भरली गिलके/घोसाळे

Submitted by जेम्स बॉन्ड on 30 September, 2020 - 06:19
भरले घोसाळे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मस्तपैकी ताजे गिलके ३ ते ४,
२. शेंगदाणे भाजलेले १ लहान वाटी,
३. लसुण ४/५ पाकळ्या,
४. जिरे १/२ लहान चमचा (मिश्रणाच्या डब्यातला)
५. मिरची पुड १ टेबल स्पुन (तिखट आवडत असल्यास २ टेस्पु)
६. हळद १/२ लहान चमचा (मि.ड.) ,
७. मीठे चवीपुरतं,
८. तेल (आवडीनुसार).

क्रमवार पाककृती: 

तसं बघायला गेलं तर कोकणात काय नी खानदेशात काय गिलकी/दोडकी (घोसाळे/शिराळे) हा जरा बनविण्याच्या बाबतीत सोपा आणी रिच प्रकार असतो. सकाळी लवकर जावुन बाजारातुन आणलेले ताजे ताजे गिलके बनवणे हा एक वेगळाच आनंद असतो.
तर सादर आहे, भरल्या गिलक्यांची (घोसाळे) पाककृती.

गिलके स्वच्छ धुवुन त्याचे दोन्ही टोक साधारण अर्धा इंच कापुन टाकवेत. मग त्याच्या तीन तीन इंचाच्या फोडी करुन प्रत्येक फोडीवर उभी चीर द्यावी.

IMG-20200930-WA0016.jpg

भाजलेले शेंगदाणे सालं काढुन, त्यात लसुण पाकळ्या, जिरे, मिरची पुड व चवीपुरते मीठ टाकुन मिक्सरवर रवाळ ( सौ. मलई बर्फी) वाटुन घ्यावे.

IMG-20200930-WA0028.jpg

हे रवाळ वाटलेले मिश्रण गिलक्यांच्या चीर दिलेल्या फोडींमधे हलक्या हाताने व्यवस्थितरित्या दाबुन भरावे.

IMG-20200930-WA0027.jpg

गॅस पेटवावा (ही अत्यंत महत्वाची स्टेप आहे.) मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवुन ह्या मिश्रण भरलेल्या फोडी नीट रचाव्यात. प्रत्येक फोडीवर साधारण एकास अर्धा टे. स्पु. ह्या प्रमाणात तेल सोडावे.

IMG-20200930-WA0015.jpg

त्यावर झाकण ठेवुन ४ ते ५ मिनीट शिजु द्यावे. नंतर त्या फोडी पलटवुन पुन्हा ३ ते ४ मिनीट शिजु द्याव्यात.

IMG-20200930-WA0017.jpg
थोडी शंका आल्यास मधे मधे चेक करत रहावे जेणेकरुन फोडी करपु नयेत.
भरल्या गिलक्यांची कोरडी भाजी तयार आहे. पेशंस असल्यास निगुतीने प्लेटींग करावे, फोटो काढावे.

IMG-20200930-WA0018.jpgIMG-20200930-WA0020.jpgIMG-20200930-WA0024.jpg

मग ही भाजी चपाती, भाकरी, खिचडी किंवा वरणभातासोबत तोंडीलावणी म्हणुन खावी.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. अर्धा चमचा तेल टाकण्याच्या स्टेपमधे फोडींवर जास्तीचे मिश्रण दिसत आहे ते उरलेले मिश्रण वाया जावु नये म्हणुन जबरस्तीने टाकलेय. गिलक्याच्या फोडी मारुन मुटकुनही यापेक्षा जास्त "आ" वासत नव्हत्या.
२. ४/५ मिनीट शिजवण्याच्या स्टेपमधे पाणी सुटल्याने तसेच तेल मिक्स झाल्याने मिश्रण फोडींच्या बाजुला पसरेल, चिंता करु नये ते मिश्रणही इतके चटपटीत लागते की बस्स.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

माझी आवडती भाजी Happy
फक्त मी गोल काप करुन नंतर वरुन कूट शिवरते

एक असेल तर दोडका आणि अनेक असतील तर दोडकी.. >> डोकं आपटून घ्यायची स्माईली द्या हो वेमा Sad

सॉलिड मस्त दिसतेय ही रेसिपी. फोटो बघून तोंडाला पाणी सुटल.

कोकणात पारोसे पण म्हणतात घोसाळ्याला. त्यामुळे माझे बाबा पारोसे (अनेकवचन पारोसी) , गुजराथमधे मोठी झालेली आई गिलके (अनेकवचन गिलकी) आणि डोंबिवलीतली मी घोसाळे (अनेकवचन घोसाळी) म्हणते Lol

अशीच भरून भेंडी पण करतात... Same steps.
शिजताना एक चमचा दही टाकले की आणि मस्त लागते. वाफेवर शिजवायचे भरली भेंडी. शक्यतो कोवळी भेंडी निवडून घेणे.

अशीच भरून भेंडी पण करतात... Same steps.
शिजताना एक चमचा दही टाकले की आणि मस्त लागते. वाफेवर शिजवायचे भरली भेंडी. शक्यतो कोवळी भेंडी निवडून घेणे.

मस्तच!

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं

images.jpg

Sponge gourd
Loofah gourd

ह्या नावाने बॉडी स्क्रब म्हणून नेटवर विकायला ठेवलेत

अरे वा.. ब्लॅककॅट तुम्ही तर संदर्भासहीत स्पष्टीकरण च दिलंत.. बहिणाबाईंची कवीता समरसुन जीवन जगलेल्या मनुष्यप्राण्याची प्रचिती देते.

मस्तच ब्लॅककॅट.

कविता पूर्ण आठवत नव्हती पण हि अतिशय आवडती कविता आणि कालपासून तिचं पहिले आणि शेवटचे कडवे सारखं तोंडात येत होतं कारण रत्नागिरीजवळची सुगरण पक्षांची घरटी आणि माहिती एबीपी वर दाखवत होते. आज गिलक्याच्या संदर्भाने हि कविता पूर्ण वाचली.

एकदम मस्त! नक्की करून बघणार. अशा पद्धतीने केल्यावर प्रत्येक वेळेला घोसाळी आणली तरी ही कुठली भाजी आहे असा चेहरा करणारी मेंबरं नक्की खातील अशी आशा वाटते Happy

रेसिपी खूपच छान , आणि कविता ही आवडती.
अप्रतिम खमंग फोटो , मेनु धाग्यावर पाहिला होता. बरं केलत लिहून... Happy

Pages