T. V. कोणत्या कंपनीचा घ्यावा?

Submitted by मोक्षू on 27 January, 2019 - 02:11

मला नवीन TV घ्यायचा आहे fully android हवा आहे.. कोणत्या कंपनीचा घ्यावा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सोनी चा बघितला.. 43 inches sufficient वाटतोय.. फक्त कंपनी कोणती चांगली असेल त्यात confusion होतंय.. Btw लिन्क साठी धन्यावाद.. बिपीन चंद्र हर..

Mi ifalcon by tcl, kinwa xiaomi recommend karel. Smart TVs. Cloudwalker ani Kodak sudha changle ahet...

सध्या आमच्याकडे हॉलमध्ये ४३" सॅमसंग तर बेडरुममध्ये ३२" तोशिबाचा टिव्हि आहे. दोन्हिही LCD आहेत. दोघांना केबल लावली असून केबलचे दरमहा ८६० रुपये चार्ज आहे.
बेडरुममधल्या टिव्हीवर ठिपके आणि लाईन्स यायला सुरुवात झाली आहे. चालू अवस्थेत असतानाच तो देऊन नविन टिव्ही घेण्याचा मानस आहे.
आता नविन घेतोयच तर fully android / smart TV घ्यावा असे ठरतेय पण याबद्दल अगदीच ढ असल्याकारणाने माबोकरांची मदत मागत आहे Happy
तर,
नविन TV मध्ये कोणते फिचर्स असणे आवश्यक आहे?
केबल लावायची नसल्यास कोणता पर्याय परवडेबल आहे?
मुलांच्या शाळेतून अभ्यासाचे व्हिडियो तसेच PDF येतात ते मोबाईलवरुन थेट TVवर बघता येतील का?
यासाठी wifi connection घ्यावे लागेल ते किती स्पीडचे घ्यावे?
आम्ही घरात नसतानाही मुले त्यांचा अभ्यास TV वर करु शकतील का? (कम्प्युटरप्रमाणे)
TVला किबोर्ड जोडता येतो का?

आतापुरते बाळबोध प्रश्न बस झाले. Happy तुमच्या प्रतिसादावरुन नविन काही प्रश्न पडले तर पुन्हा विचारेन. Happy

पूर्वीचे tv चांगले 15-20 वर्ष चालायचे. आताचे 3-4 वर्षात खराब होतात आणि दुरुस्त करायला खर्चही भरपूर सांगतात.

कुठलाही स्मार्ट टिव्ही घ्या, त्यात अगदी अ‍ॅप स्टोर असेलही तरी, अव्हेलेबल अ‍ॅप्स लिमिटेड असतात. अर्थात ही माझी माहीती. आता बदललेलं असेलही.
[यावर पर्याय, आपल्याला जो हवा तो स्मार्ट टीवी घ्यावा आणि त्याला फायर टीवी/ अ‍ॅपल टिव्ही इ. घेता येतं. अर्थात, तुम्हाला जे अ‍ॅप्स हवेत ते ऑलरेडी टिव्ही ओएस मध्ये असतील तर प्रश्नच नाही.
(अ‍ॅपल टिव्ही बाय डिफॉल्ट सगळा कंटेट ४के अपस्केल करतं सो त्याची पिक्चर क्वालीटी बाकींपेक्षा उजवी ठरते.)]

किती मोठा घ्यावा? तर तुमचं टिवी व्ह्युईंग अंतर किती त्यावर ठरेल. ६ ते ८ फूट+ अंतर असेल तर ४३+ साईज योग्य.
होत काही नाही पण जो अनुभव यायला हवा मोठ्या स्क्रीन चा तो येत नाही.

४के स्ट्रीम करायचं असेल तर कमीतकमी २५एम्बीपीएस स्पीड हवी. अनलिमिटेड डेटा ही हवाच.
उदा - नेटफ्लिक्स वर ४के मध्ये स्ट्रीम केलं तर ५-७ जीबी प्रती तास डेटा घेतं. हेच प्राईम व्हिडिओ असेल तर ८-१० जिबी घेत.
Rather you just cant control how much of data each app would use when streaming 4k. Better to always opt for unlimited data.

https://www.epson.co.in/homeprojector ही लिंक पहा.

मला वाटतं टीव्हीऐवजी प्रोजेक्टर घेण्याचे खरंच फायदे आहेत.
कोणत्याही खोलीत नेऊन लावू शकतो.
अगदी लोळताना छतावर पाहू शकतो.
मी एका अशा प्रोजेक्टरचं प्रात्यक्षिक पाहिलं होतं. छान दिसतं चित्र. हवं तेवढं मोठं करता येतं.
बघा तुम्ही विचार करून.

सोनी टीव्हीचा अनुभव चांगला आहे.
आणि कोणताही घ्या, पण चीनी टीव्ही / प्रोजेक्टर स्वस्त असला तरी न घेतलेला बरा अशी नम्र विनंती.

.

सोनी ही कंपनी टीव्ही आता नक्की बनवत नसावी..ब्रँड फक्त वापरात आहे.
सोनी घेवूच नका.
सॅमसंग,LG,किंवा कोणताही ही घ्या भारतीय ब्रँड सोडून.
स्मार्ट टीव्ही खूप आहेत बाजारात.
काही कन्फ्युज होण्या सारखे नाही.
चीन नी नवीनच टीव्ही चा शोध लावला आहे ते tech जगात एकमेव आहे.
ते येईल थोड्या दिवसात बाजारात.

सगळ्यांना धन्यवाद. सगळ्या पर्यायांवर विचार सुरू आहे. नवऱ्याचे म्हणणे आहे की आता ठरवून ठेवू आणि दिवाळीत खरेदी करू कारण ऑफर्स येतील तेव्हा.

आमच्याकडे हा घेतला सोनी ब्राविया ॲड्रऑईड वगैरे.. ४३ ईंची ५४ हजाराला पडला.. ईन्स्टॉलमेण्टवर.. प्लीज कोणी आता फसवलं तुम्हाला म्हणू नका. आम्ही ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेताना बार्गेनिंग वगैरे करत नाही. बाकी छान चालू आहे. नुकताच घेतलाय तसेच अजून हाईस्पीड नेट आले नाहीये ईथे. त्यामुळे सध्या काय कसाय अनुभव हे सांगू शकत नाही. तसेच मलाही टीव्हीतले कमीच कळते. आवडही कमीच आहे. एक क्रिकेट मॅच सोडून बाकी काही बघण्यात मला रस नसतो. हा घरच्यांसाठी घेतलाय. त्यांना आणखी मोठा घ्यायचा होता. हॉल मोठा आहे ते पाहता ६० ईंचीपर्यंत जायला हरकत नव्हती. पण मीच भांडून साईज कमी करवली. कारण पुढे मलाच ओव्हरटाईम करत ते ईन्स्टॉलमेंट भरावे लागले असते.

1601834319325.jpg

आमच्याकडे हा घेतला सोनी ब्राविया ॲड्रऑईड वगैरे.. ४३ ईंची ५४ हजाराला पडला.. ईन्स्टॉलमेण्टवर.. प्लीज कोणी आता फसवलं तुम्हाला म्हणू नका. आम्ही ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेताना बार्गेनिंग वगैरे करत नाही. बाकी छान चालू आहे. नुकताच घेतलाय तसेच अजून हाईस्पीड नेट आले नाहीये ईथे. त्यामुळे सध्या काय कसाय अनुभव हे सांगू शकत नाही. तसेच मलाही टीव्हीतले कमीच कळते. आवडही कमीच आहे. एक क्रिकेट मॅच सोडून बाकी काही बघण्यात मला रस नसतो. हा घरच्यांसाठी घेतलाय. त्यांना आणखी मोठा घ्यायचा होता. हॉल मोठा आहे ते पाहता ६० ईंचीपर्यंत जायला हरकत नव्हती. पण मीच भांडून साईज कमी करवली. कारण पुढे मलाच ओव्हरटाईम करत ते ईन्स्टॉलमेंट भरावे लागले असते.

1601834319325.jpg

नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार सुरू आहे.

सध्या सोनी एलसीडी टीव्ही आहे घरी (११ वर्षे). त्याआधी एलजी होता. तो पण जवळ जवळ १८ वर्षे वापरात होता. आता पण ज्यांना देऊन टाकला ते वापरत आहेत. दोन्ही कंपन्यांचा चांगला अनुभव आहे. एकदाही दुरुस्ती करावी लागली नाही.
सॅमसंग शक्यतो नको आहे. खरेदीसाठी कंपनीचा अनुभव चांगला नाही. कस्टमर केअर सर्विस बकवास आहे.

एलजीचा नॅनो सेल टिव्ही कसा आहे?

स्मार्ट टीव्ही, इंटरनेट कनेक्शन नसेल तर जुन्या नॉन स्मार्ट टीव्ही सारखा वापरता येतो का केबल कनेक्शन वापरून?

Android tv आणि Google tv मध्ये कोणता चांगला आहे?

स्मार्ट टीव्ही, इंटरनेट कनेक्शन नसेल तर जुन्या नॉन स्मार्ट टीव्ही सारखा वापरता येतो का केबल कनेक्शन वापरून? >> हो.
सोनी सॉफ्टवेअर इंटरफेस आवडत नाही. तसाच सॅमसंग, व्हिजीओ यांचा ही बकवासच आहे. पण कुठलाही ४के स्वस्त टीव्ही घेऊन रोकू, अ‍ॅमेझॉन फायरस्टिक (फारच लाड करायचे असतील तर अ‍ॅपल टीव्ही.. परत, फरक शून्य. पैसे वारेमाप) वापरुन टीव्हीचे नेटीव्ह सॉफ्टवेअर बायपास करुन आपल्याला आवडते तो इंटरफेस वापरावा या मताचा आहे. अमेरिकेत तरी सिमिलर कॉन्फिगरेशनच्या क्वालिटी मध्ये सोनी/ सॅमसंग ते टीसीएल हायसेंन्स जवळजवळ काहीच फरक नाही. किमतींत मात्र बराच फरक आहे. टीव्ही कमॉडिटी झाली आहे. काही वर्षे यात काम केल्यावर फीचर कॉम्प्रोमाईज करू नये पण ती मिळत असतील तर स्वस्त आहे ते घ्यावे असे मत झाले आहे.

चार वर्षांपूर्वी घेतला तेव्हा सोनी, सॅमसंग, एलजी आणि अजुन एक दोन एकाच वेळी तोच व्हिडीओ लावून पिक्चर क्वालिटी सोनीचीच चांगली वाटली म्हणुन सोनी घेतला.

मला वाटायचे सगळे अँड्रॉईड टीव्ही सॉफ्टवेअर इंटरफेस सारखेच असेल, थोडे फार कस्टमायझेशन वगळता. फार फरक असतो का?

आता जुन्या नॉन स्मार्ट टीव्हीसाठी गुगल क्रोमकास्ट घेतलं. फोन वरून ऑपरेट करायला सोपं वाटतंय स्मार्ट टीव्ही+ त्याचा रिमोट या तुलनेत. ( फक्त ते व्हिडीओ मागे पुढे करताना स्क्रोल बार पेक्षा बटणं बरी असं मात्र वाटलं सुरवातीला.)

Please check whether the particular model number is discontinued by company?
LG NanoCell most of the models are discontinued from production. https://www.lg.com/us/tvs/discontinued

Same is the case with other Samsung models too.
Just Google it before you make any actual purchases.

आताच्या २४" टीव्हीला वाइफाइ नाही. पण कोणताही वाइफाईवाला घेतला तर मोबाईलातले पीडीएफ पुस्तक तिथे वाचता येईल का?

हो. मोबाईलचा स्क्रीन कास्ट (मिरर) करून.
जसं फोन वर दिसतंय तसं टीव्हीवर दिसेल.
फोन उभा धरला तर छोटं दिसेल, लांबून बहुतेक वाचता येणार नाही.
आडवा धरला तर मोठं दिसेल लांबून वाचता येईल, पान लौकर स्क्रोल करावे लागेल.

टीव्ही घेताना दोनतीन च गोष्टी बघायच्या आहेत.
1) पिक्चर क्वालिटी कशी आहे.
२) आवाज ची क्वालिटी किती उत्तम आहे का? उच्च आवाज म्हणजे चांगला आवाज नाही.

३) आणि किंमत.
बाकी सर्व टीव्ही एकच tech वर चालतात.
टीव्ही चे लाईफ जवळ पास सर्व कंपन्यांच्या टीव्ही चे एकच असते
टीव्ही सहसा बिघडत नाहीत पण जेव्हा बिघडतात तेव्हा त्याचं रिपेअर खर्च इतका असतो की नवीन टीव्ही घेणे च व्यवहारिक असते.
आज काल सर्व कंपन्यांची हीच buissnes
ट्रिक आहे.

आपण निर्मित केलेल्या वस्तू वर बाकी कोणी पैसे कमवू नये असा स्वार्थी विचार च ह्या मागे असावा.
Repairing chi दुकान त्या मुळे आता खूप कमी दिसतात.
गाडी लं रंग देण्याची गॅरेज जवळ जवळ नष्ट झाली आहेत

माझे मत.

साधा स्वस्त टीव्ही (मठ्ठ वाला. स्मार्ट नाही) घेऊन, त्याला मॉनिटरसारखा वापरून एक मिनीपीसी जोडावा. (मला एक ६x६x३ इंच साईजचा कोअर आय५, ८ जीबी रॅम वाला विथ वायफाय, व रिमोट कीबोर्ड्/माऊस ६ हजारात मिळाला.) सदर पीसी एनिडेस्क किंवा टीमव्ह्यूअर सारखे अ‍ॅप वापरून मोबाईलवरूनही कंट्रोल करता येतो. वाचलेल्या पैशातून एक झकास होम थिएटर साउंड सिस्टीम घेऊन टाकावी.

फायदे : सर्व प्रकारच्या एक्स्ट्रा जाहिराती पहाण्यापासून मुक्ती. पायरसी करण्यास सोपे.

अवांतर नोट : एक आयडीबीआय नावाची डोक्यावर पडलेली, दुर्दैवाने माझे प्रायमरी अकाऊंट असलेली बँक आहे. याचे अ‍ॅप बरेच दिवस मला नुसताच "मालिशियस अ‍ॅप डिटेक्टेड" एवढा मेसेज देऊन बंद पडत होते. बराच डोक्याला ताप झाला.

नशीबाने परवाच एक अपडेट आले, त्यात त्यांनी "एनिडेस्क डिटेक्टेड" अन पुढे, अ) हे तुम्हाला कुणीतरी इन्स्टॉल करायला सांगितले, ब) मी स्वतः इन्स्टॉल केले असून ऑफिसच्या कामासाठी वापरतो. असे दोन ऑप्शन देऊन कुणी तुमचा फोन रिमोट कंट्रोल करीत तर नाहिये ना, याची खबरदारी घेण्याचा स्तुत्य प्रयत्न केल्याचे सापडले.

तेव्हा एनिडेस्क, टीमव्ह्यूअर, रूट करणे हे प्रकार करताना त्या फोनवरील तुमच्या बँकेच्या अ‍ॅपला कस्लं पथ्य आहे ते पाहून घ्या आधी.

फोन उभा धरला तर छोटं दिसेल, लांबून बहुतेक वाचता येणार नाही.
आडवा धरला तर मोठं दिसेल लांबून वाचता येईल, पान लौकर स्क्रोल करावे लागेल.
<<
मी एलीडी स्क्रीन वर सांगितल्य प्रमाणे मॉनिटर म्हणून वापरतो.
त्याचा वॉल माउंट १८०° फिरू शकतो. पीडीएफ, कॉमिक्स वाचण्यासाठी मी स्क्रीन ओरिएंटेशन फिरवून वापरतो.

धन्यवाद सर्वांना.
सध्याचा टिव्ही स्मार्ट नसला तरीही जिओ फायबर सेट टॉप बॉक्स कृपेने थोडा स्मार्ट झाला आहे. बरेचसे ओटीटी बघता येतात.
पण जरा मोठ्या स्क्रीन साइजचा टिव्ही घ्यावा आणि आता घेतच आहोत तर स्मार्ट टीव्ही घ्यावा असा विचार आहे.
एलजी की सोनी हाच प्रश्न आहे. सोनी एचडी फायनल केला होता पण दुकानदाराने एलजीचे (नॅनो सेल)कॏतुक केल्याने आणि आधीचा एलजीचा अनुभव चांगला असल्याने परत प्रश्न पडला.
कोणाला काही अनुभव आहे का?
Android tv आणि Google tv मध्ये कोणता चांगला आहे?

Led tvचे काही प्रॉब्लेम diy सोपे आणि स्वस्त असतात.
१) पूर्ण बंद. - बऱ्याचदा SMPS सर्कीट भागातला वीस रुपयांचा ट्रान्झीस्टर उडालेला असतो. ( रिपेरवाले ते आख्खे युनिट घेऊन जातात व दुसरे लावतात)
२) पिक्चर/ओडिओ खराब होणे-
रिबन पट्टीचे टोक काढून साफसूफ करून लावले की ओके होते.
३) आवाज येत नाही -
वरील प्रमाणे रिबन पट्टीचे टोक. . . किंवा स्पीकर गेलेला असू शकतो.
यूट्यूबवरचे विडिओ पाहून दोन चार गोष्टी करून पाहाव्यात मगच टाकावा. पूर्ण स्क्रीनचा जाणे हे प्रत्येक वेळी नसते.

पूर्वीच्या मोठ्या सीआरटी टीवी मध्ये सोळा हजार वोल्टसचा धोका असे तो आताच्या एलीडीत नसतो. आजुबाजूला कित्येक एंजिनिअर मुले असतात त्यांना विचारावे. एखादा हौशी करू शकतो. घाबरू नये.

LG नॅनोसेल ५०" आणी सॅमसंग क्रिस्टल ४K UHD ५०" पैकी कोणता टीव्ही घ्यावा?

कोणी सेम मॉडेल वापरत असतील तर आपले review सांगा.

LG कि सॅमसंग यात confusion आहे