺️
क्लेमच्या पैश्यांचा विचार नाही करत आहे मी. इन्शुरन्स नवऱ्याचा नाही, माझाच आहे मी ज्या बँकेत काम करते त्यांचा.
लग्न दाखला नसल्याने नवऱ्याच्या विमा योजनेत माझे नाव नाही टाकले, तशी गरजही नव्हती.
<<<डिलीवरी जिथे कराल तिथल्या होस्पिटल मध्ये विचारपूस करून घ्या.>>> यांनीच तर सगळा घोळ केलाय. पण डॉक्टर चांगल्या आहेत अन मुख्य म्हणजे हॉस्पिटल घराजवळ आहे म्हणून बदलायची इच्छा नाही.
आमच्याकडे पालिकेचे जे ऑफिस आहे तिकडे खूप जण कोविड पॉझिटिव्ह आले म्हणून प्रत्यक्ष जायची भीती वाटतेय. ऑनलाईन माहिती मिळत नाही अन कॉन्टॅक्ट नंबर पण नाही मिळत आहे. बघू काय होते.
त्यांना तो विचारायचा अधिकार
त्यांना तो विचारायचा अधिकार नाही
उद्या एखाद्या विधवेला, लग्न न केलेल्या स्त्रीला मूल होणार म्हणून ते जन्माची नोंद करायला नकार देणार का? हा अधिकार कुणी दिला त्यांना?
नवीन Submitted by वरदा on 22 September, 2020 - 10:09.
+1
"मी यांना ओळखतो. यांचा विवाह
"मी यांना ओळखतो. यांचा विवाह श्री. अबक यांच्याशी झालेला आहे."
असं तुमच्या फोटोसह एखादा राजपत्रित अधिकारी अटेस्ट करून देत असेल तर किमान बाळाच्या जन्मदाखल्यावरच्या नावापुरतं चालेल.
VB, हा घोळ तुमच्या डाॅ घालत
VB, हा घोळ तुमच्या डाॅ घालत आहेत असं दिसतंय. डाॅ लोक, विशेषतः गायनॅकोलाॅजिस्ट याबाबतीत फारच जुनाट विचारांचे असतात असा अनुभव आहे.
प्रत्यक्षात बाळाच्या जन्मदाखल्यावर आईचे लिगल नाव येते. म्हणजे ज्या नावाची कागदपत्र असतील ते. लग्नाआधीच्याच नावानी सगळे डाॅक्स असतील तर तेच नाव येते.
दुसरं म्हणजे इन्शुरन्स जर तुमचा स्वतःचा असेल तर लग्नदाखला कशाला हवा? पतीचा इन्शुरन्स असेल तर कदाचित तुमचा त्याच्याशी नाते प्रुव करायला मॅ.स. मागत असावेत. मॅ.स. नसल्यास एफिडेविट करता येते पण तुमचा स्वतःचा इन्शुरन्स असताना त्याची गरज नाही.
VB ला बाळाच्या जन्मदाखल्यावर
VB ला बाळाच्या जन्मदाखल्यावर वडलांचे नाव आणि आडनाव हवे आहे.त्याकरिता हा सर्व खटाटोप आहे.
वावे,मी आणि बरेच जणांचे म्हणणे आहे की balakherij आता दुसरी कुठली काळजी करू नये.बाळाच्या जन्मानंतर कागदपत्रांची उठाठेव करावी.
ईथली चर्चा वाचल्यावर घरी
ईथली चर्चा वाचल्यावर घरी आमचीपण चर्चा झाली तेव्हा लक्षात आले की मी कोणतेच कागद डॉक्टरला दिले नाहीत. नुसते दवाखान्यात गेले तेव्हा फॉर्म भरताना अर्थात नाव सासरचेच लावले. पण त्या करता कुठलेही कागद पडताळणीसाठी डॉ. ने मागितले नाहीत. ना माझे ना नवर्याचे. फक्त नवरा कुठे काम करतो एवढेच विचारले आणि नन्तर जन्म नोंदंणी फॉर्म भरताना बाळाचे नाव ठरले असेल तर सांग असे विचारले. आमचे नाव ठरलेले असल्याने आम्ही लगेच सांगितले तर डॉक च म्हणाले हवे तर दोन दिवस घ्या काही बदलायचे वगैरे असेल तर. पण काही बदल नसल्याचे डॉक ला सांगितले. आणि बाळाचे नाव फॉर्म वर आले.
Vb, आता ह्यांना विचारून
Vb, आता ह्यांना विचारून पुन्हा एकदा खातरजमा केली.
आम्ही marriage cwrtificate दिले नव्हते. दोघांचे आधारकार्ड आणि हॉस्पिटलमध्ये मिळणारी discharge summary एवढ्यावर काम झाले pcmc मध्ये.
बाळाचे नाव ठरले होते आधीच.
फेब्रुवारी 2020मध्ये केलं हे काम.
हॉस्पिटल कडून pcmc ला जन्म नोंदणी रेकॉर्ड जाते. तसेच पालिकेत एक original फॉर्म भरून घेतात.
सर्टिफिकेट 15दिवसांत येतं.
आम्हला ते आणायला उशीर झाला, मार्च मध्ये लोकडोवन लागलं , जुलै मध्ये घेऊन आलो.
आधारकार्ड नसेल तर जन्म दिलेला
आधारकार्ड नसेल तर जन्म दिलेला चालतो का?
सगळ्यांचे आभार __/||\_
सगळ्यांचे आभार __/||\_
<<<हा घोळ तुमच्या डाॅ घालत आहेत असं दिसतंय.>>> हो, आता माझ्याही लक्षात येते आहे ते.
आमच्या जिल्ह्यात खूप रुग्ण वाढल्याने आम्ही काही इतक्यात हापिस उगडणार न्हाय असे सांगितले आहे काल. आतापर्यंत म्हणत होते की दोघांना यावे लागेल, आता नवरा गेला कदाचित सगळे समजल्यावर देतील, वाटल्यास दंड घेतील पण यावेळी अजुन रुक्ष ऊत्तर. त्यामुळे लग्न दाखल्याची आशा सोडून दिलीये, बघू केव्हातरी. तसेही आता त्यांचे ऑफिस उघडले तरी मला इतका लांब प्रवास शक्य नाही. ऊगाच नवऱ्याला पण १४ दिवस quarantine केलेय.
सगळा विचार करता आता आम्ही ठरवले आहे की सगळीकडे जुनेच नाव ठेवायचे, बघू नंतर काय होते.
तसे इथले प्रतिसाद पाहता अन एका मैत्रिणीचा अनुभव ऐकून वाटतेय की काही प्रॉब्लेम होणार नाही☺️
VB चांगला निर्णय.
VB चांगला निर्णय.
तुमच्या आधारकार्डवर जिथला पत्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा विवाह दाखला काढता येतो ( पती किंवा पत्नीचे वास्तव्य असलेल्या अशा दोन्ही ठिकाणाहून).
नाही होत आहे मानवकाका,
नाही होत आहे मानवकाका, प्रयत्न करुन झाला आहे.
लग्न गावी लागले आहे तेही कर्नाटकात, त्यामुळे नाही जमत आहे.
अजून एक संबंधित धागा. इथले
अजून एक संबंधित धागा. इथले प्रतिसाद सुद्धा कदाचित उपयोगी पडतील:
https://www.maayboli.com/node/31906
जिथे लग्न झाले तिथेच रजिस्टर
जिथे लग्न झाले तिथेच रजिस्टर होणार ना ?
आम्ही कार्यालय वाला व 2 साक्षीदार नेले होते
आमचं लग्न नागपूरला झालं.
आमचं लग्न नागपूरला झालं. आम्ही हैद्राबादला रजिस्टर केलं. (रजिस्टर खूप उशिरा म्हणजे २०१५ ला केलं.)
अहाहा, आज मी खुश
अहाहा, आज मी खुश
नवऱ्याने शेवटी मिळवले marriage certificate.
पण तरीही मी हॉस्पिटलमध्ये जुने नावच ठेवणार, किमान आता गरज लागली तर लग्न दाखला आहे हातात. अन क्लेमचे पैसे हातचे सोडण्यात शहाणपण नाही.
बुधवारी पालिकेचे लोक आले होते स्वास्थ चौकशी करिता तेव्हा त्यांनाही विचारले तर ते बोलले की जन्म दाखल्यासाठी त्रास होणार नाही अन त्यांचा नंबरदेखील देऊन गेलेत, गरज पडली तर सांगा आम्ही करून देतो बोलले.
छान
छान
क्लेमचे पैसे आता सहज मिळतील
सोडू नका , वेळेत दाखल करा
वेळेत नसेल तर मॅरेज सरटफिकेत , लॉक डाऊन वगैरे कारणे द्या
अहाहा, आज मी खुश
अहाहा, आज मी खुश
नवऱ्याने शेवटी मिळवले marriage certificate..... अभिनंदन! विनाकारण काळजीत होतीस ना मागच्या महिन्यात.
वेळेत नसेल तर मॅरेज सरटफिकेत , लॉक डाऊन वगैरे कारणे द्या.........+१.
गुड. अभिनंदन. आनंदी राहा.
गुड. अभिनंदन. आनंदी राहा. कसले टेन्शन घेऊ नका.
सगळे होते हो आपल्याकडे. आणि अशा वेळी सहकार्य करतात सगळे. काही न काही मार्ग निघत जातो. इंड्या आहे हा.
तुम्ही उगाचच आपण दुसऱ्या महायुद्ध काळात जर्मनीतले ज्यू असल्याप्रमाणे काळजी करत होतात
अरे वा VB! चला बरं झालं.
अरे वा VB! चला बरं झालं. तुमची काळजी मिटली! ऑल द बेस्ट!
छान वीबी!
छान वीबी!
डिजीटल बर्थ सर्टीफिकेट करवून
डिजीटल बर्थ सर्टीफिकेट करवून देणारे मुंबईतील कुणी खात्रीशीर एजंट असल्यास कुणी माहिती देईल का? माझे बर्थ सर्टीफिकेट हस्तलिखित स्वरुपातले आहे.
BMC च्या वेबसाईटवर एकदा चेक
BMC च्या वेबसाईटवर एकदा चेक कर वर्षा. हल्ली बरीच कागदपत्रं online मिळून जातात.
अगं केलं होतं मागेच ऑक्टो
अगं केलं होतं मागेच ऑक्टो मध्ये भारतात आले होते तेव्हा , बर्थ सर्टी. अॅप्लाय करण्यासाठी म्हणून रेकॉर्ड शोधायचे असते नाव्/पालकांचे नाव, जन्मदिनांक, वॉर्ड नं. इ. माहिती देऊन. पण ते डिटेल्स देऊनही रेकॉर्ड सापडत नाही असा मेसेज येतो त्यांच्या वेबसाईटवर आणि वॉर्डशी संपर्क साधा असे सांगतात. धावत्या भेटीमुळे ते करायला वेळच नव्हता. आता परत केलं सर्च, परत तोच मेसेज.
Pages