आज हैदराबाद प्रकरणातील आरोपीचं encounter करण्यात आलं.
अर्थातच हे सगळे प्रकरण घडवून आणण्यात आलं हे न समजण्याारखे आपण कोणीही दूधखूळे नाही.
या encounter नंतर समाजाच्या विविध स्तरांवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
उच्च स्तरांवरील काही प्रतिक्रया माझ्या वाचनात आल्या.
त्यात काही intelectual मानले जाणारे प्रतिथयश नट , राजकारणी, लेखक यांचा समावेश आहे.
बऱ्याच so called विचारवंतांनी समाज फार भयानक दिशेने जाऊ लागलाय अशी चिंता व्यक्त केलीय.
माझ्या मते मी त्यांना उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न करते आहे.
यातील अनेक विचारवंत गेली कित्येक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या हिडीस घटनांनी मुळीच विचलित झालेले दिसत नाहीत. स्वतंत्र भारतात गेले ७५ हून अधिक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या घटनांनी समाजाचा लोप होत नाही असे त्यांचे मत आहे वाटते.त्या जश्या काही दैनंदिन जीवनाचा भाग आहेत जणू.रोज सकाळच्या चहासोबत चावायला मसाला.
पण एक दिवस या ४ पाशवी गुन्हेगारांना रक्तरंजित शासन काय होते आणि या अचानक समाज उतरणीला लागतो की काय???
हे encounter नियमबाह्य असले तरी चूक नाही.केवळ अपवाद आहे.
काही वेळा झोपलेल्या समाजाला जागे करायला अश्या अपवादांची चपराक लावायचाच लागते.सगळ्या बाजूंनी कोंडी झाल्यावर कायद्याच्या रक्षकांनी न्याय व्यवस्थेवर काढलेला हा desperate तोडगा होता.त्यांची सालटी काढायला हे विचारवंत लांडगे जमले. मग यांच्यात आणि त्या अपराध्यांमध्ये फरक तरी काय?
बाहुबली मध्ये स्त्रीलोळूप सेनापतीला शासन होते तो प्रसंग हे सगळे विचारवंत भारावून जाऊन पाहतात, मग सत्यात उतरल्यावर इतका तळतळाट कश्यासाठी?
याला hippocracy म्हणतात.
माझ्या मते हे सगळे विचारवंत केवळ भी्माचार्य आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण मान खाली घालून पाहणारे.
नको तिथे नियमांची आणि morality chi फुटपट्टी लावणारे षंढ विचारवंत.
अरे त्या निष्पाप मुलींच्या वेदनांची जरा तरी तमा बाळगा.
ती तुमची बहीण, मुलगी, आई , मैत्रीण ,बायको असती तर morality सुचली असती का रे?
केवळ संविधानाने वाटेल तशी मते प्रदर्शित करण्याचा हक्क दिले आहेत म्हणून जीभ मोकाट सोडायची.
घरी बसून वाहत्या गंगेत हात धुणे सोपे असते.
बाकी तर समाज उतरणीला लागलाच आहे या so called विचारवंतांचा मते.पण तो नेमका कोणामुळे लागला आहे त्याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
ईश्वर त्या निष्पाप जीवाला सद.गती देवो.
For we don't deserve you, we are Hippocrates!!!
आम्हाला माफ कर.
पुढील आदेशांपर्यंत
पुढील आदेशांपर्यंत निर्भयाच्या दोषींची फाशी टळली
इथल्या सर्व ब्लीडिंग हार्ट लिबरलांचे अभिनंदन.
निर्भया चे गुन्हेगार पुढे
निर्भया चे गुन्हेगार पुढे निर्दोष सुटले तर आश्चर्य वाटून घेवू नका.
हा भारत आहे इथे काही ही घडू शकत.
भारताची कचवाछाप न्यायव्यवस्था
भारताची कचवाछाप न्यायव्यवस्था व त्यातील पळवाटा पाहून, हैद्राबाद पोलिसांनी केलेले एनकाऊटंर हा पिडितेसाठी योग्य न्याय वाटतो. क्युरेटीव पिटीशन, मर्सी पिटीशन, दया याचिका, शांती याचिका ब्ला ब्ला ब्ला !
काँग्रेसने नथुराम ते कसाब
काँग्रेसने नथुराम ते कसाब सर्वाना लटकावले होते.
भाजपाने आदर्श घ्यावा
जो पर्यंत एखाद्या गोष्टीचा
जो पर्यंत एखाद्या गोष्टीचा त्रास स्वतःला होत नाही तो पर्यंत उपदेश करणे सोपे असते. निर्भयाचे आई वडील रोज मरणाचे जीवन जगत आहेत.
<< निर्भया चे गुन्हेगार पुढे
<< निर्भया चे गुन्हेगार पुढे निर्दोष सुटले तर आश्चर्य वाटून घेवू नका.
हा भारत आहे इथे काही ही घडू शकत.>>
----- ते निर्दोष सुटत नाहीत.... काही आठवडे...
<< निर्भयाचे आई वडील रोज मरणाचे जीवन जगत आहेत. >>
------ सहमत....
आरोपींना शिक्षा झाली... तरी त्यांच्या यातनांत फरक पडणार नाही.
कितीही भयानाक शिक्षा दिली तरी या व अशा घटनेत पिडीताला न्याय मिळतच नाही... मारला गेलेला जिव परत येत नाही.
तर.....
तर.....
हाथरस प्रकरणातील आरोपी अटकेत आहेत,
बलरामपूर चे आरोपी हातात आहेत
या सगळ्यांचा फैसला हैद्राबाद प्रमाणेच लावून टाकावा असे कोणाकोणाला वाटते?
हाथरस ची केस थोडी वेगळी आहे,
पीडितेने कोणी बलात्कार केला ते सांगितले, पण बलात्कारानंतर 10 दिवसांनी फॉरेन्सिक टेस्ट केल्याने DNA एव्हीडेन्स मिळाला नाहीये,
नंतर सरकार ने रेपच झाला नाही असे जाहीर केलंय आणि तिचा मृतदेह रातोरात जाळून नष्ट करून टाकलाय.
थोडक्यात आरोपींच्या विरुद्ध पीडितेच्या स्टेटमेंट शिवाय थेट पुरावा आत्ता तरी नाही ( म्हणजे नसावा, पुढे मागे नवीन काही उजेडात आले तर माहीत नाही) म्हणजे यदाकदाचित खटला उभा राहिला तरी आरोपी सुटायची शक्यता आहे. म्हणजे आधी बराच काळ बेल वर बाहेर राहतील, 7 8 वर्षात निर्दोष म्हणून मोकळे होवून ते लग्न करतील ,मुले वाढवतील, कदाचित असाच गुन्हा पुन्हा करतील, मुलांना सुद्धा असेच बाळकडू पाजतील.
मग पोलिसांनी कायदा हातात घेऊन ही कीड संपवली तर बरे, असे किती जणांना वाटते?
* (बलरामपूर स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे, पुरेसा परिस्थितीजन्य पुरावा आहे त्यामुळे त्यात गुन्हेगाराला शिक्षा होईलच, म्हणून ती केस डिस्कशन साठी घेतली नाहीये)
मग पोलिसांनी कायदा हातात घेऊन
मग पोलिसांनी कायदा हातात घेऊन ही कीड संपवली तर बरे, असे किती जणांना वाटते? >> या केस मध्ये आतापर्यंत पोलिसांनी बजावलेली भूमिका कशी वाटते? त्यावरून ते न्याय प्रिय आहेत, एन्काऊंटरचा गैर वापर करणार नाहीत याची खात्री वाटते का?
दोषींना शिक्षा तर झालीच पाहिजे. न्याय प्रणाली (शासन, पोलीस, प्रशासन) खिळखिळी झाली आहे. ती मजबूत व्हायला हवी. कशी? मी सांगू नाही शकत. पण एन्काऊंटरने नाही होणार, उलट अजून खिळखिळी होईल.
एन्काऊंटर फार सोपा मृत्यू
एन्काऊंटर फार सोपा मृत्यू वाटतो अश्या क्रूरतेच्या गुन्ह्याला.
पोलिसांनी कायदा हातात घेऊन ही
पोलिसांनी कायदा हातात घेऊन ही कीड संपवली तर बरे, असे किती जणांना वाटते?>>मला वाटते.
राज्यातील सत्ताधीश चौकशी
राज्यातील सत्ताधीश चौकशी मध्ये अडथळे आणतात , साक्षीदारांना फितवतात !
कधी कधी काही महिला खोट्या केस सुद्धा करतात . त्यामुळे राज्य पोलिसांच्या चौकशी वर अवलंबून न राहता प्रत्येक केस चा न्यायालय मार्फत चौकशी करून गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपींना भर चौकात एन्काऊंटर केला गेला पाहिजे !
या गुन्ह्यात तालिबानी शिक्षाच योग्य आहे !
या साठी सर्वात अगोदर लोकसभेत कायदा पास करून घेतला पाहिजे .
वटवृक्ष ताई,
वटवृक्ष ताई,
कृपया धाग्याचा संदर्भ लक्षात घेऊन प्रतिसाद द्या,
हैद्राबाद प्रकरणी संशयितांना मारले गेलंय,
संशयित = गुन्हा सिद्ध न झालेले.
आत्ता या क्षणी तरी संदीप, रामू, लवकुश, रवी हे संशयित/आरोपी आहेत , गुन्हेगार नाहीत.
त्यांचा एन्काऊंटर करावा का असे विचारत आहे मी.
त्यामुळे गुन्हा सिद्ध झालेल्या लोकांना भर चौकात फाशी वगैरे या धाग्याशी संबंधित नाही आहे.
धागा भरकटवण्याचा प्रयत्न कृपया करू नका
मग , हाथ रस आणि बलराम पूर या
मग , हाथ रस आणि बलराम पूर या दोन्ही ठिकाणच्या आरोपींचा होवू द्या की एन्काऊंटर !
आपल्याला बोलायला काय जातंय .
एन्काऊंटर चे माहीत नाही. पण
एन्काऊंटर चे माहीत नाही. पण मध्यंतरी काय्यप्पावर एक अरेबियातला व्हिडीओ आला होता. त्यात त्यांनी ( म्हणजे तिथल्या पोलीसांनी ) त्या गुन्हेगाराला भर चौकात लहान- मोठे, बाया-पुरुष यांच्या समोर गोळ्या घातल्या आणी मग फासावर लटकवले, म्हणजे टांगले. व्हिडीओ थरारक होता. मी डिलीट केला कारण मुलगी लहान आहे. उगाच १० प्रश्न विचारेल.
अरेबिया, दुबई इथले कायदे कडक आहेत. ते शरीयत नुसार आहेत का ते माहीत नाही, कारण पूर्वी गोवा वगैरे ठिकाणी पण पोर्तुगिजांनी असेच कायदे केले होते, त्यामुळे चोर्या वगैरे लांबची गोष्ट.
जवळ असलेला पिढीजात पैसा, माजोरडेपणा, स्त्री ही एक उपभोग्य वस्तु समजणे आणी वंशाच्या दिवांचे घाणेरडे लाड याने हे सैतान डोक्यावर चढतात.
आमच्याच एका नात्यात , जो मुलगा आता ७ वर्षाचा आहे, त्याला त्याची आजी, "अरे तू पुरुष आहेस " हे येता जाता बिंबवत असते. ऐकुन वीट आलाय.
बलात्कारापेक्षा मोठा गुन्हा
बलात्कारापेक्षा मोठा गुन्हा पोलीस, प्रशासन आणि ते ज्यांना उत्तरदायी आहेत त्या राज्य सरकारने केला आहे. त्याच्या विरुद्ध न्यायालयाचे ताशेरे सोडून काय कारवाई होऊ शकेल? बहुतेक काहीच नाही.
बलात्कार्याना मारा किंवा नंतर परस्पर जाळा बलात्कार कमी होत नाहीयेत. या केस मध्ये आरोपी नक्कीच सुटणार आहेत, आणि राजरोस जीवन जगणार आहेत. ते राजरोस मान वर करून जगणं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मुश्कील होईल आणि पिडीतीचे कुटुंब सुखाने ( म्हणजे त्रास विरहित) जीवन जगातील असा काही न्याय शक्य असेल तर तो करा.
आमच्याच एका नात्यात , जो
जो मुलगा आता ७ वर्षाचा आहे, त्याला त्याची आजी, "अरे तू पुरुष आहेस " हे येता जाता बिंबवत असते. >> आपला समाज कधी सुधारणार?
https://www.tv9marathi.com
https://www.tv9marathi.com/videos/gahunje-rape-and-murder-case-verdict
<< बलात्कारापेक्षा मोठा
<< बलात्कारापेक्षा मोठा गुन्हा पोलीस, प्रशासन आणि ते ज्यांना उत्तरदायी आहेत त्या राज्य सरकारने केला आहे. त्याच्या विरुद्ध न्यायालयाचे ताशेरे सोडून काय कारवाई होऊ शकेल? बहुतेक काहीच नाही.>>
------ राज्य सरकार, स्थानिक प्रशासन यांनी बलात्कार आणि खुनाचा गुन्ह्य न्यायालयात सिद्ध होणार नाही याची संपूर्ण प्रमाणात काळजी घेतली आहे, पद्धतशीर पणे पुरावे नष्ट्र केले आहे.
सुरवातीपासूनच राज्यसरकार तसेच केंद्रातले सरकार यांना हे प्रकरणा झाकायचे होते
आता परत मागे जाता येणार नाही. कोर्टात आरोप सिद्ध होणे शक्य नाही.
बलात्काराच्या घटना सर्वत्रच घडत असतात, आणि प्रत्येक घटना निषेधार्ह आहेच. बळी पडलेल्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे हे ज्या सरकारचे परम कर्त्यव्य आहे तेच सरकार अपराध्यांना पाठिशी घालत आहे.
<< जो मुलगा आता ७ वर्षाचा आहे
<< जो मुलगा आता ७ वर्षाचा आहे, त्याला त्याची आजी, "अरे तू पुरुष आहेस " हे येता जाता बिंबवत असते. >> आपला समाज कधी सुधारणार? >>
------ सहमत.... असे विचार घरात पोसले जात असतील तर बाब्याच्या मनावर वर्चस्वाच्या कल्पना किती ठळक पणे कोरल्या जात असतील?
https://lokmat.news18.com
https://lokmat.news18.com/crime/big-punishment-from-court-for-raping-a-y...
हाथरस, 23 सप्टेंबर : हाथरसमध्ये (Uttar pradesh Hathras News) दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार (Minor Rape and Murder) आणि त्यानंतर हत्या करणाऱ्या आरोपींना कोर्टाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय हाथरस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पॉक्सो कोर्टाने एका आरोपीवर 50 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. (Big punishment from court for raping a young girl and burning her alive )
मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये आरोपीने अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला होता. यानंतर त्याने तिच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळलं होतं. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला रुग्णालयात पीडितेकडून दिलेल्या जबाबानुसार कोर्टात आरोपीला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली. महत्त्वाचं म्हणजे सिकंदराराऊ पोलिसांनी 16 एप्रिल 2019 रोजी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठविण्यात आलं होतं.
=========
युपी इलेक्शन लागले वाटतं
https://www.livemint.com/news
https://www.livemint.com/news/india/prajwal-revanna-sexual-abuse-case-ka...
अशी SIT वगैरे बनवून चौकशी करणे याबद्दल काय मत आहे एन्काऊंटर समर्थकांचे?
56 इंच छाताडावर नाचून रेवन्ना
56 इंच छाताडावर नाचून रेवन्ना पळाला की, आता SIT चा काय फायदा?
56 इंच छाताडावर नाचून रेवन्ना
56 इंच छाताडावर नाचून रेवन्ना पळाला की, आता SIT चा काय फायदा?
भ्रमर
भ्रमर
आमच्या इकडे गावी कोकणात मामू ची आजी अखेर मेलीच. तिला मूठमाती देऊन आम्ही सगळे गप्पा छाटत बसलो होतो. कुणी तरी बोलला.
"मामू ,आजीला मुंबईला जे जे मध्ये घेऊन गेलो असतो तर..."
"कशाला? ती काय थोडीच वाचणार होती?" मामू निरीच्छपणे बोल्ला.
"तसं नाय रे, पण कशी मेली, कशानं मेली, हे सविस्तर तरी समजलं असतं."
म्हातारी मेल्याचे दुःख नाही
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काल सोकावतो आहे.
एक्ट्रा जुडीशिअल किलिंग.
First they came for the रेपिस्ट
And I did not speak out
Because I was not a रेपिस्ट
First they came for the Communists
And I did not speak out
Because I was not a Communist
Then they came for the Socialists
And I did not speak out
Because I was not a Socialist
Then they came for the trade unionists
And I did not speak out
Because I was not a trade unionist
Then they came for the Jews
And I did not speak out
Because I was not a Jew
Then they came for me
And there was no one left
To speak out for me
Pages