बोन लेस चिकन ब्रेस्ट बाइट साइज्ड तुकडे करून. हे मेन. त्याला मॅरिनेट करायला गरम मसाला किंवा भाजलेले धने जिरे पूड एक दीड टी स्पून ,लाल तिखट पूड एक टी स्पून. अर्ध्या लिंबाचा रस व एक टी स्पून मीठ. व नंतर घालायला कॉर्न स्टार्च दोन टे स्पून आणि एक अंडे.
हरा मसाला: पुदिना पाने अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, कढिपत्ता पाने आठ दहा, तीन किंवा चार मिरच्या उभ्या चिरून. बरोबरीने तीन किंवा चार लसूण पाकळ्या सोलून व अर्ध बोबड्या ठेचून.
तळायला तेल
सॉस साठीचे साहित्यः एक वा टी ताजे थोडे आंबट दही, मीठ धने जिरे पावडर लाल तिखट आले लसूण पेस्ट प्रत्येकी दीड टी स्पून. किंवा चवी प्रमाणे थोडे कमी जास्त करा. फार मसालेदार करायचे नाही.
सर्व प्रथम चिकनचे बाइट साइज्ड तुकडे करून घ्या व अर्ध्या लिंबाचा रस, तिखट मीठ आणि धणे जिरे पूड आले लसूण पेस्ट. ही देखिल ताजी बनवून घेत ली तर जास्त छान चव येते. नाहीतर रेडिमेड पेस्ट चालेल. १५ मिनिटे मॅरिनेट करून ठेवावे. मग एक अंडे फोडून ह्यात घालायचे आणि कॉर्न स्टार्च पावडर सर्व तुकड्यांना नीट लावून घ्यायची.
आता तेल कढईत गरम करत ठेवा व मध्यम आचेवर सर्व तुकडे तळून घ्या. दोन ब्रेस्ट च्या पीसेस ना चार घाणे होतात तळणीचे. तुकडे करपू द्यायचे नाहीत.
आता सॉस तयार करून ठेवा तो परेन्त तुकडे गार होतील थोडे बहुत. एका बोल मध्ये दही फेटून घ्या. त्यात आले लसूण पेस्ट लाल तिखट
धणे जिरे पूड / नसली तर गरम मसाला. हे काही नसेल तर छोले मसाला किंवा चिकन चा मसाला एवरेस्ट चा मिळतो तो ही चालेल.
हे सर्व नीट मिसळून घ्या. ह्यात एक चमचा ठेवा.
आता परत थोडे तेल गरम करा. चालत असल्या स तळणीचे तेल घेतल्यास हरकत नाही. तो वास नको असेल तर दुसरे फ्रेश तेल दोन चमचे
वेगळ्या कढईत घ्या. हे मध्यम आचेवर गरम झाले की पुढील क्रमाचेच पदार्थ घाला. पहिले लसणीचे अर्धबोबडे ठेचून घेतलेले तुकडे. हे हल्के गुलाबी झाले की उभ्या चिरलेल्या तीन किंवा चार हिर व्या मिरच्या. व कढीपत्ता. हे नीट तळले गेले की चमच्याने वेगळ्या बोल मध्ये तयार ठेवलेला सॉस घाला . सॉस घालताना आच कमी करा. कारण अंगावर उडू शकतो. हे घालून सर्व नीट मिसळून घ्या. सॉस दोन मिनिटे उकळू द्या. कच्चे पणा गेला की चिकनचे तुकडे घाला. व कमी आचेवर पाच सात मिनिटे सिमर करा.
आता कोथिंबीर व पुदिना घाला. दोन मिनिटे परतून गॅस बंद करा सॉस अंगाबरोबर राहिला पाहिजे. फार पाणचट झाला नाही पाहिजे.
आता प्लेट मध्ये घालून सर्व्ह करा.
ह्या बरोबर रेडिमेड मलबारी पराठा, व आपली घरगुती पोळी दोन खाल्ली तर जेवण होते. घरी मोठी पार्टी असल्यास फॅन्सी चकणा म्हणून
छानच लागतो. बरोबर कोण्त्याही च टणीची गरज पडत नाही.
लेक शाळेत व इथे घरून कॉलेजात जात असे तेव्हा मी अनेक वर्शे सोम्वारी सकाळी चिकन ६५ बनवून कामावर जात असे ब्रेक फास्ट इडली चटणी व लंच चिकन ६५ घरी आल्यावर . आता इतके मसालेदार खाणे कमी केले आहे. इट इज अ बिग पार्ट ऑफ नॉस्टॅल्जिआ फॉर अस.
मॉम फूड!!! हैद्रा बादेत बहार किंवा पॅरेडाइज मधून चिकन स्पेशल बिर्याणी पार्सल घेतल्यास त्यात तीन चार तुकडे चिकन ६५ चे असतातच.
बना के खालो . उंगलियां चाटते रह जाएंगे माबो के बेगमां और नवाबां
टिपः हिरवी मिरची व लाल तिख ट दोन्ही घालायचे आहे त्यामुळे घरच्यांच्या टेस्ट नुसार प्रमाण अॅडजस्ट करा. ही आंध्रा तेलंगणा साइड्ची डिश असल्याने आंबट तिखट असणे अपेक्षित आहे. आमच्या कडे मुंबईचे पुण्याचे पाव्हणे काय आंबट तिखट म्हणून नाक मुरडत असत. पण त्या भागात कोरडी हवा व अति उन्हाळा म्हणून असेच खातात.
अमा , रेसिपी "हे" करणार आहेत.
अमा , रेसिपी "हे" करणार आहेत. धन्यवाद.
आजच करतील बहुतेक , सामान आहे सगळं.
माबो के बेगमां और नवाबां , हमारे यहां नवाब और बच्चे खायेंगे अमा...
वा वा! मस्त रेसिपी अमा! फोटो
वा वा! मस्त रेसिपी अमा! फोटो असता तर अजून मज्जा आली असती म्या करून बघेनच , तेव्हा टाकेन फोटू !
केले की फोटो टाकीनच. आजकाल
केले की फोटो टाकीनच. आजकाल उकडलेले चिकन उकडलेली ब्रॉकोली, जपानी पद्धतीचे फूड ह्यांव अन त्याव चालू आहे. इथे एक मीटिगो नावाची साइट आहे त्यावर टर्की स्लाइसेस, बेकन फ्रोझन मोमो साधे व सुपर स्पाइसी असे भरपूर पदार्थ मिळतात त्यामुळॅ ते ऑर्डर करायचे आणी सँडविचे स बनवणॅ, उकडून खाणे असे चालू आहे. सध्या सोमवारी ऑफिसला लवकर जावे लागते म्हणून भात व चेट्टीनाड चिकन बनवून जाते. रात्री थकून आले की त्याच ग्रेव्ही बरोबर दोन डोसे बनवून दिले की डिन्नर का किस्सा खलास.
मी लॉक्डाउन मध्ये परफेक्ट केलेले पदार्थ म्हणजे कुंदपूर घी रोस्ट चिकन, तेलंगणा एग बिर्याणी, अंडा भुर्जी एक मशरूम ब्रॉकोली चिकन ग्रेव्ही जपानी पद्धतीचे व बरोबर आंबे मोहोर भात. ( आमचा जास्मिन राइस हाच आहे) सगळे टाकते इथे. स्पॅगेटी विथ मीट बॉल्स ( चिकनचेच) पण बनवते. ते ही टाकते.
आज लेक पिकनिकला गेल्यामुळे मी मटार उसळ आणि पाव खाउन चैन केली. तिला मटा र आवडत नाही आजिबात.
ते रेड वाइन मशरूम्स वाले
ते रेड वाइन मशरूम्स वाले चिकन पण बनवायचे आहे एकदा . ग्लासेस नाहीत म्हणून अडले आहे.
अमा मोहतरमा.. पसंद आया रेसिपी
अमा मोहतरमा.. पसंद आया रेसिपी..
हैदराबादी चिकन 65 हम भी बनाके खाएंगे और शौहर,बच्चोंको भी खिलाएंगे...
तुम्ही पण चेट्टीनाड चिकन ग्रेव्ही डोसा बनवता... सेम पिंच, मलाही आवडते...
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
ओके हा हैदराबादचा मेन्यू आहे
ओके हा हैदराबादचा मेन्यू आहे काय. इथे मिरजेत प्रत्येक चौकात दोन चार चिकन 65 च्या गाड्या लागतात.
चिकन 65 मूळ मद्रासी मेनू.
चिकन 65 मूळ मद्रासी मेनू. खखोजासा. मात्र अमा, तुमचे हे हैदराबादी ६५ करून पाहणेत येईल. तोवर फुटू डालो मियां.
अब्बीकेअब्बीच चिकन आणायला
अब्बीकेअब्बीच चिकन आणायला पळावं लागेल. Too good recipe.
बनवून पाहीन
बनवून पाहीन
मस्तच आहे.
मस्तच आहे.
मी नक्की बनवणार.
दिल्लीच्या आंध्राभवनला जाम भारी मिळते. खास ते खायला म्हणुन जायचो संध्याकाळी मित्रमंडळींसोबत
वा! वा! चिकन सिक्स्टिफाय एकदम
वा! वा! चिकन सिक्स्टिफाय एकदम फेवरिट! नक्की करुन बघणार.
सँटा क्लारा पॅरेडाईजवाला लबाड आहे म्हणजे! चिकन दम बिर्याणीत घालत नाही हे तुकडे.
चिकन सिक्स्टिफाय स्टार्टर, मिर्चीका सालन आणि गरम गरम कडक, कुर्कुरीत नान आणि मग दम बिर्याणी विथ ग्रेव्ही आणि रायता आणि कच्चा कांदा-लिंबू-मिरची! बरोबर फ्रेश लाईम सोडा सॉल्टेड. पाणी सुटलं तोंडाला.
Heart emoji
Heart emoji
मी ह्या रेसिपीने चिकन ६५ केले
मी ह्या रेसिपीने चिकन ६५ केले पण जेव्हा तेलात दह्याचा सॉस टाकला तेव्हा दही curdle झाले.
मग ते फेकून दिले आणि तेलात फक्त आले लसूण व बाकी मसाले टाकूनच परतले. तेही चांगलेच लागले पण दह्याचे असे का झाले कळले नाही.
क्या तो बी मौसी, बोले तो देख
क्या तो बी मौसी, बोले तो देख केच कैसे कैसे होरा पोरों कु, जब्बार तो मेकू बोलसो जैसे अब्बीच चलो मामा मौसी कने अपुन शाबुद्दीन पैलवान का आटो नई तो जिलानी की होंडा ले कर कु जाते केते
मई बोलू ठेर जा रे इफलास, मेरकू मौसी पुरी आयडिया बोलेसी जैसे तू खाली मुर्गी उठा के ला बाप कुरेशीपेट से बाकी सौदा मसाले मई करतासु, मेरकू पुराईच सिखा डाले मौसी ने, हाऊ.
@आ_रती,
@आ_रती,
तेलात दही टाकल्यावर ते फाटणे हा प्रॉब्लेम सहसा असतोच, त्यामुळे बहुतेक लोक दही मॅरीनेट करताना टाकतात, केमिकली आपल्याला दही गरम करून त्यात सस्पेंडेड असलेले तूप रेसिड्युअल फॉर्म मधून तर्री (तवंग/ कट/ रोगन) ,फॉर्म मध्ये हवे असते, त्यासाठी एक इलाज आहे, तेलात फोडणी तडतडल्यावर दही टाकले की गॅस मध्यम करायचा, दह्याने टेम्प्रेचर्स एकदम कमी होतात ती एकदम खालून जास्त यायला नको म्हणून, हे झाले की दही "परतताना" सिंगल मोशन ठेवायची, क्लॉकवाईज किंवा अँटीक्लॉकवाईज, ती मोशन अन रिदम मोडायला नको, ट्राय करून पाहा फायदा होईल , मला झाला.
मला हा त्रास दोनचारवेळा गुजराती तडकेवाला दही किंवा तिखारी बनवताना आला होता पण वरील पद्धतीने केल्यावर तो सॉल्व्ह झाला होता.
मी दोन वर्शात बनवलेले नाही.
मी दोन वर्शात बनवलेले नाही. हे.