Submitted by बिथोवन on 15 September, 2020 - 00:54
तुम्ही सचिन सुप्रिया या जोडगोळीचा "तिरुमला ऑईल" ही जाहिरात पाहिली असेल. ही जाहिरात पाहिल्यानंतर मला पडलेले प्रश्न.
(१) "मला आवडणारे पदार्थ मी नेहमीच खातो" असे म्हणताना सचिन त्याची तुंदीलतनु आतमध्ये खेचतो असे वाटते का?
(२) सचिनचे सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ असा टी शर्ट घातला असावा का? (कारण तो खरोखर फिट्ट असेल तर शर्ट आतमध्ये खोचलेला दाखवला असता असे वाटते.)
(३) सुप्रिया ज्या पद्धतीने "तिरुमला ऑईल" असे कॅन दाखवत ठासून म्हणते तेंव्हा ती एखादी इंजिन ऑईलची जाहिरात करते असे वाटते का?
(४) सुप्रियाने "तिरुमला ऑईल" असे न म्हणता "तिरुमला तेल" असे म्हंटल्यास योग्य वाटेल काय?
(५) ती दोघं पिळगावकर असल्याने आपल्याला पिळत आहेत असे वाटते का?
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
.....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://youtu.be/kVN0U38dDdI
https://youtu.be/kVN0U38dDdI
थोडा चेंज म्हणून हे ऐका...
सौदामिनी आधी कुंकू लाssव..!!
मायबोली नावाची एक साईट आहे.
मायबोली नावाची एक साईट आहे. त्यावर ऋन्मेष म्हणून एक आयडी सक्रिय आहे. तर त्याच्या धाग्यांना म्हणावे तेव्हडे प्रतिसाद मिळत न्हवते. तो हताश होऊन एका दगडावर बसला होता. ते माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं लडके का करिअर खराब हो जायेगा. मग मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो तू रोज सकाळी पाच वाजता माझ्या घरी येत जा. महिनाभर तुला काही फरक नाही पडला तर मग तू मायबोलीला रामराम ठोक. मी रोज सकाळी चार वाजता उठून अंघोळ करून त्याची वाट बघत बसायचो. तो न चुकता पाच वाजता शिकवणीला माझ्या घरी यायचा आणि माझ्या मार्गदर्शनाखाली बघता बघता त्याचे धागे शतकी प्रतिसाद खेचू लागले आणि आता बघा रेस्ट ईज हिस्ट्री.
बोकलत अहो हे काय मध्येच
बोकलत अहो हे काय मध्येच
मायबोली साईटवर जेव्हा मी आलो तेव्हापासून आवडत्या कलाकारांमध्ये सचिन पिळगावकर यांचे नाव लिहिले आहे. त्यांच्याईतकी चतुरस्त्र गुणवत्ता दुसरी जवळपास शोधूनही सापडणार नाही आपल्या मराठी ईंडस्ट्रीत. ज्या कार्यक्रमावरून त्यांना महागुरू संबोधले जाते ते सार्थच आहे ईतके अफाट ज्ञान आहे त्यांच्याकडे नृत्याचे. ते जे बारीक सारीक बारकावे एखाद्या परफॉर्मन्समधून शोधायचे ती प्रतिभा मला मला हिंदीच्याही कुठल्या डान्स शो मध्येही कुठल्या जज मध्ये आढळली नाही. आणि हे फॅक्ट आहे. त्यांचा एखादा कट्टर ट्रोलर सुद्धा हे मान्य करेल.
बोकलत तुम्ही आहात होय याच्या
बोकलत तुम्ही आहात होय याच्या मागे

शंका आलीच होती
सकाळी पाच ला करायचा तरी काय
सकाळी पाच ला करायचा तरी काय तुम्ही दोघे?
#दोस्ताना
सकाळी पाच ला करायचा तरी काय
सकाळी पाच ला करायचा तरी काय तुम्ही दोघे? >> किती या चौकशा.
महागृच्या तोंडाची वाक्य आहेत
त्याच्या धाग्यांना म्हणावे
त्याच्या धाग्यांना म्हणावे तेव्हडे प्रतिसाद मिळत न्हवते. तो हताश होऊन एका दगडावर बसला होता. >>
धाग्याला प्रतिसाद मिळत नाही म्हणुन इतकी नाराजी.
जाहिरात कशीही असली तरी तेल
जाहिरात कशीही असली तरी तेल चांगलं आहे वापरायला मी हॉटेल साठी आणि घरात पण वापरत होतो आणि ते सोयाबीन तेल आहे आता रिदम म्हणून लोकल मिल च मिळत आम्हाला मग तेच वापरतो कारण कॅन पॅकिंग हाय quality असल्यामुळे 50 रू जास्त जातात तिरुमला ऑईल ला.
कॅन पॅकिंग हाय quality
कॅन पॅकिंग हाय quality असल्यामुळे 50 रू जास्त जातात तिरुमला ऑईल ला.>> अंगापेक्षा बोंगा जास्त म्हणतात ते हेच. आधीच जाहिरातीत म्हाग्रु.. त्यात गिर्हाईक कमी आणि तेलापेक्षा पॅकिंग वर इतका खर्च..!
ह्या जाहिरतीत सुप्रिया डाव्या
ह्या जाहिरतीत सुप्रिया डाव्या हातात नुकताच तळलेला वडा पकडुन, उजव्या हाताने गॅस बंद असलेल्या शेगडी वर वडा तळताना दिसते
मिशन मंगल नाही बघितला का. गॅस
मिशन मंगल नाही बघितला का. गॅस बंद केल्यावर सुद्धा परातभर पुऱ्या त्या गरम तेलात तळल्या जातात. तीच थिअरी असेल.
मिशन मंगल नाही बघितला का. >>>
मिशन मंगल नाही बघितला का. >>>>
नशिबाने नाही बघितला....
Pages